Ameya Awadi runner up in chess
Ameya Awadi runner up in chess  Dainik Gomantak
क्रीडा

अमेय अवदीला बुद्धिबळात उपविजेतेपद

दैनिक गोमन्तक

पणजी: नागपूर (Nagpur) येथे झालेल्या जी. एच. रायसोनी स्मृती अखिल भारतीय फिडे रॅपिड मानांकन बुद्धिबळ (Chess) स्पर्धेत गोव्याचा इंटरनॅशनल मास्टर अमेय अवदी (Ameya Awadi) याला उपविजेतेपद मिळाले.

गतमहिन्यात सर्बिया येथे झालेल्या दोन आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ स्पर्धांत विजेतेपद मिळविलेल्या अमेय याने तोच फॉर्म नागपूरमधील स्पर्धेतही कायम राखला. या दोन दिवसीय स्पर्धेत त्याला दहावे मानांकन होते. रॅपिड बुद्धिबळ त्याने एलो मानांकन 2094 गुणांचे आहे. नागपूरला पोडियम मिळविताना अमेयने अव्वल मानांकित ओडिशाचा ग्रँडमास्टर देबाशिष दास, नागपूरची वूमन फिडे मास्टर सृष्टी पांडे, तेलंगणाचा कँडिडेट मास्टर कुशाग्र मोहन यांना नमविले. त्याने नऊ फेरांतून आठ गुणांची कमाई केली. या स्पर्धेत देशभरातील 343 बुद्धिबळपटू सहभागी झाले होते. पश्चिम बंगालचा इंटरनॅशनल मास्टर नीलाश साहा याने साडेआठ गुणांसह स्पर्धेत विजेतेपद प्राप्त केले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Parshuram Jayanti: प्रभू परशुरामाला गोमंतभूमी जनक का म्हटले जाते, काय आहे गोव्याशी संबंध?

Bicholim News : ‘वेदांता’ने पुन्हा खनिज उत्खनन केल्यास आंदोलन; बोर्डे कोमुनिदाद

Smart City : राजधानी ‘स्मार्ट सिटी’ वाऱ्यावर; अनेक कामे प्रलंबित

Lairai Devi Jatra 2024 : ‘लईराई’ जत्रोत्सवाची तयारी अंतिम टप्प्यात ; रविवारी अग्निदिव्य

Sasashti News : अपघातग्रस्त दुचाकीस्‍वाराला मुख्यमंत्र्यांकडून मदतीचा हात

SCROLL FOR NEXT