Angelo Mathews PTI
क्रीडा

Angelo Mathews: मॅथ्यूजसाठी 'टाईम आऊट'! क्रिकेटमध्ये पहिल्यांदाच मिळाली अशी नाट्यमय विकेट, वाचा नियम

Pranali Kodre

ICC ODI World Cup 2023, Bangladesh vs Sri Lanka, Angelo Mathews Timed Out:

वनडे वर्ल्डकप 2023 स्पर्धेत सोमवारी श्रीलंका विरुद्ध बांगलादेश संघात दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर सामना सुरु आहे. या सामन्यात आत्तापर्यंत आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये कधीही न घडलेली घटना घडली आहे. श्रीलंकेचा अष्टपैलू खेळाडू अँजेलो मॅथ्यूज टाईम आऊटच्या नियमामुळे बाद झाला.

झाले असे की श्रीलंका या सामन्यात प्रथम फलंदाजीसाठी आले होते. श्रीलंकेची सुरुवात फारशी बरी झाली नसली, तरी 25 व्या षटकात एक नाट्यमय घटना घडली. या षटकात दुसऱ्या चेंडूवर सदीरा समरविक्रमाला बांगलागदेशचा कर्णधार शाकिब अल हसनने 41 धावांवर बाद केले. त्यावेळी श्रीलंकेची धावसंख्या 24.2 षटकात 4 बाद 135 धावा अशी होती.

त्यावेळी सहाव्या क्रमांकावर अँजेलो मॅथ्यूज फलंदाजीला उतरणार होता, तो मैदानात आलाही पण पहिला चेंडू खेळण्यापूर्वीच हेल्मेटची काहीतरी समस्या झाल्याने परत गेला. त्यावेळी त्याचा त्यातच काही वेळ गेला. त्याचमुळे बांगलादेशचा कर्णधार शाकिब अल हसन आणि संघाने त्याच्याविरुद्ध टाईम आऊट नियमानुसार बादसाठी पंचांकडे अपील केले.

पंचांनाही नियमानुसार त्याला बाद द्यावे लागले. त्याने नंतर शाकिब आणि पंचांकडे हा निर्णय मागे घेण्यासाठी विनवणी केली, मात्र बांगलादेशने त्यांचा निर्णय मागे घेतला नाही.

त्यामुळे मॅथ्यूजला एकही चेंडू न खेळता बाद व्हावे लागले. विषेश म्हणजे यामुळे बांगलागेशला 24 व्या षटकाच्या दुसऱ्या चेंडूवर दोन विकेट्स मिळाल्या. त्यामुळे श्रीलंकेची धावसंख्या 24.2 षटकात 5 बाद 135 धावा अशी होती.

काय आहे नियम?

आयसीसीच्या नियमानुसार विकेट गेल्यानंतर किंवा एखादा फलंदाज रिटायर झाल्यानंतर पुढच्या फलंदाजाने 2 मिनिटांच्या आत क्रीजपर्यंत येणे गरजेचे असते, तसेच चेंडू खेळण्यासाठी तयार राहणे महत्त्वाचे असते, जर असे झाले नाही, तर त्या फलंदाजाच्या विरुद्ध प्रतिस्पर्धी संघ टाईम आऊटसाठी अपील करू शकतात.

दरम्यान सामन्याबद्दल सांगायचे झाले, तर बांगलादेशने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळे श्रीलंका प्रथम फलंदाजीसाठी उतरले होते.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa HSE Board Exam: गोवा बारावी बोर्ड परीक्षेच्या वेळापत्रकात बदल, JEE परीक्षेमुळे मोठा निर्णय

Fact Check: गोव्यात बोट पलटी होऊन 23 लोकांचा मृत्यू, 64 बेपत्ता; व्हायरल व्हिडिओ मागील सत्य काय?

Tourist in Goa: गोव्यात धार्मिक तणाव, पर्यटकांची पायपीट तर शाळकरी मुलांचे हाल!!

गोव्यातील पोर्तुगीजकालीन पूलांचे होणार 'स्ट्रक्चरल ऑडिट'; सावंत सरकारचा निर्णय

Goa Government Schools: ...गेल्या 5 वर्षांत ट्रेंड बदलला, शासनाचे सरकारी शाळांना प्राधान्य; CM सावंत

SCROLL FOR NEXT