Afghanistan Player Dainik Gomantak
क्रीडा

World Cup 2023 मध्ये अफगाणिस्तानचा अनोखा रेकॉर्ड, भारत आणि ऑस्ट्रेलियाही 'या' कामगिरीपासून वंचित!

Manish Jadhav

ODI World Cup 2023 AUS vs AFG: एकदिवसीय विश्वचषक 2023 मध्ये आज ऑस्ट्रेलिया आणि अफगाणिस्तान यांच्यात मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर सामना खेळला जात आहे. यंदाच्या एकदिवसीय विश्वचषकात छोट्या संघांनी चांगली कामगिरी केली आहे.

विशेषत: अफगाणिस्तानचा संघ या स्पर्धेत आपला जलवा दाखवून देत आहे. अफगाणिस्तानचा संघ अजूनही उपांत्य फेरीच्या शर्यतीत आहे. ग्रुप स्टेजमधील आपला 8वा सामना अफगाणिस्तान खेळत आहे.

हा सामना मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर खेळला जात आहे. या सामन्यादरम्यान अफगाणिस्तान संघाने एक अनोखा विक्रम आपल्या नावावर केला आहे. यावेळी स्पर्धेत त्याने असे काही केले आहे, जे इतर कोणत्याही संघाला करता आले नाही.

अफगाणिस्तान या बाबतीत सर्व संघांच्या पुढे

दरम्यान, अफगाणिस्तान संघ आपल्या फिरकी गोलंदाजीसाठी ओळखला जातो. मात्र यंदा संघाच्या उत्कृष्ट कामगिरीत फलंदाजांनीही पूर्ण योगदान दिले आहे. 2023 च्या विश्वचषक स्पर्धेत पहिल्या 10 षटकांमध्ये सर्वात कमी विकेट्स गमावणारा हा संघ आहे.

म्हणजेच सुरुवातीच्या पॉवरप्लेमध्ये सर्व (9) संघांनी अफगाणिस्तानपेक्षा जास्त विकेट गमावल्या आहेत. हे आश्चर्यकारक आहे, कारण पहिल्या 10 मध्ये त्यांची कामगिरी भारत आणि ऑस्ट्रेलियासारख्या (Australia) संघांपेक्षाही चांगली आहे. अफगाणिस्तानच्या सुरुवातीच्या पॉवरप्लेमध्ये आतापर्यंत फक्त 7 फलंदाज बाद झाले आहेत.

विश्वचषक 2023 मध्ये 1-10 षटकात कमीत कमी विकेट गमावणारे संघ

7 विकेट्स - अफगाणिस्तान

9 विकेट्स - ऑस्ट्रेलिया

9 विकेट्स - न्यूझीलंड

9 विकेट्स - भारत

9 विकेट्स - पाकिस्तान

उपांत्य फेरी गाठण्याची मोठी संधी

अफगाण संघाचे आतापर्यंत 7 सामन्यांतून 4 विजयांसह 8 गुण झाले असून ते सध्या गुणतालिकेत सहाव्या स्थानावर आहे. न्यूझीलंड, पाकिस्तान आणि अफगाणिस्तानचे सध्या आठ गुण आहेत पण नेट रनरेटमध्ये अफगाणिस्तानचा संघ त्यांच्या मागे आहे.

अफगाणिस्तानचा (Afghanistan) आज आठवा सामना ऑस्ट्रेलियाशी होत असून दक्षिण आफ्रिकेविरुद्ध शेवटचा सामना खेळायचा आहे. अफगाणिस्तानने दोन्ही सामने जिंकल्यास 12 गुणांसह उपांत्य फेरीतील स्थान निश्चित होईल. पराभवानंतरही त्याच्या आशा जिवंत असल्या तरी त्याला इतर संघांवर अवलंबून राहावे लागणार आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Forward: नोकरभरतीसंदर्भात 'सात दिवसांत' योग्य निर्णय घ्या; गोवा फॉरवर्डची मागणी

Subhash Velingkar: आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या वेलिंगकरांच्या अटकेसाठी गोवा पोलिसांची महाराष्ट्रात शोध मोहीम!

खरी कुजबुज: जीत - मायकल आमने सामने

Saint Francis Xavier पवित्र दर्शनात भ्रष्टाचार; प्रकल्पांमधले पैशे खिशात, जनतेचे पैसे बरबाद केल्याचा भाजप सरकारवर आरोप

Bicholim News: भाडेकरूंची डिचोली पोलिस स्थानकात गर्दी! कार्यक्षेत्रात तपासणी मोहिमेला वेग

SCROLL FOR NEXT