Ajinkya Rahane: 'जेव्हा कानांपाशी सर्व गोष्टी...', CSKकडून तुफानी फलंदाजीमागचं रहाणेने सांगितले कारण

आयपीएल 2023 मध्ये सीएसकेकडून खेळणारा अजिंक्य रहाणे सध्या तुफानी फलंदाजी करताना दिसत आहे.
Ajinkya Rahane
Ajinkya RahaneDainik Gomantak
Published on
Updated on

Ajinkya Rahane: इंडियन प्रीमियर लीग 2023 स्पर्धेत चेन्नई सुपर किंग्स संघाने रविवारी कोलकाता नाईट रायडर्स संघाला 49 धावांनी पराभूत केले. या सामन्यात विजय मिळवण्याबरोबरच चेन्नईने 7 सामन्यांतील 5 सामने जिंकत गुणतालिकेतही अव्वल स्थान पटकावले.

चेन्नईच्या या यशात यंदा मधल्या फळीतील फलंदाज अजिंक्य रहाणेचाही महत्त्वाचा वाटा राहिला आहे. रहाणेने कोलकाताविरुद्ध देखील आक्रमक फलंदाजी करताना 29 चेंडूतच 71 धावांची नाबाद खेळी केली. या खेळीत त्याने 6 चौकार आणि 5 षटकार ठोकले.

Ajinkya Rahane
IPL 2023: चेन्नईकडून कोलकाताचा घरच्या मैदानात पराभव! CSK पाँइंट टेबलमध्येही 'टॉप'

रहाणेच्या या खेळीमुळे चेन्नईने या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना 20 षटकात 4 बाद 235 धावा केल्या होत्या. त्यानंतर कोलकाताला 236 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना 20 षटकात 8 बाद 186 धावाच करता आल्या. या सामन्याचा सामनावीर पुरस्कारही रहाणेला मिळाला.

सामन्यानंतर रहाणेने चेन्नई संघाचे आणि कर्णधार एमएस धोनीचे कौतुक केले आहे. रहाणे म्हणाला, 'माझी मानसिकता अगदी स्पष्ट होती. जर तुमच्या कानांजवळ सर्व गोष्टी चांगल्या चालू असतील, तर मन पण चांगले राहाते आणि तुम्ही उत्तम राहाता.'

'मी फक्त माझ्या खेळाचा आनंद घेत आहे. खेळपट्टी थोडी स्टिकी होती पण जर तुम्ही फलंदाजी करताना स्थिरावला, तर तुमच्याकडे चांगली संधी होती. आम्हाला चांगली सुरुवात मिळाली होती. त्यानंतर मी फक्त चांगले शॉट्स खेळलो आणि लय कायम ठेवली.'

Ajinkya Rahane
IPL 2023: जयस्वालचा कॅच किंग कोहलीसाठी विक्रमी! 'असा' कारनामा करणारा ठरला केवळ तिसराच क्रिकेटर

तसेच रहाणे पुढे म्हणाला, 'आत्तापर्यंत मी माझ्या सर्व खेळींचा आनंद घेतला आहे. मला असे वाटत आहे की अजूनही माझ्याकडून सर्वोत्तम खेळी होणे बाकी आहे. मी याआधीही एमएस धोनीच्या नेतृत्वाखाली काही वर्षे भारतासाठी खेळलो आहे. आता सीएसकेकडून खेळतानाही मी खूप काही शिकत आहे. जर तुम्ही त्याचे ऐकले, तर तुम्ही चांगलेच खेळता.'

दरम्यान, रहाणे यंदा दमदार फॉर्ममध्ये खेळत आहे. त्याने चेन्नईकडून यंदा आत्तापर्यंत 5 सामने खेळले असून 52.25 च्या सरासरीने आणि 199.04 च्या स्ट्राईक रेटने 209 धावा केल्या आहेत. यामध्ये त्याच्या 2 अर्धशतकांचा समावेश आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com