Arjun Tendulkar Dainik Gomantak
क्रीडा

Deodhar Trophy 2023 : ‘देवधर’ मैदानावर दीर्घ कालावधीनंतर गोव्याचा खेळाडू; अर्जुन तेंडुलकरला संधी

दर्शन मिसाळनंतर नऊ वर्षांनी अकरा सदस्यीय संघात

किशोर पेटकर

Arjun Tendulkar in South Zone Squad for Deodhar Trophy : देशांतर्गत क्रिकेटमधील प्रतिष्ठेच्या प्रो. डी. बी. देवधर ट्रॉफी एकदिवसीय क्रिकेट स्पर्धेत तब्बल नऊ वर्षांनंतर गोव्याचा क्रिकेटपटू दक्षिण विभागाच्या अंतिम अकरा सदस्यीय संघात झळकळा.

रणजी क्रिकेट स्पर्धेतील राज्याचा ‘पाहुणा’ डावखुरा अर्जुन तेंडुलकर (Arjun Tendulkar) याने शुक्रवारी पुदुचेरी येथे उत्तर-पूर्व विभाग संघाविरुद्ध पदार्पण केले.

यापूर्वी २०१४ मध्ये गोव्याचा अष्टपैलू दर्शन मिसाळ दक्षिण विभाग संघातून देवधर ट्रॉफी स्पर्धेत दोन सामने खेळला होता. या डावखुऱ्या फिरकी गोलंदाजाने त्यावेळी मध्य विभाग व पश्चिम विभागाविरुद्ध मिळून दोन सामन्यांतून तीन गडी बाद केले होते.

त्यावर्षी अमोघ देसाई व अमित यादव हे गोव्याचे खेळाडूही दक्षिण विभाग संघात होते, मात्र प्रत्यक्ष खेळण्याची संधी दर्शनला मिळाली होती.

आता पुदुचेरीत सुरू असलेल्या देवधर ट्रॉफी स्पर्धेसाठी दक्षिण विभाग संघात अर्जुन तेंडुलकर व मोहित रेडकर असे गोव्याचे दोघे जण आहेत. त्यापैकी अर्जुनला शुक्रवारी पदार्पणाची संधी मिळाली.

गोवा क्रिकेट असोसिएशनने सचिव रोहन देसाई यावेळी दक्षिण विभागाचे निमंत्रक आहेत. डावखुरा वेगवान गोलंदाज अर्जुनने उत्तर-पूर्व विभागाविरुद्ध ७-२-२१-१ असे चमकदार गोलंदाजी पृथक्करण राखले.

स्वप्नील अस्नोडकर, सौरभ बांदेकर व शदाब जकाती हे गोव्याचे माजी क्रिकेटपटू देवधर ट्रॉफी स्पर्धेत यापूर्वी खेळले आहेत. स्वप्नीलने पाच सामन्यांत दक्षिण विभागाचे प्रतिनिधित्व केले. सौरभ तीन सामने, तर शदाब एक सामना खेळला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Ganesh Festival 2025: परंपरा, कला आणि पर्यावरणाचा संगम... सुबक गणेशमूर्ती साकारणारे 'च्यारी घराणे'; दक्षिण गोव्यात प्रसिद्ध

UP Crime: आंतरराज्य सायबर टोळीचा पर्दाफाश! गोव्यातून चालवले जात होते ऑनलाइन बेटिंग, तिघांना अटक

Goa Rain Alert: 'चतुर्थी'काळात पावसाचे संकट! 4 दिवस 'यलो अलर्ट' जारी; जोरदार सरी कोसळण्याची शक्यता

बिहारचे मुद्दे आणि चेहरे; मतदारयादी शुद्धीकरण, व्होट-चोरीचा आरोप आणि लालूंचे 'जंगल राज'

Goa Live News: सौभाग्यवती महिलांकडून हरतालिका उत्साहात संपन्न

SCROLL FOR NEXT