Afghanistan's Uncle Nool Ali Zadran and Nephew Ibrahim Zadran Dainik Gomantak
क्रीडा

SL vs AFG: काका-पुतण्याच्या जोडीची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये धमाल, श्रीलंकेच्या गोलंदाजांना झोडपले

Ibrahim Zadran: पण दुसऱ्या डावात दोघांमध्ये 106 धावांची भागीदारी झाली. इब्राहिम तिसऱ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत 101 धावा करून नाबाद परतला. तर नूर अली ४७ धावा करून बाद झाला.

Ashutosh Masgaunde

Afghanistan's Uncle Nool Ali Zadran and Nephew Ibrahim Zadran got a chance to play as openers in the Test match against Sri Lanka:

सध्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये एकाच वेळी ३ कसोटी सामने खेळले जात आहेत. टीम इंडिया घरच्या मैदानावर इंग्लंडविरुद्ध कसोटी मालिका खेळत आहे. दुसरीकडे, न्यूझीलंड आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातही कसोटी मालिका सुरू आहे. त्याचवेळी अफगाणिस्तान संघ श्रीलंकेविरुद्ध एकमेव कसोटी सामना खेळत आहे. या सामन्यात काका-पुतण्याच्या जोडीने अप्रतिम कामगिरी केली आहे.

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये भावांच्या अनेक जोड्या खेळल्या आहेत, पण काका-पुतण्याची जोडी पहिल्यांदाच पाहायला मिळाली.

श्रीलंकेविरुद्धच्या एकमेव कसोटी सामन्यात अफगाणिस्तानकडून चार खेळाडूंनी पदार्पण केले. यामध्ये 35 वर्षीय नूल अली जद्रानच्या नावाचाही समावेश आहे. त्याचवेळी संघात उपस्थित असलेला इब्राहिम झद्रान हा नूर अलीचा पुतण्या आहे.

विशेष बाब म्हणजे हा सामना सुरू होण्यापूर्वी इब्राहिम जद्रानने कसोटी पदार्पणाची कॅप त्याचा काका नूल अली जद्रान यांच्याकडे सोपवली होती.

कोलंबो येथील सिंहली स्पोर्ट्स क्लबच्या मैदानावर श्रीलंका आणि अफगाणिस्तान यांच्यात एकमेव कसोटी सामना खेळला जात आहे.

या सामन्यात नूल अली जद्रान आणि इब्राहिम झद्रान यांना सलामीवीर म्हणून खेळण्याची संधी मिळाली. या सामन्याच्या पहिल्या डावात काका-पुतण्याची जोडी विशेष काही करू शकली नाही.

पण दुसऱ्या डावात दोघांमध्ये 106 धावांची भागीदारी झाली. इब्राहिम जद्रान सामन्याच्या तिसऱ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत 101 धावा करून नाबाद परतला. तर नूर अली ४७ धावा करून बाद झाला.

या सामन्यात अफगाणिस्तान संघाने प्रथम फलंदाजी केली. पण पहिल्या डावात 198 धावांत तो गडगडला.

प्रत्युत्तरात श्रीलंकेने मोठी धावसंख्या फलकावर लावली. श्रीलंकेने पहिल्या डावात 439 धावा केल्या.

मात्र, अफगाणिस्तानने दुसऱ्या डावात शानदार पुनरागमन करत 1 गडी गमावून 199 धावा केल्या. पण तो अजूनही श्रीलंकेपेक्षा 42 धावांनी मागे आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND vs AUS: यॉर्कर किंगचा 'विराट' रेकॉर्ड! जसप्रीत बुमराह ठरला ऑस्ट्रेलियाविरुद्ध टी20 मध्ये सर्वाधिक विकेट्स घेणारा गोलंदाज; सईद अजमलचा मोडला विक्रम

IND vs AUS: चौथ्या टी-20 मध्ये 'सूर्या ब्रिगेड' सरस! भारताचा 48 धावांनी दणदणीत विजय; भारतीय गोलंदाजांच्या भेदक माऱ्यासमोर कांगारु गारद VIDEO

'हा' बॉलिवूड अभिनेता बनणार 'कांतारा' फेम ऋषभ शेट्टीचा औरंगजेब! 2027 मधील सर्वात मोठ्या चित्रपटाची चर्चा

Goa Crime: भाडेकरुनेच केला मालकाचा आणि मित्राचा खून? दुहेरी हत्याकांडाने हादरले साळीगाव! पोलिसांकडून तपास सुरु

Illegal Betting Case: ईडीची मोठी कारवाई! सुरेश रैना आणि शिखर धवन यांची 11.14 कोटींची संपत्ती जप्त; 'वन एक्स बेट'चा प्रमोशन करार पडला महागात

SCROLL FOR NEXT