Lionel Messi | Sunil Chhetri Dainik Gomantak
क्रीडा

Argentina Team in India: मेस्सी अन् सुनील छेत्री आमने-सामने आले असते, अर्जेंटिनाने प्रस्तावही दिलेला; पण...

भारतात अर्जेंटिनाचा जूनमध्ये फुटबॉल सामना झाला असता, पण तो प्रस्ताव फेटाळण्यात आला, त्यामागील कारण जाणून घ्या.

Pranali Kodre

India Turned Down the Chance to Host Lionel Messi led Argentina: वर्ल्ड चॅम्पियन अर्जेंटिना संघ सध्या लोकप्रियतेच्या उच्च शिखरावर आहे. स्टार फुटबॉलपटू लिओनल मेस्सी कर्णधार असलेला विश्विविजेता संघ जून 2023 मध्ये भारतात फुटबॉल सामने खेळूही शकला असता, मात्र ही संधी अर्थिक समस्येमुळे भारताला गमवावी लागली.

अर्जेंटिना संघ 12 आणि 20 जून दरम्यान दक्षिण आशियामध्ये दोन मैत्रीपूर्ण सामने खेळणार होते. त्यामुळे अर्जंटिनाने यासाठी भारताकडे प्रस्तावही दिलेला. मात्र अखिल भारतीय फुटबॉल महासंघाने (AIFF) अर्जेंटिनाचे सामने आयोजित करण्याची आर्थिक ताकद नसल्याने या प्रस्तावाला नकार दिला.

त्यामुळे कदाचीत मेस्सी आणि भारतीय फुटबॉल संघाचा सुनील छेत्री यांना आमने-सामने पाहाण्याचीही संधी चाहत्यांना गमवावी लागली आहे. दरम्यान, जरी अर्जेंटिना संघ भारतात खेळला असता, तरी भारताविरुद्ध सामना झाला असता की नाही, याबद्दल शंका होती. कारण अर्जेंटिनाची सध्या अव्वल क्रमवारी आहे, तर भारत 101 व्या क्रमांकावर आहे.

याबद्दल AIFF चे सचिव शाजी प्रभकरण यांनी टाईम्स ऑफ इंडियाला सांगितले की 'अर्जेंटिना फुटबॉल असोसिएशनने आमच्याशी मैत्रीपूर्ण सामन्यासाठी संपर्क साधला होता. पण एवढी मोठी रक्कम उभी करणे शक्य नव्हते.'

'असे सामने इथे होण्यासाठी आम्हाला भक्कम भागीदारीच्या पाठिंब्याची गरज आहे. अर्जेंटिना संघ सामन्यासाठी जेवढी फी घेतात ती रक्कम खूप मोठी आहे आणि फुटबॉलमधील आमच्या आर्थिक परिस्थितीच्या दृष्टीने आम्हाला मर्यादा आहेत.'

गेल्यावर्षाच्या अखेरीस फिफा वर्ल्डकप जिंकल्यानंतर अर्जेंटिना संघाची मागणी वाढली आहे. अर्जेंटिनाचा संघ जवळपास 4-5 मिलियन डॉलर फी (भारतीय चलनानुसार साधारण 32-40 कोटी) घेतो.

दरम्यान अर्जेंटिना फुटबॉल असोसिएशनचे इंटरनॅशनल रिलेशन्सचे प्रमुख पाब्लो जोक्विन डियाझ यांनी AIFF शी मैत्रीपूर्ण सामन्यांसाठी संपर्क केला होता.

अर्जेंटिनाची सुरुवातीची योजना अशी होती की त्यांना दक्षिण आशियामध्ये भारतात आणि बांगलादेशमध्ये मैत्रीपूर्ण सामना खेळायचा होता. पण इतक्या कमी कालावधीत दोन्ही देशांना एवढा पैसा गोळा करणे शक्य नव्हते. त्यामुळे अर्जेंटिनाने चीनमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध 15 जून रोजी आणि 19 जून रोजी जकार्तामध्ये इंडोनेशियाविरुद्ध मैत्रीपूर्ण सामना खेळला.

दरम्यान पाब्लो जोक्विन डियाझ यांनी प्रभकरन यांच्याबरोबरील संवाद कायम ठेवला असून भविष्यात अर्जेंटिना फुटबॉल असोसिएशन आणि अखिल भारतीय फुटबॉल महासंघात काहीतरी भागीदारी होऊ शकते, अशी आशा व्यक्त केली जात आहे.

बारा वर्षांपूर्वी अर्जेंटिना खेळलेले भारतात

अर्जेंटिना संघ भारतात यापूर्वी अखेरीस 2011 मध्ये फुटबॉल सामना खेळला होता. त्यावेळीही मेस्सीने अर्जेंटिनाचे नतृत्व केले होते. त्यावेळी त्यांनी व्हेनेझुएलाला 1-0 असे पराभूत केले होते. त्यावेळी हा सामना कोलकातामधील सॉल्ट लेक स्टेडियमवर झाला होता. हा सामना पाहाण्यासाठी 85000 प्रेक्षक स्टेडियममध्ये आले होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Battle of Galwan: रक्ताने माखलेला चेहरा, हातात धारदार शस्त्र अन् डोळ्यात देशभक्तीची चमक, 'गलवान'मधील सलमानचा पहिला लूक आला समोर

ED Goa: गोव्यात ईडीची झाडाझडती; 'सडा अर्बन'ची 1.05 कोटींची मालमत्ता तर जमीन हडप प्रकरणी संदीप वझरकर 3.19 कोटींची जमीन जप्त

Video: अप्रतिम अन् शानदार...! भर पावसात मुलांसोबत 'गजराज'नं लुटला क्रिकेटचा आनंद; सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल

Goa: भर पावसात प्रवासी बोट नदीत बुडाली; बाहेर काढण्यासाठी गोवा सरकारने 11 दिवसांत खर्च केले 20 लाख रुपये

Multiple Organ Failure Diseases: एकाच आजारानं हृदय, यकृत अन् मूत्रपिंड खराब होऊ शकतं का? जाणून घ्या वैज्ञानिक कारण अन् प्रतिबंधात्मक उपाय

SCROLL FOR NEXT