Anshul Jubli Dainik Gomantak
क्रीडा

Anshul Jubli: BSF ऑफिसरचा मुलगा युट्यूबवर शिकला MMA, आता भारतासाठी रचला मोठा इतिहास

भारताचा एमएमए फायटर अंशुल जुब्लीने युएसी कॉन्ट्रॅक्ट मिळवत ऐतिहासिक कामगिरी केली आहे.

Pranali Kodre

Anshul Jubli: भारताचा एमएमए फायटर अंशुल जुब्लीने ऐतिहासिक कामगिरी केली आहे. त्याने लॉस वेगासमध्ये रविवारी झालेल्या रोड टू यूएफसी फायनल्समध्ये इंडोनेशियाच्या जेका सारागिह विरुद्ध विजय मिळवला आहे. यासह त्याने युएफसी अपेक्समध्ये लाईटवेट डिव्हिजनचे युएफसी कॉन्ट्रॅक्ट मिळवले आहे.

याबरोबरच तो युएसी कॉन्ट्रॅक्ट मिळवणारा भारताचा भरत खांदारेनंतरचा दुसराच मार्शियल आर्टिस्ट ठरला आहे. त्याला किंग ऑफ लायन्स म्हणूनही ओळखला जाते.

अंशुल जुब्ली हा भारतातील उत्तरकाशीच्या शेजारील भाटवाडी गावातील एका मध्यमवर्गीय कुटुंबातील मुलगा असून त्याचे वडील बीएसएफ ऑफिसर आहेत. त्याच्या वडिलांच्या नोकरीमुळे त्याला विविध राज्यात राहावे लागले. पण नंतर ते डेहराडूनमध्ये स्थायिक झाले.

दरम्यान 2015 साली त्याच्या मित्राच्या मोठ्या भावामुळे त्याची मार्शियल आर्ट्स आणि युएफसीची ओळख झाली. त्याला आधी त्याच्या वडिलांप्रमाणेच आर्मीमध्ये जाण्याची इच्छा होती, त्यानुसार तो परिक्षेची तयारीही करत होता. पण याबरोबरच त्याचे मार्शियल आर्टबद्दलचे आकर्षणही वाढत होते.

त्याने चार वर्षाच्या ट्रेनिंगमध्ये एमएमए फायटिंगच्या बऱ्याच टेकनिकही शिकल्या. एका मुलाखतीत त्याने सांगितले होते की तो CDS आणि SSB परिक्षेची तयारी करत असतानाच एमएमए प्रशिक्षक फिरास झाहाबी, जॉन डानाहर यांचे युट्युब व्हिडिओही पाहायचा. व्हिडिओ पाहून तो टेकनिक शिकला.

दिल्लीमध्ये असताना त्याला त्याच्या एका मित्राने क्रॉसस्ट्रेन फाईट क्लबबद्दल सांगितले. या जीममध्ये भारतातील काही प्रोफेशनल फायटर देखील यायचे. त्याने नंतर स्वत:च्या काही जमवलेल्या रकमेतून दिल्लीमध्ये राहण्याचा निर्णय घेतला. मात्र, हे पैसे त्याच्यासाठी पुरेसे नव्हते.

त्याने नंतर मित्रांकडून उधारी घेत फाईट्सच्या रजिस्ट्रेशन फी भरल्या. पण पुढेही त्याला अपयश आले. मात्र त्याने हार मानली नाही.

अखेर सुरुवातीच्या अपयशानंतर त्याला बॉलीवूड अभिनेता टायगर श्रॉफ, त्याची बहीण कृष्णा आणि आई आयेशा यांनी स्थापन केलेल्या भारतातील सर्वात मोठी व्यावसायिक एमएमए प्रमोशन म्हणून ओळखल्या जाणार्‍या सेकंड मॅट्रिक्स फाईट नाइटमुळे संधी मिळाली. त्यानंतर त्याने प्रोफेशनली खेळायला सुरुवात केली. तो आता युएसी डेव्हलपमेंटल टूर्नामेंट जिंकणाराही पहिला भारतीय आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

The Sabarmati Report: गोध्रा अग्निकांडावर बेतलेला 'द साबरमती रिपोर्ट' गोव्यात टॅक्स फ्री; मुख्यमंत्र्यांची घोषणा

Goa Today's News Live: पाणी जपून वापरा; संपूर्ण बार्देश तालुक्यात दोन दिवस मर्यादीत पाणी पुरवठा

Cash For Job Scam: गोमंतकीयांना लाखोंचा गंडा घालणाऱ्या विषया आणि सोनियाला जामीन मंजूर; मडगाव कोर्टाचा निर्णय

Krittika Nakshatra: गोव्यात कृत्तिका पूजन का करतात? जाणून घ्या धार्मिक महत्व आणि फायदे

युथ काँग्रेसची म्हार्दोळ पोलिस ठाण्यावर धडक, Cash For Job प्रकरणी आक्रमक; मुख्यमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी!

SCROLL FOR NEXT