RCB vs GT Dainik Gomantak
क्रीडा

इमोशनल रोलरकोस्टर! RCB vs GT मॅचनंतर विराटने कॅपने झाकलं तोंड, तर गुजरातचा जल्लोष, पाहा Video

रविवारी आयपीएल 2023 स्पर्धेतील अखेरच्या साखळी सामन्यानंतर रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघ निराश झाला, तर गुजरात टायटन्सच्या संघात उत्साह दिसत होता.

Pranali Kodre

Virat Kohli covered his face with a cap: इंडियन प्रीमियर लीग 2023 स्पर्धेत रविवारी रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर विरुद्ध गुजरात टायटन्स संघात सामना झाला. एम चिन्नास्वामी स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात गुजरात टायटन्सने 6 विकेट्सने विजय मिळवला. या सामन्यानंतर दोन्ही संघांमध्ये विरोधी भावनांचे दर्शन झाले.

गुजरातच्या या विजयाने बेंगलोरचे या हंगामातील आव्हान संपुष्टात आले आहे. त्यामुळे सामन्यानंतर बेंगलोरचा संघ खूपच निराश झालेला दिसला, तर विजय मिळवला असल्याने गुजरातचा संघ आनंदी दिसत होता.

या सामन्यात बेंगलोरने विराट कोहलीने केलेल्या 101 धावांच्या खेळीच्या जोरावर 198 धावांचे आव्हान गुजरातसमोर ठेवले होते. या आव्हानाचा पाठलाग गुजरातने 19.1 षटकात पूर्ण केले. गुजरातकडून शुभमन गिलने 104 धावांची शतकी खेळी केली. गिलने षटकारासह गुजरातच्या विजयावर शिक्कामोर्तब केला.

गिलने या सामन्यात अखेरच्या षटकात विजयी षटकार खेचल्यानंतर त्याचे शतकही पूर्ण झाले, तसेच संघाचाही विजयही निश्चित झाला. त्यामुळे गिलने जबरदस्त सेलिब्रेशन केले. तसेच गुजरातच्या संघानेही मोठा जल्लोष केला.

मात्र, या पराभवाने आव्हान संपुष्टात आल्याने बेंगलोरचे खेळाडू निराश झाले होते. विराट त्याच्या टोपीने तोंड झाकताना दिसला होता. तसेच तो पाय जोरात मैदानावर आदळत निराशा व्यक्त करतानाही दिसला. याशिवाय मोहम्मद सिराज तसाच मैदानात निराश होत झोपला होता.

बेंगलोरने चाहत्यांचे मानले आभार

हा सामना बेंगलोरचा या हंगामातील घरच्या मैदानातील अखेरचा सामना होता. त्यामुळे बेंगलोरच्या खेळाडूंनी मैदानात गोलाकार चक्कर मारत चाहत्यांचे आभारही मानले. तसेच विराट युवा खेळाडूंना जर्सावर स्वाक्षरी करतानाही दिसला.

बेंगलोर सोळाव्यांदा अपयशी

दरम्यान, बेंगलोर असा संघ आहे जो आयपीएलच्या पहिल्या हंगामापासून संघाकडून खेळत आहे. पण गेल्या 16 हंगामात एकदाही बेंगलोरला विजेतेपदाला गवसणी घालता आलेली नाही. बेंगलोरने 2009, 2011 आणि 2016 या हंगामांमध्ये अंतिम सामन्यात प्रवेश केला होता. मात्र, या तिन्ही हंगामात बेंगलोरने अंतिम सामन्यात पराभवाचा सामना केला.

याशिवाय 2009, 2010, 2011, 2015, 2016,2020, 2021, 2022 या आयपीएळ हंगामांमध्येही बेगलोरने प्लेऑफमध्ये प्रवेश केला होता. पण त्यांना विजतेपदाला गवसणी घालता आलेली नाही.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Ranji: नवीन मोसम, नवीन प्रशिक्षक! 'गोवा क्रिकेट'ची परंपरा सुरुच; बडोद्याचे 'मेवाडा' सहावे कोच नियुक्त

Durand Cup: 'ड्युरँड कप' होणार गोव्याशिवाय! गोमंतकीय संघांची नोंदणी नाही; संघ बांधणी प्रक्रिया पूर्ण नाही

Anmod Ghat: अनमोड घाटातील रस्ता खचला; बेळगाव - गोवा मार्गावरील वाहतूक विस्कळीत

Pissurlem: चिंता मिटली! पिसुर्लेत खाण खंदकावर पंप तैनात; धोक्याची पातळी ओलांडल्यास होणार उपसा

Goa News Live Updates: मुसळधार पावसाचा फटका; पणजी, ताळगाव, सांताक्रूझ आणि सांत आंद्रे परिसरात मर्यादीत पाणी पुरवठा

SCROLL FOR NEXT