MS Dhoni Bike Video: भूर्र...भूर्र...! धोनीचे बाइक कलेक्शन पाहून वेंकटेश प्रसाद अवाक

Venkatesh Prasad: यावेळी वेंकटेश प्रसाद म्हणाला, कोणीतरी त्याबद्दल वेडा असल्याशिवाय इतक्या बाईक खरेदी करू शकत नाही.
MS Dhoni Bike Video
MS Dhoni Bike VideoDainik Gomantak
Published on
Updated on

Venkatesh Prasad on MS Dhoni Bike Collection: माजी भारतीय वेगवान गोलंदाज वेंकटेश प्रसाद याने नुकतेच रांची येथे माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीच्या निवासस्थानी हजेरी लावली.

यादरम्यान माहीने वेंकटेश प्रसादला त्याचे बाईक-कार कलेक्शन दाखवले. फार्महाऊसमध्ये बांधलेले हे मोठे गॅरेज आणि तिथे सजलेली वाहने पाहून वेंकटेश प्रसाद यांचे डोळे विस्फरले.

यावेळी वेंकटेश प्रसाद, धोनी आणि त्याच्या बाइक कलेक्शनचा एक व्हिडिओ धोनीची पत्नी साक्षीने शूट केला होता. हाच व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे.

मी एका व्यक्तीमध्ये पाहिलेली ही सर्वात विलक्षण उत्कटता आहे. काय संग्रह आणि काय माणूस... एमएसडी. एक महान कर्तृत्ववान आणि आणखी अविश्वसनीय व्यक्ती. त्याच्या रांचीच्या घरी त्याच्या बाईक आणि कारच्या संग्रहाची ही झलक. फक्त माणूस आणि त्याची आवड पाहून भारावून गेलो.
वेंकटेश प्रसादचे ट्विट

व्हिडिओमध्ये काय होते?

या व्हिडिओमध्ये प्रसादने धोनीची पत्नी साक्षीशी संवाद साधला, तिने विचारले: 'पहिल्यांदा रांचीला आल्यावर तुम्हाला कसे वाटते?' 'अप्रतिम! नाही, अजिबात नाही (रांचीमध्ये माझी पहिली वेळ नाही). ही माझी चौथी वेळ आहे, पण या जागेबद्दल काय बोलावे (MS Dhoni's bike collection). कोणीतरी त्याबद्दल वेडा असल्याशिवाय इतक्या बाईक खरेदी करू शकत नाही. हे करण्यासाठी खूप उत्कटतेची गरज आहे.'

MS Dhoni Bike Video
IND vs WI, 2nd Test: जागतिक क्रिकेटमध्ये इतिहास रचण्याच्या उंबरठ्यावर अश्विन, इतका मोठा रेकॉर्ड करणारा...
एमएस धोनीकडे असलेल्या विविध बाइक्स.
एमएस धोनीकडे असलेल्या विविध बाइक्स.Dainik Gomantak

धोनीकडे ५० हून अधिक बाइक्स

एका जुन्या मुलाखतीत, एमएस धोनीने सांगितले होते की त्याच्याकडे 50 पेक्षा जास्त बाइक आहेत, ज्यात Harley-Davidson Fat Boy, Kawasaki Ninja H2, Ducati 1098, Yamaha RD350 आणि Suzuki Hayabusa यांचा समावेश आहे.

धोनीकडे असलेल्या वाहनांच्या ताफ्यावर तो म्हणाला होता, 'मला वाटते माझ्याकडे ५० हून अधिक बाइक्स आहेत. मला जरा त्याचे वेड आहे.

बाइक्स तक्रार करत नाहीत. तुम्ही त्यांना व्यवस्थित ठेवत नाही, तुम्ही त्यांना स्वच्छ करत नाही, तुम्ही त्यांना इंधन देत नाही. तरीही त्या तक्रार करत नाही आणि हेच तिचे सौंदर्य आहे.

पाकिस्तानचा माजी कर्णधार इंझमाम उल हक याला बाद केल्यानंंतर व्यंकटेश प्रसाद.
पाकिस्तानचा माजी कर्णधार इंझमाम उल हक याला बाद केल्यानंंतर व्यंकटेश प्रसाद.Dainik Gomantak

व्यंकटेश, भारतीय क्रिकेटचे मोठे नाव

व्यंकटेश प्रसादच्या कारकिर्दीबद्दल बोलायचे झाले तर त्याने 33 कसोटी सामन्यात 96 बळी घेतले. त्याचवेळी त्याने 161 एकदिवसीय सामन्यांमध्ये 196 विकेट घेतल्या आहेत.

व्यंकटेशने बर्मिंगहॅम येथे 1996 मध्ये इंग्लंडविरुद्ध पहिली कसोटी खेळली होती. त्याने 1994 मध्ये क्राइस्टचर्चमध्ये न्यूझीलंडविरुद्ध वनडे पदार्पण केले.

व्यंकटेशने 2001 मध्ये कोलंबोमध्ये श्रीलंकेविरुद्ध शेवटची कसोटी आणि 2001 मध्ये पोर्ट एलिझाबेथमध्ये केनियाविरुद्ध शेवटची वनडे खेळली होती.

MS Dhoni Bike Video
Sachin Tendulkar : 'मी फेडररसारखे कार्लोसलाही 10-12 वर्षे...', मास्टर-ब्लास्टरकडून विम्बल्डन विजेत्याचं तोंडभरून कौतुक
यंदाच्या आयपीएल विजेतेपदानंतर आनंद साजरा करताना धोनी आणि सहकारी.
यंदाच्या आयपीएल विजेतेपदानंतर आनंद साजरा करताना धोनी आणि सहकारी.Dainik Gomantak

धोनी सध्या काय करतो?

42 वर्षीय धोनीने अलीकडेच 7 जुलै रोजी त्याचा वाढदिवस साजरा केला. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त झालेला धोनी अद्याप आयपीएलमधून निवृत्ती घेतलेली नाही.

दरम्यान तो विश्रांतीच्या काळात कुटुंबासोबत वेळ घालवत आहे. धोनीने चेन्नई सुपर किंग्जला आयपीएल 2023 मध्ये पाचव्या वेळी आयपीएल चॅम्पियन बनवले होते.

दरम्यान आयपीएल वेळी झालेल्या दुखापतीनंतर धोनीच्या गुढग्यावर शस्त्रक्रिया झाली आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com