Afghanistan Cricket Team Dainik Gomantak
क्रीडा

Asia Cup 2023: अफगाणिस्तान संघाची घोषणा! 'या' अष्टपैलूचे 6 वर्षांनी कमबॅक, तर शाहिदीकडे कॅप्टन्सी

Afghanistan squad: आशिया चषक स्पर्धेसाठी अफगाणिस्तान संघाची घोषणा झाली आहे.

Pranali Kodre

Afghanistan Cricket announced 17-member squad for Asia Cup 2023:

आशिया चषक 2023 स्पर्धेसाठी आता 3 दिवसांचाच कालावधी राहिला असताना अफगाणिस्तानने आपला 17 जणांचा संघ जाहीर केला आहे. 30 ऑगस्टपासून आशियाई स्पर्धेला सुरुवात होणार आहे.

अफगाणिस्तानने नुकतेच पाकिस्तानविरुद्ध झालेल्या वनडे मालिकेत खेळलेल्या संघात काही बदल केले आहेत. आशिया चषक स्पर्धेसाठी फरीद अहमद, अझमतुल्लाह ओमरझाई, शाहिदुल्लाह कमल आणि वफादार मोमंद यांना अफगाणिस्तान संघात स्थान मिळालेले नाही. ओमरझाईला दुखापत झाली असल्याने तो खेळणार नाही.

तसेच करिम जनत, नजीबुल्ला झदरन आणि शराफुद्दीन अश्रफ यांचे अफगाणिस्तान संघात पुनरागमन झाले आहे. जनतचे अफगाणिस्तानच्या वनडे संघात 6 वर्षांनी पुनरागमन झाले आहे. त्याने अफगाणिस्तानकडून एकमेव वनडे सामना 24 फेब्रुवारी 2017 रोजी खेळला होता.

दरम्यान नजीबुल्ला झदरनचे पुनरागमन संघाला मजबूती देईल. दुखापतीमुळे तो पाकिस्तानविरुद्ध वनडे मालिका खेळला नव्हता.

तथापि, अफगाणिस्तान संघात रेहमनुल्ला गुरबाज, इब्राहिम झद्रान हे सलामीवीर संघात आहेत, तर मधली फळी सांभाळण्यासाठी रियाज हसन, मोहम्मद नबी, हशमतुल्ला शाहिदी हे फलंदाज आहेत. शाहिदी नेतृत्वाची धुराही सांभाळेल.

तसेच राशिद खान यांच्यासह गोलंदाजीत मुजीब उर रेहमान फझलहक फारुकी गुलबदिन नायब, अब्दुल रहमान आणि मोहम्मद सलीम यांचाही समावेश आहे.

अफगाणिस्तान संघाचा आशिया चषकात साखळी फेरीसाठी ब गटात समावेश आहे. या गटात श्रीलंका आणि बांगलादेश संघाचाही समावेश आहे. अफगाणिस्तानचा साखळी फेरीत बांगलादेशविरुद्ध 3 सप्टेंबर रोजी लाहोरला पहिला सामना होईल, तसेच श्रीलंकेविरुद्ध 5 सप्टेंबर रोजी लाहोरलाच सामना होईल.

अफगाणिस्तान संघ - हशमतुल्ला शाहिदी (कर्णधार), रहमानउल्ला गुरबाज, इब्राहिम झद्रान, रियाझ हसन, रहमत शाह, नजीबुल्ला झदरन, मोहम्मद नबी, इक्रम अलीखिल, राशिद खान, गुलबदिन नायब, करिम जनत, अब्दुल रहमान, शराफुद्दीन अश्रफ, मुजीब उर रहमान, नूर अहमद, सुलेमान साफी, फजलहक फारुकी

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Pakistani Team: 'पाकिस्तान' टीम खेळणार भारतात! क्रीडा मंत्रालयाकडून ग्रीन सिग्नल; 2 करंडकांमध्ये घेणार भाग

Goa Rain: गोव्यात जिकडे तिकडे पाणीच पाणी! पावसाचा रौद्रावतार; आपत्कालीन यंत्रणा सतर्क

Rahul Keni: गोव्याचे राहुल केणी बनले BCCIचे सामनाधिकारी! पंच परीक्षेत मिळवला सहावा क्रमांक

Goa Crime: रिचार्ज पॅक साठी फोन केला, 44 हजार रुपये केले लंपास; गोकुळवाडी-साखळीतील महिलेला गंडा

Comunidade: 30 कोमुनिदादींची निवडणूक घ्या! सदस्यांची मागणी; गणपूर्तीअभावी रखडल्या प्रक्रिया

SCROLL FOR NEXT