Ameya Patil Dainik Gomantak
क्रीडा

खेळाडूंसाठी अमेय ठरलाय ‘शक्तिवर्धक’

मॅकेनिकल अभियंत्याचे क्रीडापटूंना तंदुरुस्तीविषयक शास्त्रोक्त मार्गदर्शन

किशोर पेटकर

पणजी: मॅकेनिकल अभियंता असलेल्या अमेय पाटील (Ameya Patil) या प्राध्यापकाचे व्यायामावर मनापासून प्रेम आहे. शालेय दशेत ते क्रीडापटूही होते, पण त्यात कारकीर्द घडू शकली नाही. मात्र आता नव्या दमाच्या युवा क्रीडापटूंसाठी ते ‘शक्तिवर्धक’ ठरले आहेत.

‘कोच मायलो’ या उपक्रमांर्गत सोशल मीडियामार्फत पणजीतील 27 वर्षीय अमेय खेळाडूंसाठी त्यांची ताकद वाढविणे, तंदुरुस्ती, योग्य आहार याबाबत सखोल माहिती देत आहेत. त्यांचे ‘स्ट्रेंग्थ अँड कंडिशनिंग’विषयक मार्गदर्शन लाभलेला गोव्याचा 19 वर्षीय जलतरणपटू सागर पाटील याने नुकतीच कमाल केली. फोंड्यात झालेल्या राज्यस्तरीय जलतरण स्पर्धेत सीनियर गटात सागरने तीन सुवर्ण व एक रौप्यपदक जिंकत प्रथमच कारकिर्दीतील सर्वोत्तम कामगिरी नोंदविली. याशिवाय राष्ट्रीय पातळीवरील बास्केटबॉलपटूंनाही अमेय यांचे मार्गदर्शन लाभत आहे. त्यापैकी सांगलीच्या भारत पाटील याने आंतरराष्ट्रीय मजल गाठली आहे.

शारीरिक ऊर्जा महत्त्वाची

अमेय सांगतात, ‘‘मैदानावर खेळणे सोपे असले तरी क्रीडा कौशल्य विकसित करत सर्वोत्तम कामगिरीसाठी क्रीडापटूंत शारीरिक ऊर्जा निर्णायक ठरते. दुखापती होणार नाहीत याकडे ध्यान देत, योग्य आहाराची कास धरल्यास खेळाडूची गुणवत्ता पदकप्राप्तीपर्यंत बहरू शकते. त्यासाठी शास्त्रोक्त मार्गदर्शन परिणामकारक ठरते. व्यायामशाळेत जाऊन केवळ स्नायू फुगविल्याने ताकद येत नाही. क्रीडापटूंसाठी शरीरसौष्ठवाऐवजी आंतरिक सामर्थ्य वाढविणे अतिशय उपयुक्त आणि महत्त्वाचे ठरते.’’

फिटनेस मार्गदर्शक

अभियांत्रिकी शिक्षण सुरू असताना अमेय यांनी ‘स्ट्रेंग्थ व कंडिशनिंग’विषयक अभ्यासक्रम पूर्ण केला. सांतइनेज येथील ‘फिटनेस बार जिम’मध्ये नियमित व्यायाम करणाऱ्या अमेय यांनी शैक्षणिक कारकीर्द व फिटनेस मार्गदर्शन यांची सुरेख सांगड घातली आहे. 2020 साली त्यांनी अभियांत्रिकेतील ‘एमटेक’ अभ्यासक्रम यशस्वीपणे पुणे येथील `एमआयटी`मधून यशस्वीपणे पूर्ण केला. ‘कोच मायलो’च्या माध्यमातून अमेय यांनी खेळाडूंचे शारीरिक पालनपोषण योग्यपणे होईल याकडे भर दिलेला आहे. त्यासाठी वैद्यकीय सल्ल्यासही ते प्राधान्य देतात. कोविड-19 लॉकडाऊन काळात गतवर्षीपासून अमेय यांना फिटनेस मार्गदर्शनावर जास्त लक्ष केंद्रित करणे शक्य झाले.

‘‘सरकार क्रीडापटूंना प्रोत्साहन देण्याचे आश्वासन देते, पण ते पुरेसे नाही. क्रीडा कारकीर्द सजविताना खेळाडूंना आर्थिक बाबींकडेही लक्ष पुरवावे लागते. आहारासाठी पैसा खर्च करावा लागतो. पदकप्राप्तीचे ध्येय बाळगण्यासाठी क्रीडापटूंकरता सरकारकडून नियमित स्वरूपातील आर्थिक योजना गरजेची आहे.’’

- अमेय पाटील

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Karthik Aaryan In Goa: 'रुह बाबा'नं पुन्हा जिंकलं चाहत्यांचं मन; गोव्यात एन्जॉय करतानाचे फोटो केले शेअर!

Winter Care Tips: हिवाळ्यात त्वचेची घ्या विशेष काळजी; 'हे' घरगुती उपाय नक्की ट्राय करा!

Margao Police: हुल्लडबाजांना चाप; मडगाव पोलिसांनी जप्त केल्या मॉडिफाईड बुलेट

South Goa Beach: दक्षिण गोव्यातील समुद्र किनाऱ्यांची धूप वृध्दी सुरुच; राष्ट्रीय अभ्यासातून खुलासा!

Shruti Prabhugaonkar: गोमंतकीयांना कोट्यवधी रुपयांना गंडवणाऱ्या श्रुतीला अवघ्या १० दिवसात जामीन

SCROLL FOR NEXT