काबुल विमानतळावर (Kabul Airport) झालेल्या स्फोटांमुळे (blast) अफगाणिस्तानचा (Afghanistan) क्रिकेटर राशिद खानने (Rashid Khan) आपल्या लोकांचा जीव वाचवण्याची विनंती केली आहे. गुरुवारी काबुल विमानतळ स्फोटाने हादरले, ज्यात अनेकांना आपले प्राण गमावले तर बरेच लोक जखमी झाले आहेत. लोकांना स्फोटाबद्दल काहीही समजण्याआधी, दुसऱ्या स्फोटही झाला यामुळे काबुल विमानतळावर मृतदेहांचा ढीग पडला.
तालिबानी राजवटीनंतर अफगाणिस्तानातून दररोज हृदयद्रावक व्हिडिओ येत आहेत. आता स्फोटानंतर याची दाहकता किती आहे याचे देखील अनेक व्हिडिओ व्हायरल होत आहेत. ज्यात काबूल विमानतळावरील शोकांतिकेचे दृश्य स्पष्टपणे दिसत आहे. अफगाणिस्तानचा क्रिकेटपटू राशिद खान याने याबद्दल ट्विट केले करत आपल्या देशातील लोकांचे जीव वाचविण्याची विनंती केली आहे.
राशिद खान हा त्या अफगाणिस्तानच्या क्रिकेटपटूंपैकी एक आहे जो सुरुवातीपासून या विषयावर जगाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न करत आहे. राशीद खानने तालिबानच्या कब्जानंतर सोशल मीडियावर शांततेचे आवाहन केले होते. त्याने गालावर अफगाणिस्तानचा झेंडा लावून हंड्रेड स्पर्धेत सामने खेळत होते.
गुरुवारी पुन्हा एकदा काबूलमधून स्फोटाची धक्कादायक बातमी समोर आली. एकाहून अधिक हल्ल्यांमध्ये 60 हून अधिक लोकांना आपला जीव गमवावा लागला आणि शेकडो जखमी झाले आहेत. क्रिकेटर राशिद खानने ट्वीट करून लिहिले - काबुलमध्ये पुन्हा एकदा रक्तस्त्राव होत आहे. कृपया अफगाण लोकांची हत्या थांबवा. असा भावनिक संदेश त्याने केला आहे.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.