Ajinkya Rahane | Radhika | WTC 2023 Final Dainik Gomantak
क्रीडा

Ajinkya Rahane Injury: '...म्हणून तू स्कॅनला नकार दिलास' रहाणेच्या दुखापतीबद्दल पत्नीनेच केला मोठा खुलासा

कसोटी चॅम्पियनशीप फायनलमध्ये अजिंक्य रहाणेला झालेल्या दुखापतीबद्दल त्याच्या पत्नीने मोठा खुलासा केला आहे.

Pranali Kodre

Ajinkya Rahane's Wife Radhika heartfelt post: भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघात बुधवारपासून सुरु झालेल्या कसोटी चॅम्पियनशीप 2021-23 स्पर्धेचा अंतिम सामना सुरू आहे. द ओव्हलवर सुरु असलेल्या या सामन्यादरम्यान भारताचा मधल्या फळीतीली फलंदाज अजिंक्य रहाणे दुखापतग्रस्त झाला आहे, पण तरी त्याने स्कॅन करण्यास नकार दिल्याचा खुलासा त्याच्या पत्नीने केला आहे.

या सामन्याच्या दुसऱ्या दिवशी फलंदाजी करत असताना पॅट कमिन्सचा चेंडू रहाणेच्या उजव्या हाताच्या तर्जनीला लागला होता. त्यावेळी त्याला तपासण्यासाठी फिजिओही मैदानात आळे होते. पण त्यानंतरही रहाणेने कायम खेळण्याचा निर्णय घेतला.

त्याने त्याच्या मानसिकतेवर परिणाम होऊ नये, म्हणून स्कॅन करण्यास नकार देत तिसऱ्या दिवशी त्याच्या फलंदाजीवर लक्ष केंद्रित केल्याचे त्याची पत्नी राधिकाने सांगितले आहे.

राधिकाने राहणेसाठी खास इंस्टाग्राम पोस्ट केली आहे. तिने या पोस्टमध्ये रहाणेला चेंडू लागल्यानंतरचा फोटो पोस्ट केले आहेत. तसेच कॅप्शनमध्ये लिहिले की 'तुझे बोट सुजलेले असतानाही, तू तुझी मानसिकतेवर परिणाम होऊ नये आणि फलंदाजीवर लक्ष केंद्रित करण्यासाठी स्कॅनसाठी नकार दिला. यातून अविश्वसनीय दृढनिश्चय आणि निस्वार्थ भाव दिसतो.'

'तू सावतरत अटूट वचनबद्धतेसह खेळपट्टीवर उभा राहिलास. त्यातून आम्हाला सर्वांना प्रेरणा दिलीस. माझा संवेदनक्षम पती, मला नेहमीच तुझ्या अटळ संघभावनेबद्दल अभिमान वाटतो. तूला खूप प्रेम.'

रहाणेने त्याच्या दुखापतीबाबत तिसऱ्या दिवसाच्या खेळानंतर प्रतिक्रिया देताना सांगितले की 'मला वाटत नाही की याचा माझ्या (दुसऱ्या डावातील) फंदाजीवर परिणाम होईल.'

'मी ज्याप्रकारे फलंदाजी केली, त्याबद्दल मी खूश आहे. चांगला दिवस होता. आम्ही ३२० ते ३३० धावांपर्यंत जाण्याचा विचार केलेला, पण एकूण चांगला दिवस होता. गोलंदाजीसाठीही चांगला दिवस होता.'

रहाणेचा शानदार झेल कॅमेरॉन ग्रीनने घेतला होता. त्याबद्दल रहाणे म्हणाला, 'तो खूप चांगला झेल होता. आपल्या सर्वांना माहित आहे, तो चांगला क्षेत्ररक्षक आहे. तो खूप पुढे जाऊ शकतो.'

'सध्या ऑस्ट्रेलिया काहीप्रमाणात आघाडीवर आहे. पण आमच्यासाठी महत्त्वाचे हे आहे की आम्ही वर्तमानात राहून प्रत्येक सेशननुसार खेळ करावा. चौथ्या दिवशी पहिला तास महत्त्वाचा असणार आहे.'

'आम्हाला माहित आहे काही मजेशीर गोष्टी घडू शकतात. जडेजाने चांगली गोलंदाजी केली. फुटमार्क्सने त्याला डावखुऱ्या फलंदाजांविरुद्ध मदत केली. अद्यापही खेळपट्टी वेगवान गोलंदाजांना मदत करणारी आहे.'

दरम्यान, रहाणेने अंतिम सामन्यात भारताकडून पहिल्या डावात सर्वाधिक 89 धावांची खेळी केली. त्याने शार्दुल ठाकूरबरोबर (51) 7 व्या विकेटसाठी 109 धावांची भागीदारीही केली. त्यामुळे भारताला 250 धावांचा टप्पा पार करता आला.

भारताने रहाणे आणि शार्दुलच्या अर्धशतकाच्या जोरावर पहिल्या डावात सर्वबाद 296 धावा केल्या. त्याआधी ऑस्ट्रेलियाचा संघ पहिल्या डावात 469 धावांवर सर्वबाद झाला होता. त्यामुळे भारतीय संघाला 173 धावांनी पिछाडी स्विकारावी लागली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Super Cup: सुपर कपचा बिगुल! 25 ऑक्टोबरपासून रंगणार थरार; FC Goa समोर विजेतेपद राखण्याचे खडतर आव्हान

Goa Taxi: 'टॅक्‍सी ॲग्रीगेटर जबरदस्तीने लादणार नाही'! गुदिन्‍होंची हमी; सरकारकडे सुमारे 3500 सूचना, हरकती

Panaji: ‘बोर्डवॉक’ची पणजी महानगरपालिका दुरुस्ती करणार? 2 वर्षांपासून दुर्दशा; धोका असूनही नागरिकांचा वावर

Chandel Hasapur: सरपंचालाच मिळाली सरकारी नोकरी, पदासह दिला पंच सदस्यत्वाचा राजीनामा; चांदेल हसापूरमध्ये रंगणार रस्सीखेच

Goa ITI: ‘आयटीआय’ करणाऱ्यांसाठी खूशखबर! 2 वर्षांच्‍या कोर्सनंतर मिळणार दहावी, बारावी उत्तीर्ण प्रमाणपत्र; मुख्‍यमंत्र्यांची घोषणा

SCROLL FOR NEXT