Ajinkya Rahane Dainik Gomantak
क्रीडा

Ajinkya Rahane: कमबॅक असावं तर रहाणे सारखंच! BCCI ने पुन्हा दिली टीम इंडियात मोठी जबाबदारी

Team India for West Indies Tour: बीसीसीआयने वेस्ट इंडिज दौऱ्यासाठी निवडलेल्या भारतीय संघात अजिंक्य रहाणेवरही मोठी जबाबदारी सोपवली आहे.

Pranali Kodre

Ajinkya Rahane New Role in India's Test Team for West Indies Tour: बीसीसीआयने गुरुवारी वेस्ट इंडिज दौऱ्यातील वनडे आणि कसोटी मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा केली आहे. दरम्यान, कसोटी संघात काही महत्त्वाचे बदल करण्यात आले आहे. यातील एका मोठ्या बदलाची चांगलीच चर्चा रंगली आहे. हा बदल म्हणजे भारताच्या कसोटी संघाचे उपकर्णधारपदाची माळ पुन्हा एकदा अंजिक्य रहाणेच्या गळ्यात पडली आहे.

रहाणेचं पुनरागमन फळलं

रहाणेने काही दिवसांपूर्वीच भारतीय कसोटी संघात जवळपास दीड वर्षांनी पुनरागमन केले होते. तो 7 ते 11 जून दरम्यान भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघात पार पडलेल्या कसोटी चॅम्पियनशीप 2021-23 स्पर्धेच्या अंतिम सामन्यात खेळला होता. या सामन्यातून त्याने तब्बल 512 दिवसांनी भारताच्या कसोटी संघात पुनरागमन केले होते.

रहाणे त्यापूर्वी अखेरचा सामना जानेवारी 2022 मध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध खेळला होता. पण त्यानंतर त्याने देशांतर्गत क्रिकेट आणि आयपीएल 2023 स्पर्धेत दाखवलेल्या शानदार कामगिरीच्या जोरावर पुन्हा एकदा भारतीय संघात स्थान मिळवण्यात यश मिळवले होते. त्याने पुनरागमनाच्या म्हणजेच कसोटी चॅम्पियनशीपच्या अंतिम सामन्यात प्रभावी कामगिरीही बजावली.

त्याने भारताकडून पहिल्या डावात सर्वाधिक 89 धावांची खेळी केली होती. तसेच दुसऱ्या डावातही त्याने चांगला खेळ करताना 46 धावा केल्या होत्या. त्याने या सामन्यात भारताकडून सर्वाधिक धावा केल्या.

रहाणेला पुन्हा मिळालं उपकर्णधारपद

रहाणेने कसोटी चॅम्पियनशीपच्या अंतिम सामन्यात दाखवलेल्या कामगिरीचे बक्षीस त्याला मिळाले असून तो पुन्हा जवळपास पावणे दोन वर्षांनी भारताच्या कसोटी संघाचा कर्णधार बनला आहे.

केएल राहुलला कसोटी संघाच्या उपकर्णधारपदावरून काढल्यानंतर भारताच्या कसोटी संघासाठी उपकर्णधारपदाची नियुक्ती करण्यात आली नव्हती. त्यामुळे हे पद कोणाला मिळणार, अशी चर्चा होती. पण आता वेस्ट इंडिज विरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी ही जबाबदारी रहाणेला देण्यात आल्याने सध्यातरी ही चर्चा थांबली आहे.

दरम्यान, रहाणेने नोव्हेंबर 2021 मध्ये भारतीय कसोटी संघाचे न्यूझीलंडविरुद्ध तात्कालिन कर्णधार विराट कोहलीच्या अनुपस्थितीत नेतृत्व केले होते.

पण त्या मालिकेनंतर रहाणेला भारतीय कसोटी संघाच्या उपकर्णधारपदावरून काढण्यात आले होते आणि केएल राहुलला ही नवी जबाबदारी मिळाली होती. पण आता पुन्हा एकदा रहाणने भारतीय संघाचे उपकर्णधारपद मिळवले आहे.

रहाणेची कसोटी कारकिर्द

अजिंक्य रहाणेने त्याच्या कसोटी कारकिर्दीत 83 सामने खेळले असून या सामन्यांमध्ये त्याने 38.96 सरासरीने 5066 धावा केल्या आहेत. यात त्याच्या 12 शतकांचा आणि 26 अर्धशतकांचा समावेश आहे.

भारताचा वेस्ट इंडिज दौरा

बीसीसीआयने घोषित केलेल्या वेळापत्रकानुसार भारतीय संघ वेस्ट इंडिजविरुद्ध आधी 12 ते 24 जुलै दरम्यान दोन सामन्यांची कसोटी मालिका खेळेल, त्यानंतर 27 जुलै ते 1 ऑगस्ट दरम्यान तीन सामन्यांची वनडे मालिका होईल, तर शेवटी 3 ऑगस्टपासून पाच सामन्यांची टी20 मालिका खेळली जाईल. 13 ऑगस्ट रोजी या दौऱ्यातील अखेरचा टी20 सामना खेळला जाईल.

  • भारताचा कसोटी संघ - रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, ऋतुराज गायकवाड, विराट कोहली, यशस्वी जयस्वाल, अजिंक्य रहाणे (उपकर्णधार), केएस भरत (यष्टीरक्षक), इशान किशन (यष्टीरक्षक), आर अश्विन, रविंद्र जडेजा, शार्दुल ठाकूर, अक्षर पटेल, मोहम्मद सिराज, मुकेश कुमार, जयदेव उनाडकट, नवदीप सैनी.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Ind Vs NZ T20: चौथ्या T20 साठी 2 बदल? संजू सॅमसन, कुलदीपबाबत मोठा निर्णय; कोण असणार अंतिम संघात?

Goa Politics: खरी कुजबुज; गोवा दूध उत्पादक संघ जीवंत आहे का?

Goa News: 2050 पर्यंत गोव्‍यात 100% नवीकरणीय ऊर्जा! CM सावंतांचे प्रतिपादन; कॅनडा, जपान, दक्षिण कोरियाशीही सहकार्य करार

Goa Politics: गोवा काँग्रेसची राहुल गांधी, खर्गेंसोबत मीटिंग! विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दिल्लीत चर्चा

Goa News: सरकारी, सार्वजनिक भूखंडांवर राहणार आता कडक नजर! तालुकानिहाय पथके स्थापन; सुट्ट्यांच्या दिवशीही कडक देखरेख

SCROLL FOR NEXT