Ajit Agarkar | BCCI Chief Selector Google image
क्रीडा

BCCI Chief Selector: शिक्कामोर्तब झालं! अजित आगरकर भारतीय संघाचा नवा 'चीफ सिलेक्टर'

Pranali Kodre

Ajit Agarkar appointed Chairman of Senior India Men’s Cricket Selection Committee:

भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने मंगळवारी (4 जुलै) मोठी घोषणा केली आहे. बीसीसीआयने भारतीय पुरुष संघाच्या निवड समीतीचा अध्यक्ष म्हणून माजी क्रिकेटपटू अजित आगरकरची नियुक्ती केली आहे. आगरकरचे नाव गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत होते. अखेर मंगळवारी त्यावर शिक्कामोर्तब करण्यात आले.

काही दिवसांपूर्वीच बीसीसीआयने निवड समीतीमधील रिक्त पदासाठी अर्ज मागवले होते. त्यानंतर सुलक्षणा नाईक, अशोक मल्होत्रा आणि जतीन परांजपे यांचा समावेश असलेल्या बीसीसीआयच्या क्रिकेट सल्लागार समीतीने उमदवारांच्या मुलाखती घेतल्या. त्यानंतर अजीत आगरकरला या पदासाठी निवडण्यात आले आहे.

त्यामुळे आता भारतीय संघाच्या निवड समीतीत मुंबईचे दोन सदस्य दिसणार आहेत. मुंबईचे माजी क्रिकेटपटू सलील अंकोला देखील या निवड समीतीत सदस्य आहेत. याशिवाय शिव सुंदर दास, सुब्रोतो बॅनर्जी आणि श्रीधरन शरथ हे देखील निवड समीतीमध्ये आहेत.

फेब्रुवारी 2023 मध्ये स्टिंग ऑपरेशननंतर निवड समीतीच्या अध्यक्षपदावरून चेतन शर्मा यांनी राजीनामा दिला होता. त्यामुळे त्यांच्या राजीनाम्यानंतर शिव सुंदर दास यांना निवड समीतीचे प्रभारी अध्यक्षपद देण्यात आले होते. पण निवड समीतीमध्ये एक पद रिक्त होते. अखेर ते आता बीसीसीआयने भरले आहे.

आगरकरने निवड समीतीमधील इतर सदस्यांपेक्षा अधिक कसोटी सामने खेळलेले असल्याने त्याला क्रिकेट सल्लागार समीतीने अध्यक्षपद देण्याची शिफारस केली होती. त्यानुसार त्याला अध्यक्ष करण्यात आले आहे.

अजित आगरकरची कारकिर्द

मुंबईच्या अजित आगरकरने त्याच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत 26 कसोटी सामने खेळले असून 58 विकेट्स घेतल्या आहेत. तसेच त्याने एका शतकासह 571 धावा केल्या आहेत. त्याने 191 वनडे सामने खेळताना 288 विकेट्स घेतल्या असून 3 अर्धशतकांसह 1269 धावा केल्या आहेत. त्याचबरोबर 4 आंतरराष्ट्रीय टी20 सामने खेळताना 3 विकेट्स घेतल्या आहेत.

आगरकर 2007 सालच्या टी20 वर्ल्डकप विजेत्या भारतीय संघाचा भागही होता. तसेच त्याच्या नावावर अद्यापही वनडेत भारताकडून सर्वात जलद अर्धशतक करण्याचा विक्रम आहे. त्यान झिम्बाब्वेविरुद्ध 2000 साली 21 चेंडूत अर्धशतक केले होते. याशिवाय जवळपास एक दशक तो भाकताकडून वनडेत सर्वात जलद 50 विकेट्स घेणाराही गोलंदाज होता. त्याने 23 वनडेत 50 विकेट्स पूर्ण केल्या होत्या.

तो एकूण कारकिर्दीत 110 प्रथम श्रेणी सामन खेळला असून 299 विकेट्स घेतल्या आहेत आणि 3336 धावा केल्या आहेत. तसेच 270 लिस्ट ए सामने खेळले असून 420 विकेट्स घेतल्या आहेत आणि 2275 धावा केल्या आहेत. त्याने 62 टी20 सामने खेळले असून 47 विकेट्स घेतल्या आहेत.

आगरकरने क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर तो क्रिकेट प्रशासनात रुजू झाला. त्याने यापूर्वी मुंबई क्रिकेट संघाच्या निवड समीतीचेही अध्यक्षपद भूषवले आहे. तसेच तो आयपीएलमधील संघ दिल्ली कॅपिटल्सचाही सहाय्यक प्रशिक्षक होता.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Grammy Award विजेता कलाकार गोवा सनबर्नमध्ये करणार सादरीकरण; Skrillex, DJ Peggy Gou यांची नावे जाहीर

Sindhudurg: गोव्यात मौजमजेसाठी येणाऱ्या पोलिसांना कर्तव्याचा विसर, कॉलेज तरुणीची काढली छेड, स्थानिकांनी दिला चोप

Sadanand Shet Tanavade: संसदेच्या वाणिज्य स्थायी समिती सदस्यपदी सदानंद शेट तानावडे यांची निवड

Bashudev Bhandari Missing Case: बाशुदेव भंडारी बेपत्ता प्रकरणी संशयितांची पोलिसांकडून कसून चौकशी; केंद्रीय गृहमंत्रालयाने दखल घेताच तपासाला वेग

Badlapur Encounter: अक्षय शिंदे एन्काउंटर प्रकरणी राजकीय दावे विरुद्ध जनतेचा पाठिंबा; ''देवानेच न्याय केला...''

SCROLL FOR NEXT