Goa Chess : आशा शिरोडकर गोव्याच्या पहिल्या महिला फिडे आर्बिटर

‘फेअरप्ले ओरिएंटेशन कोर्स’ यशस्वीपणे पूर्ण केला
Asha Shirodkar
Asha ShirodkarDainik Gomantak
Published on
Updated on

Goa First Female Fide Arbiters : मडगाव येथील आशा शिरोडकर गोव्याच्या बुद्धिबळातील पहिल्या महिला फिडे आर्बिटर बनल्या आहेत. त्यांनी अखिल भारतीय बुद्धिबळ महासंघाचा (एआयसीएफ) ‘फेअरप्ले ओरिएंटेशन कोर्स’ यशस्वीपणे पूर्ण केला.

पुणे येथे 15 व 16 जुलै रोजी झालेल्या अभ्यासक्रमात देशभरातील 33 उमेदवारांनी भाग घेतला होता. बुद्धिबळातील अखंडता आणि नैतिकता या बाबींवर भर देण्यासाठी ‘शिस्तबद्ध अभिमुखता उजळणी’ अभ्यासक्रम घेण्यात आला होता. या कार्यशाळेत महासंघाच्या फेअरप्ले समितीचे अध्यक्ष एम. एस. गोपाकुमार यांनी मार्गदर्शन केले.

Asha Shirodkar
Novak Djokovic Retirement: राफेल नदालपूर्वी नोव्हाक जोकोविच होणार निवृत्त? आईने सांगितला रिटायरमेंटचा प्लान

बुद्धिबळ महासंघाचा हा महत्त्वपूर्ण अभ्यासक्रम पूर्ण केल्यामुळे आशा शिरोडकर आता राष्ट्रीय बुद्धिबळ स्पर्धांत, तसेच अखिल भारतीय बुद्धिबळ महासंघाच्या फिडे मानांकित स्पर्धा शिस्तबद्धता-फसवणूकविरोधी बुद्धिबळ आर्बिटर या नात्याने योगदान देतील. हा मान मिळणाऱ्या त्या पहिल्या गोमंतकीय महिला ठरल्या आहेत, अशी माहिती गोवा बुद्धिबळ संघटनेचे सचिव आशेष केणी यांनी दिली.

आशा यांचे संघटनेने अभिनंदन केले असून बुद्धिबळातील आर्बिटर क्षेत्रातील पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com