Amitabh Bachchan meet Lionel Messi and Cristiano Ronaldo
Amitabh Bachchan meet Lionel Messi and Cristiano Ronaldo  Dainik Gomantak
क्रीडा

Amitabh Bachchan Video: बीग बींना भेटून जेव्हा मेस्सी-रोनाल्डोच्या चेहऱ्यावरही फुलले हास्य...

Pranali Kodre

Messi vs Ronaldo: गुरुवारी रात्री उशीरा सौदी अरेबिया ऑल स्टार इलेव्हन संघ (Riyadh All Star XI) विरुद्ध पॅरिस सेंट-जर्मेन (PSG) हे संघ आमने-सामने आले होते. या मैत्रीपूर्ण सामन्यात पीएसजीने 5-4 अशा फरकाने विजय मिळवला. दरम्यान, या सामन्याआधी भारतीय जेष्ठ अभिनेते अमिताभ बच्चन यांनी ख्रिस्तियानो रोनाल्डो आणि लिओनल मेस्सी या दिग्गज फुटबॉलपटूंची भेट घेतली.

रोनाल्डोने काही दिवसांपूर्वीच सौदी अरेबियातील अल नासर क्लबशी करार केला आहे. त्यामुळे तो रियाध ऑल स्टार इलेव्हन संघाचा गुरुवारी झालेल्या सामन्यात कर्णधार होता. तर मेस्सी पीएसजी संघाचा भाग आहे. त्यामुळे हे दोन्ही दिग्गज खेळाडू गुरुवारी आमने-सामने होते.

तसेच याच सामन्यात पीएसजीकडून नेमार, कायलिन एमबाप्पे, अश्रफ हाकिमी असे खेळाडूही खेळताना दिसले. पण, या सामन्यादरम्यान चर्चेचा विषय ठरला तो अमिताभ बच्चन यांची उपस्थिती.

अमिताभ खास अतिथी म्हणून या सामन्यासाठी उपस्थित होते. त्यामुळे त्यांनी सामन्यापूर्वी दोन्ही संघातील खेळाडूंची भेट घेतली. जेव्हा अमिताभ मेस्सी आणि रोनाल्डोला भेटले, तेव्हा त्यांनी त्यांच्याशी संवादही साधला. या वेळी मेस्सी आणि रोनाल्डो यांच्या चेहऱ्यावर अमिताभ यांच्या बोलण्याने हास्यही फुलले होते.

या क्षणांचा व्हिडिओ अमिताभ यांनी स्वत: शेअर केला आहे. या व्हिडिओवर चाहत्यांकडून मोठ्या प्रमाणात प्रतिक्रिया येत आहेत. तसेच अनेक चाहत्यांनी हा व्हिडिओ शेअर करत आनंदही व्यक्त केला आहे.

अमिताभ यांनी व्हिडिओ शेअर करताना लिहिले की 'रियाधमधील आनंददायी सायंकाळ. ख्रिस्तियानो रोनाल्डो, लिओनेल मेस्सी, एमबाप्पे, नेमार सर्व एकत्र खेळत आहे आणि तुम्ही खास अतिथी म्हणून पीएसजी विरुद्ध रियाध सिजन सामन्याच्या उद्घाटनासाठी उपस्थित आहात. अविश्वसनीय.'

मेस्सी-रोनाल्डो यांचे गोल

अल हिलाल आणि अल नासर या क्लबमधील खेळाडूंचा समावेश असलेल्या रियाध ऑल स्टार इलेव्हन संघाला पीएसजीकडून पराभवाचा सामना करावा लागला. असे असले तरी या सामन्यात गोलची बरसात झाली. मेस्सी आणि रोनाल्डो या यांच्याकडूनही गोल नोंदवले गेले.

पीएसजीकडून मेस्सी (3') मार्क्विनहोस (43'), सर्जिओ रामोस (54'), कायलिन एमबाप्पे (60') आणि ह्यूगो एकिटिके (78') यांनी गोल केले, तर रियाध ऑल स्टार इलेव्हन संघाकडून रोनाल्डो (33', 45'+6), ह्यून-सो जँग (56') आणि अँडरसन तालिस्का (90' + 4) यांनी गोल नोंदवले.

दरम्यान मेस्सी आणि रोनाल्डो डिसेंबर 2020 नंतर पहिल्यांदा एकमेकांविरुद्ध खेळताना दिसले होते. ते आत्तापर्यंत 37 वेळा आमने-सामने आले आहेत.

अखेरच्या वेळेस ते 2020 मध्ये बार्सिलोना विरुद्ध युवेंटस सामन्यादरम्यान आमने-सामने आलेले. त्यावेळी मेस्सी बार्सिलोना क्लबचा भाग होता, तर रोनाल्डो युवेंटसचा भाग होता. हा सामना बार्सिलोनाला 3-0 अशा फरकारने पराभूत व्हावा लागला होता.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Kanguva: 'कंगुवा'चा टीझर घालतोय धूमाकूळ; गोव्यासह ‘या’ खास ठिकाणी झालं बीग बजेट चित्रपटाचं शूटिंग

Goa Congress: सार्दिन घरात बसून विरियातोंचा प्रचार करतात; पाटकरांनी टोचले MP फ्रान्सिस यांचे कान

Prajwal Revanna: आम्ही व्हिसा दिला नाही… प्रज्वल रेवन्ना जर्मनीला पळून गेल्याच्या प्रश्नावर परराष्ट्र मंत्रालयाची प्रतिक्रिया

Shashi Tharoor In Goa: भाजपला धक्का बसणार, 400 नव्हे 200 पार करने देखील जड जाणार - थरुर

Goa Police : २४ वर्षांपासून अजूनही ‘ते’ न्यायाच्या प्रतिक्षेत; बडतर्फ पोलिसाची व्यथा

SCROLL FOR NEXT