Alexander Zverev US Open 2026 champion Dainik Gomantak
क्रीडा

अलेक्झांडर ज्वेरेव्हने रचला इतिहास! बेन शेल्टनला धूळ चारत जिंकले 'US Open 2026' चे विजेतेपद; बनला नवा चॅम्पियन

Alexander Zverev US Open 2026 champion: यूएस ओपनच्या पुरुष एकेरीच्या अंतिम सामन्यात ज्वेरेव्हने अमेरिकेच्या बेन शेल्टनचा 6-3, 7-6 (2), 5-7, 6-2 असा पराभव करत आपल्या कारकिर्दीतील दुसरे ग्रँड स्लॅम विजेतेपद पटकावले.

Manish Jadhav

Alexander Zverev US Open 2026 champion: जर्मनीचा स्टार टेनिसपटू अलेक्झांडर ज्वेरेव्हसाठी हे वर्ष स्वप्नवत ठरत आहे. रविवारी पार पडलेल्या यूएस ओपनच्या पुरुष एकेरीच्या अंतिम सामन्यात ज्वेरेव्हने अमेरिकेच्या बेन शेल्टनचा 6-3, 7-6 (2), 5-7, 6-2 असा पराभव करत आपल्या कारकिर्दीतील दुसरे ग्रँड स्लॅम विजेतेपद पटकावले. न्यूयॉर्कमधील आर्थर ॲश स्टेडियमवर उपस्थित घरच्या पाठीराख्यांना 23 वर्षीय शेल्टनकडून मोठ्या अपेक्षा होत्या.

2003 मध्ये अँडी रॉडिकने यूएस ओपन जिंकल्यानंतर एकाही अमेरिकन पुरुष खेळाडूला हे विजेतेपद जिंकता आले नव्हते. मात्र, ज्वेरेव्हने अप्रतिम खेळाचे प्रदर्शन करत शेल्टन आणि अमेरिकन चाहत्यांचे स्वप्न धुळीस मिळवले. यापूर्वी महिला एकेरीच्या फायनलमध्ये एलेना रिबाकिनाने अव्वल मानांकित आर्यना सबालेंकाचा पराभव करत यूएस ओपन ट्रॉफीवर नाव कोरले.

ज्वेरेव्हसाठी 2026 हे वर्ष अतिशय खास ठरत आहे. या वर्षाच्या सुरुवातीला त्याने फ्रेंच ओपनच्या रुपाने पहिले ग्रँड स्लॅम जिंकले आणि आता न्यूयॉर्कमध्ये दुसरी ट्रॉफी उंचावली. विशेष म्हणजे, 2020 मधील यूएस ओपनच्या फायनलमध्ये झालेल्या दुर्दैवी पराभवानंतर ज्वेरेव्हने अखेर या स्पर्धेत विजयाची मोहर उमटवली. पहिल्यांदाच एखाद्या ग्रँड स्लॅम स्पर्धेत अव्वल मानांकित म्हणून उतरलेल्या ज्वेरेव्हने सुरुवातीपासूनच शेल्टनवर दबाव कायम ठेवला.

पहिल्या सेटमध्ये शेल्टनने केलेल्या डबल फॉल्टचा फायदा घेत ज्वेरेव्हने 6-3 अशी आघाडी घेतली. दुसऱ्या सेटमध्ये शेल्टनने पुनरागमन करण्याचा प्रयत्न केला, परंतु ज्वेरेव्हने टाय-ब्रेकरमध्ये उत्कृष्ट खेळ करत 7-2 अशी बाजी मारली. तिसऱ्या सेटमध्ये शेल्टनने 7-5 असा विजय मिळवत सामन्यात रंगत आणली. त्याच्या समर्थनासाठी त्याची गर्लफ्रेंड आणि अमेरिकन फुटबॉलपटू ट्रिनिटी रॉडमन देखील स्टेडियममध्ये उपस्थित होती. परंतु, चौथ्या सेटमध्ये ज्वेरेव्हने कोणतीही चूक न करता 6-2 अशी सरशी साधत विजेतेपदावर शिक्कामोर्तब केले.

शेल्टनच्या या पराभवामुळे अमेरिकन पुरुष टेनिसपटूची ग्रँड स्लॅम ट्रॉफीची प्रतीक्षा कायम राहिली. तसेच 1968 मध्ये आर्थर ॲशनंतर यूएस ओपन जिंकणारा पहिला कृष्णवर्णीय पुरुष खेळाडू बनण्याची सुवर्णसंधीही शेल्टनच्या हातातून निसटली. या विजयासह ज्वेरेव्हने शेल्टनविरुद्धचा आपला हेड-टू-हेड रेकॉर्ड 6-0 असा मजबूत केला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

खरी कुजबुज: गणपती कोणाला पावणार?

Iran Missile Attack: अमेरिकन सैनिकांवरील हल्ल्यात चीनचा हात? गुप्तचर सॅटेलाईट फोटोंचा नवा खुलासा, ट्रम्प सरकारची वाढली डोकेदुखी

Goa Water Conservation: गोव्यात पाण्याची मोठी चिंता! 30 सप्टेंबरपर्यंत 500 बंधाऱ्यांचे दरवाजे बंद करण्याचा सरकारचा निर्णय; जलसंवर्धनासाठी उचलली पावले

Ganeshotsav 2026: गोव्यात गणेशोत्सवाचा जल्लोष सुरू! अंगणात सडा, दाराशी रांगोळी अन् माटोळीची सजावट; बाप्पाच्या आगमनाने चैतन्याला उधाण

Horoscope 14 September 2026: गणपती बाप्पा मोरया...! बाप्पाच्या कृपावर्षावानं 'या' राशी होणार मालामाल; कुबेराचा खजिना उघडणार

SCROLL FOR NEXT