Rahmanullah Gurbaz and MS Dhoni  Dainik Gomantak
क्रीडा

MS Dhoni: 'धोनीचा शब्दन् शब्द वहीत...', अफगाणिस्तानच्या क्रिकेटरने सांगितली कॅप्टनकूलच्या भेटीची खास आठवण

MS Dhoni: अफगाणिस्तानच्या क्रिकेटरने धोनीशी झालेल्या भेटीबद्दलची खास आठवण सांगितली आहे.

Pranali Kodre

Rahmanullah Gurbaz Recalling interaction with MS Dhoni: भारताचा माजी कर्णधार एमएस धोनीची लोकप्रियता केवळ चाहत्यांमध्येच नाही, तर आजी-माजी खेळाडूंमध्येही दिसते. अनेक युवा खेळाडूंसाठी तो आदर्श आहे. अफगाणिस्तानचा युवा यष्टीरक्षक फलंदाज रेहमन्नलाह गुरबाजसाठी देखील धोनी आदर्श आहे.

नुकतेच गुरबाजने धोनीबरोबरच्या पहिल्या भेटीच्या आठवणींबद्दल सांगितले आहे. गुरबाज आयपीएल 2022 मध्ये गुजरात टायटन्स संघात होता, पण त्याला खेळण्याची संधी मिळाली नव्हती. पण 2023 आयपीएलमध्ये त्याला कोलकाता नाईट रायडर्सने संघात घेतले आणि खेळण्याची संधीही दिली.

गुरबाजने आयपीएल 2023 हंगामात 11 सामन्यांमध्ये 133 च्या सरासरीने 227 धावा केल्या. दरम्यान, त्याला या दोन्ही हंगामावेळी धोनीला भेटण्याची संधी मिळाली होती. त्यावेळी त्याने धोनीने दिलेले सल्ले अगदी मनापासून ऐकून वहीत लिहूनही ठेवल्याचे सांगितले.

तसेच त्याने असेही सांगितले की धोनीने दिलेल्या वस्तू त्याने जपून ठेवलेल्या असून जेव्हाही दबाव येतो, तेव्हा त्या वस्तू त्याला आत्मविश्वास देतात.

गुरबाज आयपीएल 2022 हंगामात धोनीला पहिल्यांदाच भेटला होता. त्या भेटीबद्दल बोलताना गुरबाजने क्रिकेट नेक्स्टला सांगितले, 'पहिल्यांदा मी धोनीला भेटलो, तेव्हा मी गुजरात टायटन्स संघात होतो. मी तेव्हा इतका दबावात होतो, की मी त्याच्याशी बोलूही शकत नव्हतो.'

'पण त्याने मला जशी वागणूक दिली आणि ज्याप्रकारे तो माझ्याशी बोलला, त्यामुळे मला खूप आत्मविश्वास मिळाला. त्यानंतर मी त्याच्याशी चर्चा केली.'

त्यानंतर गुरबाज आयपीएल 2023 हंगामादरम्यानही धोनीला भेटला होता. त्याबद्दल त्याने सांगितले की 'यावर्षी जेव्हा मी त्याला भेटलो, तेव्हा अधिक आत्मविश्वासाने भरलेला होतो. मी त्याच्याश क्रिकेटबद्दल, लाईफस्टाईलबद्दल बरीच चर्चा केली.'

'मी त्याला विचारले की मी माझी लाईफस्टाईल कशी सुधारू शकतो? त्याने मला सांगितले. अगदी आत्ताही माझ्याकडे माझ्या वहीत सर्वकाही लिहिलेले आहे. मी सर्व लिहून ठेवले आहे, ज्यामुळे मला खूप मदत झाली आणि भविष्यातही होईल. तो माझ्या नेहमीच आदर्श राहिल.'

दरम्यान, गुरबाज नुकताच झिम आफ्रो टी10 स्पर्धेत केपटाऊन सॅम्प आर्मी संघाकडून खेळला. यात त्याने स्पर्धेत सर्वाधिक धावा केल्या. त्याने 9 सामन्यांत 282 धावा केल्या.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Horoscope: मंगळ करणार 'त्रिगुणी संचार'!! सुरु होणार धन, सुख आणि समृद्धीचा प्रवाह; 3 राशींना मिळणार फायदा

Canacona: रायींमध्ये देवत्व लाभलेला, दूधसागरकडे जाताना लक्ष वेधून घेणारा 'मधुवृक्ष जर्माल'

Cluster University Goa: एकेकाळी 'गोवा युनिव्हर्सिटी'ला केंद्रीय दर्जा देण्याची चर्चा चालली होती; क्लस्टर विद्यापीठांची संकल्पना

Goa Live News: भाजप गोवा राज्य संघटनात्मक कार्यशाळेला म्हापसा येथे सुरुवात

Narve: नार्वेच्या पंचगंगेच्या तीरावर भरली ‘अष्टमीची’ जत्रा; भरपावसातही भक्तीचा उत्साह

SCROLL FOR NEXT