आंध्र प्रदेश क्रिकेट असोसिएशनमध्ये सध्या मोठा वाद समोर आला आहे. आंध्र प्रदेश संघ रणजी ट्रॉफी 2023 - 24 स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीतून बाहेर झाल्यानंतर त्यांचा क्रिकेटपटू हनुमा विहारीने मोठा खळबळजनक दावा केला आहे.
त्याने सांगितले होते की त्याने संघातील एका खेळाडूला ओरडल्यानंतर त्या खेळाडूने राजकारणात असलेल्या त्याच्या वडिलांकडे तक्रार केली होती.
याचा परिणाम म्हणून आंध्र प्रदेश क्रिकेटने विहारीला बंगालविरुद्ध झालेल्या पहिल्याच रणजी सामन्यानंतर कर्णधारपदावरून पायउतार होण्यास सांगितले होते. दरम्यान, त्याने असेही सांगितले की तो आता यापुढे आंध्र प्रदेशसाठी खेळणार नाही.
या पोस्टनंतर लगेचच विहारीने एक पोस्ट अशीही शेअर केली होती, ज्यात आंध्र प्रदेश संघातील अने खेळाडूंनी स्वाक्षरी केलेले पत्र होते. या पत्रात खेळाडूंनी राज्य क्रिकेट संघटनेकडे विनंती केली होती की विहारीलाच संघाचा कर्णधार म्हणून कायम केले जावे. त्याने त्या खेळाडूविरुद्ध वापरलेले शब्द गेल्या अनेक वर्षांपासून ड्रेसिंग रुममध्ये वापरले जातात.
दरम्यान, आता इंडिया टूडेने दिलेल्या वृत्तानुसार आंध्र प्रदेश क्रिकेट असोसिएशनने आरोप केला आहे की विहारीने संघातील खेळाडूंना स्वाक्षरी करण्यासाठी धमकावले आहे.
रिपोर्टनुसार आंध्र क्रिकेट असोसिएशनने सांगितले आहे की हनुमा विहारीने असा आरोप केला आहे की संघातील इतर खेळाडूंचे समर्थन असतानाही त्याला कर्णधारपदावरून काढून टाकले आहे.
पण बाबत काही खेळाडूंनी आंध्र प्रदेश क्रिकेट असोसिएशनकडे तक्रार केली आहे की विहारीने खेळाडूंनी स्वाक्षरी करावी यासाठी धमकी दिली होती. आंध्र प्रदेश क्रिकेट असोसिएशनने मिळालेल्या सर्व तक्रारींचा तपास करण्याचा निर्णय घेतला आहे.
याशिवाय रिपोर्टमध्ये असाही दावा केला आहे की आंध्र प्रदेश क्रिकेटने विहारीच्या नेतृत्वाच्या कालावधील संघात गट तयार झाल्याचा आरोप केला आहे.
काही खेळाडूंनी त्याच्या चुकीच्या वागणूकीची आणि अपमानजनक भाषा वापरल्याची तक्रार केली आहे. तसेच खेळाडूंनी सैय्यद मुश्ताक अली स्पर्धेदरम्यानही संघसहकाऱ्यांशी असभ्य भाषा वापरल्याची तक्रार संघव्यवस्थापनाकडे केली होती.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.