Amabti Rayudu Dainik Gomantak
क्रीडा

CSK चा 'हा' दिग्गज खेळाडू सुरु करणार नवी इनिंग, राजकारणात आजमावणार नशीब; लढवणार निवडणूक!

Manish Jadhav

Amabti Rayudu YSRCP: टीम इंडिया आणि आयपीएलमध्ये खेळल्यानंतर आता सीएसकेचा माजी स्टार खेळाडू नवी इनिंग सुरु करणार आहे. राजकारणाच्या खेळपट्टीवर खेळण्यासाठी हा खेळाडू सज्ज झाला आहे.

टीम इंडियाचा हा माजी क्रिकेटपटू लोकसभा निवडणूक लढवणार आहे. हा खेळाडू आयपीएल 2023 च्या अंतिम सामन्यात चेन्नई सुपर किंग्ज संघाचा भाग होता. विशेष म्हणजे, या सामन्यासह त्याने सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली.

हा अनुभवी खेळाडू नव्या इनिंगला सुरुवात करणार आहे

टीम इंडियाचा माजी क्रिकेटर अंबाती रायडू (Amabti Rayudu) लवकरच आंध्र प्रदेशमधून लोकसभा किंवा विधानसभा निवडणूक लढवू शकतो. रायुडू वायएसआरसीपीमध्ये जाण्यासाठी सज्ज झाला आहे. रायुडू हा गुंटूरचा आहे.

त्याने गेल्या आठवड्यात दोनदा आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री आणि वायएसआरसीपीचे प्रमुख वायएस जगन मोहन रेड्डी यांची भेट घेतली होती. अहवालानुसार, सीएम जगनमोहन रेड्डी (YS Jagan Mohan Reddy) यांनी निवडणुकीच्या हंगामात रायडूला उभे करण्याचे मन बनवले आहे.

आयपीएल 2023 च्या फायनलने धुमाकूळ घातला

इंडियन प्रीमियर लीग 2023 (IPL 2023) चा अंतिम सामना हा चेन्नई सुपर किंग्जचा फलंदाज अंबाती रायडूच्या IPL कारकिर्दीतील शेवटचा सामना होता. अंतिम सामन्यात अंबाती रायडूच्या बॅटने स्फोटक खेळी पाहायला मिळाली होती.

त्याने 8 चेंडूत 237.50 च्या स्ट्राईक रेटने 19 धावा केल्या. यादरम्यान त्याने 1 चौकार आणि 2 षटकार मारले. या सामन्यापूर्वी रायुडूने ट्विट करुन निवृत्ती जाहीर केली.

अंबाती रायुडूची आयपीएल कारकीर्द

अंबाती रायुडूने 2010 मध्ये आयपीएल करिअरला सुरुवात केली. चेन्नई सुपर किंग्ज व्यतिरिक्त अंबाती रायडू आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सचा भाग आहे. रायुडू (Amabti Rayudu) 2018 पासून CSK कडून खेळत आहे.

रायडूने आयपीएलमध्ये 204 सामन्यांत 28.23 च्या सरासरीने 4348 धावा केल्या आहेत. विशेष म्हणजे, रायुडूने आयपीएलमध्ये 22 अर्धशतके आणि 1 शतक झळकावले आहे. त्याचवेळी, अंबाती रायडू हा 6 वेळा आयपीएल (IPL) जिंकणाऱ्या संघाचा भाग होता.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

St. Francis Xavier DNA चाचणी मागणीने गोव्यात धार्मिक तेढ; हिंदुवादी संघटना, ख्रिस्ती समाजाचे राज्यभर मोर्चे, वातावरण तंग

Saint Estevam Accident: बाशुदेव भंडारी बेपत्ता प्रकरणी मित्र कल्पराज आणि प्रेयसीची दोन तास चौकशी; पोलिसांकडून प्रश्नांची सरबत्ती!

Goa Today's News Live: हिंदुत्ववादी संघटनांचे वेलिंगकरांना समर्थन, ख्रिस्ती समाजाकडून अटकेची मागणी; राज्यभरात मोर्चे

Sunburn Festival 2024: सनबर्नविरोधात कामुर्लीत स्थानिकांचा कडक विरोध; उद्याची बैठक ठरणार निर्णायक!

Mhadei Water Dispute: ...कर्नाटकाविरोधात लढण्यास सावंत सरकार ठरले कुचकामी; आलेमाव यांचा घणाघात

SCROLL FOR NEXT