U19 World Cup Dainik Gomantak
क्रीडा

U19 World Cup: अफगाणिस्तानचे पुनरागमन श्रीलंकेचा पराभव

अफगाणिस्तानच्या संघाने अंडर 19 वर्ल्ड कपमध्ये इतिहास रचला आहे. क्रिकेटच्या प्रत्येक विभागात श्रीलंकेचा पराभव करून उपांत्य फेरीचे तिकीट मिळवले आहे.

दैनिक गोमन्तक

अफगाणिस्तानच्या संघाने अंडर 19 वर्ल्ड कपमध्ये इतिहास रचला आहे. क्रिकेटच्या प्रत्येक विभागात श्रीलंकेचा पराभव करून उपांत्य फेरीचे तिकीट मिळवले आहे. यासह अव्वल चारमध्ये पोहोचणारा इंग्लंडनंतरचा हा दुसरा संघ ठरला आहे. (U-19 Cricket World Cup Latest News Updates)

27 जानेवारी रोजी संध्याकाळी खेळल्या गेलेल्या स्पर्धेच्या दुसऱ्या उपांत्यपूर्व फेरीत अफगाणिस्तानने (Afghanistan) श्रीलंकेचा (Sri Lanka) 4 धावांच्या कमी फरकाने पराभव केला. अफगाणिस्तानने आपल्या सर्वात कमी धावसंख्येचा 134 धावांचा बचाव करताना हा विजय नोंदवला होता.

या सामन्यात अफगाणिस्तानने प्रथम फलंदाजी करताना 47.1 षटकात 134 धावा करून संपूर्ण संघ बोद झाला होता. अफगाण संघाकडून अब्दुल हैदीने 37 धावा केल्या. त्यांच्याशिवाय अल्लाह नूरने 25 आणि नूर अहमदने 15 धावा केल्या.

श्रीलंकेसाठी विनुजा रनपुल सर्वात यशस्वी गोलंदाज ठरला, तर त्याने 9.1 षटकात 10 धावांत 5 बळी घेतले. त्याच्याशिवाय कर्णधार ड्युनिथने 36 धावांत 3 फलंदाज बाद केले.

आता श्रीलंकेसमोर 135 धावांचे सोपे लक्ष्य होते. मात्र संपूर्ण संघ 46 षटकांत 130 धावांत गारद झाला. परिणामी अफगाणिस्तानने हा सामना 4 धावांनी जिंकला. श्रीलंकेकडून कर्णधार ड्युनिथने सर्वाधिक 34 धावा केल्या.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

UP Pension Hike: 1.21 कोटी पेन्शनधारकांसाठी खूशखबर! पेन्शनमध्ये होणार घसघशीत वाढ; 'या' राज्य सरकारचं मोठं गिफ्ट

Budh Gochar 2026: करिअर आणि संपत्तीत मोठी झेप! बुध गोचरचा महाचमत्कार; 'या' 5 राशींच्या आयुष्यात येणार सोन्याचे दिवस

Shreyas Iyer Record: धावांचा पाऊस आणि विक्रमी विजय! श्रेयस अय्यरने मोडला धोनीचा रेकॉर्ड; बनला नंबर-1 टी-20 कर्णधार

Telangana ATM Robbery VIDEO: मध्यरात्री 'नाईटी'वाल्या चोरांचा धुमाकूळ! वेल्डिंगने चक्क ATM मशीन फोडली, लाखोंची कॅश घेऊन रातोरात पसार; व्हिडिओ व्हायरल

Virat Kohli Test Retirement News: अजित आगरकरांमुळे विराट कोहलीने कसोटी क्रिकेटमधून घेतली निवृत्ती? वसीम जाफर यांच्या विधानाने क्रिकेटविश्वात चर्चेला उधाण

SCROLL FOR NEXT