Ravichandran Ashwin Dainik Gomantak
क्रीडा

IND vs SL: कपिल देवनंतर अनिल कुंबळेंचा विक्रम अश्विनच्या रडारावर!

मोहालीत कपिल देव (Kapil Dev) यांचा विक्रम मोडल्यानंतर अश्विनचं लक्ष आता अनिल कुंबळे यांच्या बेंगळुरुमधील विक्रमावर आहे.

दैनिक गोमन्तक

मोहालीत कपिल देव (Kapil Dev) यांचा विक्रम मोडल्यानंतर अश्विनचं लक्ष आता अनिल कुंबळे यांच्या बेंगळुरुमधील विक्रमावर आहे. विशेष म्हणजे रोहित शर्माचा 400 वा आंतरराष्ट्रीय सामना असणार आहे. तर श्रीलंकेचा संघ अश्विनच्या आणखी एका विक्रामाचा साक्षीदार बनू शकतो. आता तुम्ही विचार करत असाल कसे. कुंबळेंचा (Anil Kumble) असा कोणता विक्रम आहे, ज्याच्याजवळ अश्विन पोहचला आहे. (After breaking Kapil Dev's record, Ravichandran Ashwin has a chance to break Anil Kumble's record)

दरम्यान, मोहालीत श्रीलंकेविरुद्ध 100 आंतरराष्ट्रीय विकेट्सचा टप्पा ओलांडणारा अश्विन (Ravichandran Ashwin) आता बंगळुरुमध्ये विकेट्सच्या शर्यतीत कुंबळे यांना पराभूत करु शकतो. श्रीलंकेविरुद्ध सर्वाधिक आंतरराष्ट्रीय विकेट्स घेणाऱ्या जगातील 6 आणि 3 भारतीय गोलंदाजांमध्ये कुंबळे अश्विनच्या अगदी वर आहेत. अनिल कुंबळे यांनी श्रीलंकेविरुद्ध 108 आंतरराष्ट्रीय विकेट घेतल्या आहेत. तर अश्विनच्या नावावर सध्या श्रीलंकेविरुद्ध (Sri Lanka) 101 आंतरराष्ट्रीय विकेट्स आहेत. अशा परिस्थितीत अश्विनने बंगळुरु कसोटीतील दोन्ही डाव एकत्र करुन 7 विकेट घेतल्या तर तो अनिल कुंबळे यांना मागे टाकू शकतो.

तसेच, बंगळुरु कसोटी गुलाबी चेंडूने खेळली जाणार असल्याने अश्विनला विकेट्स घेण्याची मोठी संधी असणार आहे. विशेष म्हणजे गुलाबी चेंडूने खेळलेल्या 3 कसोटीत 12 बळी घेणारा अश्विन हा भारतातील सर्वात यशस्वी गोलंदाज आहे.

शिवाय, श्रीलंकेविरुद्ध सर्वाधिक 155 आंतरराष्ट्रीय विकेट्स घेण्याचा विक्रम पाकिस्तानच्या वसीम अक्रमच्या नावावर आहे. त्याच वेळी, हरभजन सिंग (Harbhajan Singh) 114 विकेट्ससह भारतीयांमध्ये पहिल्या स्थानावर आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Suresh Prabhu: गोवेपण टिकवायचं असेल तर.... ; सुरेश प्रभूंनी सोप्या भाषेत समजावून सांगितलं

Pilgao Farmers Protest: खनिज वाहतुकिचा प्रयत्न हाणून पाडणार, पिळगाव शेतकऱ्यांचे वेदांता विरोधातील आंदोलन तीव्र, ST समाजही सहभागी

Goa Crime: 35.50 लाखांचा घोटाळा; Central Bank Of India च्या व्यवस्थापकाला अटक

Goa Live News Today: लाचखोरी प्रकरणी आयटीडी अधिकाऱ्यांना सशर्त जामीन मंजूर!

Suyash Prabhudessai: गोमंतकीय क्रिकेटप्रेमींची घोर निराशा, अष्टपैलू 'सुयश' IPL मध्ये Unsold

SCROLL FOR NEXT