Harmanpreet Kaur | Anjum Chopra Dainik Gomantak
क्रीडा

Harmanpreet Kaur: मनातलं दु:ख अंजूम चोप्रासमोर आलं बाहेर, हरमनप्रीतचा ओक्साबोक्शी रडतानाचा Video आला समोर

महिला टी20 वर्ल्डकप सेमीफायनलमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पराभवानंतर हरमनप्रीत कौर अंजूम चोप्राच्या गळ्यात पडून ओक्साबोक्शी रडल्याचा व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे.

Pranali Kodre

Harmanpreet Kaur: हरमनप्रीतच्या नेतृत्वातील भारतीय क्रिकेट संघाला गुरुवारी महिला टी20 वर्ल्डकप 2023 स्पर्धेच्या उपांत्य सामन्यात ऑस्ट्रेलियाविरुद्ध 5 धावांनी पराभवाचा सामना करावा लागला. या पराभवामुळे भारतीय महिला संघाचे या स्पर्धेतील आव्हान संपुष्टात येण्याबरोबरच पुन्हा एकदा वर्ल्डकप विजयाचे स्वप्नही भंगले.

या पराभवानंतर भारताची कर्णधार हरमनप्रीत कौर खूपच निराश झाली होती. तिला तिचे अश्रूही रोखणे कठीण झाले होते. तिचे अश्रू लपवण्यासाठी ती सामन्यानंतर ब्रॉडकास्टरशी बोलण्यासाठीही गॉगल घालून आली होती.

याचदरम्यान तिचे भारताची माजी क्रिकेटपटू आणि सध्याची समालोचक अंजूम चोप्राने सांत्वन करण्याचा प्रयत्न केला. यावेळी हरमनप्रीतला अचानक रडू कोसळले आणि ती अंजूम चोप्राच्या गळ्यात पडून ओक्साबोक्शी रडली. यावेळी भारतीय संघातील हर्लिन देवोल देखील तिथे होती. या भावनिक क्षणाचा व्हिडिओ आयसीसीने सोशल मीडियावर शेअर केला आहे.

या क्षणाबद्दल बोलताना अंजून चोप्रा म्हणाली, 'माझा हेतू तिचे सांत्वन करणे हाच होता. बाहेरून मी हेच करू शकते. तो तिच्यासाठी आणि माझ्यासाठीही खुप भावूक क्षण होता. भारतीय संघ खूपदा अंतिम बाद फेरीत पोहचला आहे आणि खूप वेळा हरला आहे. मी पहिल्यांदा हे पाहिलेले नाही, मी यापूर्वीही हे दु:ख पाहिले आहे.'

'मी पाहिले की हरमनप्रीत तिच्या दुखापतींशी आणि आजारपणाशी कशी लढली आहे. कदाचीत आजचा दिवस असा होता की ती खेळूही शकली नसती. पण वर्ल्डकपमधील उपांत्य सामना आहे आणि अशा स्थितीत हरमनप्रीत कौर मागे हटणाऱ्यातील खेळाडू नाही. उलट ती एक पाऊल पुढे टाकणारी खेळाडू आहे. आज तिने तेच केले आहे.'

हरमनप्रीत या उपांत्य सामन्यापूर्वी आजारी होती. तिला दोन दिवस ताप होता, त्यामुळे ती सामन्यापूर्वी आदल्या दिवशी दवाखान्यातही जाऊन आली होती. त्यामुळे तिच्या उपांत्य सामन्यातील खेळण्यावर प्रश्नचिन्ह होते. मात्र तिने या सामन्यात खेळण्याचा निर्णय घेतला होता.

अंजूम चोप्रा पुढे म्हणाली, 'हरमनप्रीतने आज ज्याप्रकारे 20 षटके क्षेत्ररणानंतर फलंदाजी करताना भारतीय संघाच्या आशा उंचावल्या होत्या, ते शानदार होते. ज्याप्रकारे भारतीय संघ केवळ 5 धावांनी हरला, असे खूप कमी वेळा होते. जसा संपूर्ण सामना झाला, ते पाहून मी समजू शकते की हरमनप्रीतच्या मनात आणि डोक्यात सध्या काय सुरू असेल. हा एक खेळाडूंमधील क्षण होता आणि आमचे दु:ख वाटत होतो.'

या सामन्यात ऑस्ट्रेलियाने दिलेल्या 173 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना भारतीय संघाला 20 षटकात 8 बाद 167 धावा करता आल्या.

भारताकडून हरमनप्रीत कौरने 34 चेंडूत 52 धावांची खेळी करत विजय मिळवून देण्याचा प्रयत्न केला होता. तिला 43 धावा करणाऱ्या जेमिमाह रोड्रिग्जने चांगली साथही दिली होती. मात्र, या दोघींव्यतिरिक्त फलंदाजीत भारतीय खेळाडूंना खास काही करता आले नाही. अखेर भारताला अखेरच्या षटकात पराभवाचा सामना करावा लागला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

BJP: इतिहासात पहिल्यांदाच भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची सूत्रे महिलेकडे जाणार? RSS चा ग्रीन सिग्नल; 'ही' तीन नावे चर्चेत

Operation Sindoor: 'भारत पाकिस्तानसोबत चीनशीही लढत होता...' ऑपरेशन सिंदूरबाबत भारतीय उप सेनाप्रमुखांचे मोठे वक्तव्य

Goa News Live: 54 जुन्या कदंब बस भंगारात; नव्या EV बसेस घेणार जागा

Goa Athletics: गोव्यात रंगणार 'मनोहर पर्रीकर स्मृती ॲथलेटिक्स स्पर्धा'; तारखा, ठिकाण जाणून घ्या..

Pakistani Team: 'पाकिस्तान' टीम खेळणार भारतात! क्रीडा मंत्रालयाकडून ग्रीन सिग्नल; 2 करंडकांमध्ये घेणार भाग

SCROLL FOR NEXT