Novak Djokovic Dainik Gomantak
क्रीडा

Novak Djokovic: 'आय लव्ह यू...', कुटुंबाकडे पाहताच जोकोविचला अश्रू अनावर, पाहा Video

Wimbledon 2023 : विम्बल्डनच्या अंतिम सामन्यातील पराभवानंतर जोकोविचला कुटुंबाकडे पाहून अश्रू अनावर झाले होते.

Pranali Kodre

Novak Djokovic breaks down in tears : रविवारी स्पेनच्या 20 वर्षीय कार्लोस अल्कारेजने नोवाक जोकोविचच्या वर्चस्वाला धक्का देत विम्बल्डन 2023 स्पर्धेचे विजेतेपद आपल्या नावावर केले. रविवारी (16 जुलै) विम्बल्डनचा पुरुष एकेरीचा अंतिम सामन्यात स्पेनच्या अल्कारेजने जोकोविचला 1-6, 7-6(6), 6-1, 3-6, 6-4 असे पाच सेटमध्ये पराभूत केले. त्यामुळे अल्कारेज नवा विम्बल्डन चॅम्पियन ठरला आहे.

दरम्यान, हा सामना पराभूत झाल्यानंतर जोकोविच भावूक झाला होता. त्याला कोर्टवर सामना पाहाण्यासाठी आलेल्या त्याच्या कुटुंबाकडे पाहून अश्रूही अनावर झाले. या भावनिक क्षणांचा व्हिडिओही सध्या व्हायरल होत आहे.

अंतिम सामन्यानंतर उपविजेतेपदाचा किताब स्विकारल्यानंतर जोकोविच त्याची प्रतिक्रिया देत होता. यावेळी त्याने तिथे उपस्थित असलेल्या आपल्या कुटुंबाकडे पाहिले आणि त्याचे डोळे पाणावले.

पण लगेचच सावरत त्याने माफी मागत म्हटले, 'माझे तुमच्यावर खूप प्रेम आहे. मला पाठिंबा दिल्याबद्दल आभार आणि मी तुम्हाला घट्ट मिठी मारणार आहे आणि आपण असेच एकमेकांवर प्रेम करत राहू. धन्यवाद.'

जोकोविचकडून अल्कारेजचे कौतुक

सामन्यानंतर जोकोविचने अल्कारेजचेही तोंडभरून कौतुक केले. तो म्हणाला, 'मला वाटते लोक गेल्या 12 महिन्यांपासून त्याच्याबद्दल चर्चा करत आहेत की त्याच्यामध्ये रॉजर (फेडरर), राफा (राफेल नदाल) आणि माझ्यातील काहीतरी घटक आहेत. मी याच्याही अगदी महमत आहे. माझ्यामते त्याच्याकडे आमच्या तिघांमधील सर्वोत्तम घटक आहेत.'

जोकोविचचा स्वप्नभंग

रविवारी जोकोविचला इतिहास रचण्याची संधी होती. जर त्याने विजय मिळवला असता, तर त्याने मार्गारेट कोर्टच्या 24 ग्रँडस्लॅम विजेतेपदांच्या विश्वविक्रमाशी बरोबरी केली असती.

जोकोविचने त्याच्या कारकिर्दीत आत्तापर्यंत 23 ग्रँडस्लॅम विजेतीपदं जिंकली आहेत. यात त्याच्या 10 ऑस्ट्रेलियन ओपन, 3 फ्रेंच ओपन, 7 विम्बल्डन आणि 3 अमेरिकन ओपन ग्रँडस्लॅम विजेतेपदांचा समावेश आहे.

तसेच त्याला रॉजर फेडररच्या आठ विम्बल्डन विजेतेपदांच्या विक्रमाशीही बरोबरी करण्याची संधी होती. पण अल्कारेजने त्याला पराभवाचा धक्का दिल्याने त्याचे स्वप्न भंगले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Amit Shah Goa Visit: अमित शहांचे 'मिशन गोवा'! विधानसभा निवडणुकीच्या अंतिम रणनीतीसाठी भाजपची 'मेगा' बैठक

Assembly Election: जनगणना डिसेंबरमध्ये, फेब्रुवारीत निवडणूक! केंद्राच्या आदेशाने गोवा विधानसभा निवडणुकीचा मार्ग मोकळा

IND vs PAK: टीम इंडियाकडून लाजीरवाणा पराभव होऊनही मस्ती उतरेना! पाकिस्तानचा कोच म्हणतोय, 'आम्हीच बेस्ट'; आशिया कप जिंकण्याचा दावा Watch Video

Horoscope: रविवारचा दिवस ठरणार टर्निंग पॉईंट! नोकरीच्या शोधात असणाऱ्यांना मिळणार मोठी गुड न्यूज, पण 'या' राशींनी राहावे अत्यंत सावध

Jungle Life and Biodiversity: निसर्गाची 'जंगल' ही कादंबरी; पशू-पक्ष्यांपासून वृक्षवेलींपर्यंत उलगडते निसर्गाची अद्भुत जीवनकथा

SCROLL FOR NEXT