Lionel Messi
Lionel Messi  Dainik Gomantak
क्रीडा

FIFA World Cup 2022: मेस्सीचा आनंद गगनात मावेना! हातात वर्ल्डकप अन् टेबलवर विजयी डान्स, पाहा व्हिडिओ

Pranali Kodre

FIFA World Cup 2022: फिफा फुटबॉल वर्ल्डकप 2022 स्पर्धेचे विजेतेपद लिओनेल मेस्सीच्या नेतृत्वातील अर्जेंटिना संघाने जिंकले. त्यांनी अंतिम सामन्यात फ्रान्सचा पेनल्टी शुटआऊटमध्ये 4-2 अशा गोलफरकाने पराभव करत तब्बल 36 वर्षांचा विश्वविजेतेपदाचा दुष्काळ संपवला. या विजयाबरोबरच मेस्सीचे विश्वविजेतेपदाचे स्वप्नही पूर्ण झाले.

मेस्सीचा जल्लोष

अंतिम सामन्यात मेस्सीनेही कर्णधारपदाला साजेल असाच खेळ केला. त्याने सामन्यान दोन महत्त्वपूर्ण गोल करताना पेनल्टी शुटआऊटमध्येही अचूक निशाणा साधला. त्यामुळे अर्जेंटिनाच्या विजयात त्याचे योगदान महत्त्वाचे ठरले.

अंतिम सामन्यात मेस्सीनेच अर्जेंटिनाला गोलचे खातेही उघडून दिले होते. त्याने सामन्याच्या 23 व्या मिनिटालाच पहिला गोल नोंदवला होता. तसेच त्याने ज्यादाच्या वेळेतही गोल नोंदवत अर्जेंटिनाचे आव्हान राखले होते.

त्याच्याशिवाय या सामन्याच्या पहिल्या हाफमध्ये अर्जेंटिनाकडून एंजेल डी मारियाने एक गोल केला होता. तर फ्रान्सकडून सामन्यातील तिन्ही गोल कायलिन एमबाप्पेने केले होते. त्यामुळे 120 मिनिटाच्या खेळानंतर 3-3 अशी बरोबरी झाल्याने पेनल्टी शुटआऊटमध्ये निकाल लागला.

हे विजेतेपद मिळाल्यानंतर मेस्सीसह अर्जेंटिना संघाने जोरदार सेलिब्रेशन केले. त्यांच्या सेलिब्रेशनचे अनेक व्हिडिओही सध्या व्हायरल होत आहेत. अशाच एका व्हिडिओमध्ये दिसते की अर्जेंटिनाच्या ड्रेसिंग रुममध्ये मेस्सी वर्ल्डकप ट्रॉफी घेऊन आला.

त्यानंतर त्याने तेथील मोठ्या टेबलवर चढून त्या ट्रॉफीसह डान्स केला. त्यानंतर त्याने ती ट्रॉफी टेबलच्या मधोमध ठेवत त्याच्या बाजूला डान्स केला. त्याच्याबरोबर त्याचे अन्य संघसहकारीही आनंदाने नाचताना दिसत आहेत.

दरम्यान, मेस्सीने या अंतिम सामन्यादरम्यान अनेक विश्वविक्रमांनाही गवसणी घातली. तो वर्ल्डकपमध्ये 26 सामने खेळणारा पहिला खेळाडू ठरला. तसेच त्याने फिफा वर्ल्डकप 2022 मधील गोल्डन बॉल पुरस्कारही आपल्या नावे केला. त्यामुळे तो दोन वेळा गोल्डन बॉल जिंकणाराही पहिलाच खेळाडू ठरला. यापूर्वी 2014 च्या वर्ल्डकपमध्येही त्याने गोल्डन बॉल जिंकला होता.

याशिवाय त्याने यंदाच्या वर्ल्डकपमध्ये 7 गोल केले. त्यामुळे त्याच्या वर्ल्डकपमधील गोलची संघ 13 गोल्सवर गेली आहे. त्यामुळे त्याने वर्ल्डकपमध्ये सर्वाधिक गोल करणाऱ्या फुटबॉलपटूंच्या यादीत ब्राझीलचे दिग्गज पेले यांना मागे टाकले आहे.

पेले यांनी वर्ल्डकपमध्ये 12 गोल केले आहेत. या यादीत मेस्सीच्या पुढे गर्ड म्युलर (14), रोनाल्डिन्हो (15) आणि मिरोस्लॅव्ह क्लोज (16) हे तीन खेळाडू आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Ponda News : फोंड्याच्या मताधिक्यावर भाजप नेत्यांचे लक्ष; विधानसभेसाठी अनेक दावेदार

Morjim Beach : किनारपट्टीवर नशेचे सावट गडद ; युवापिढी संकटात

India Economy: भारत दशकातील सर्वात वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था, चीनला मागे टाकणार; UN नंतर IMF नं वर्तवलं भाकित

Goa News : कर्नाटकातील खानापूरमधील ऐतिहासिक स्थळांना भेट; ४० जणांचा सहभाग

सेक्स वर्करचे घृणास्पद काम! 200 हून अधिक जणांचा जीव धोक्यात; जाणून घ्या नेमकं प्रकरण?

SCROLL FOR NEXT