Indian Super League: हैदराबादने ओडिशाचा उडवला धुव्वा

आठव्या इंडियन सुपर लीग (Indian Super League) फुटबॉल स्पर्धेतील अग्रस्थान आणखी भक्कम केले. त्यांचे आता सर्वाधिक 23 गुण झाले आहेत.
Hyderabad FC
Hyderabad FC Dainik Gomantak
Published on: 
Updated on: 

पणजी: चुरशीच्या लढतीत हैदराबाद एफसीने पिछाडीवरून ओडिशा एफसीला 3-2 फरकाने नमवून आठव्या इंडियन सुपर लीग (Indian Super League) फुटबॉल स्पर्धेतील अग्रस्थान आणखी भक्कम केले. त्यांचे आता सर्वाधिक 23 गुण झाले आहेत. (Hyderabad FC Defeated Odisha FC In The Indian Super League Football Tournament)

वास्को येथील टिळक मैदानावर झालेल्या लढतीत हैदराबादसाठी (Hyderabad FC) उत्तरार्धात जोएल चिनेज, जुवाव व्हिक्टर व आकाश मिश्रा यांनी प्रत्येकी एक गोल केला. ओडिशातर्फे खिंड लढविताना जेरी माविहमिंगथांगा व जोनाथस ख्रिस्तियन यांनी दोन्ही अर्धात प्रत्येकी एक गोल केला. हैदराबादचा हा 13 लढतीतील सहावा विजय ठरला. त्यांच्यापेक्षा दोन सामने कमी खेळलेल्या दुसऱ्या क्रमांकावरील केरळा ब्लास्टर्सचे 20 गुण आहेत. ओडिशा एफसीला १३ लढतीत सहावा पराभव पत्करावा लागला. 17 गुणांसह ते सातव्या क्रमांकावरच राहिले. स्पर्धेच्या पहिल्या टप्प्यात हैदराबादने ओडिशाचा 6-1 धुव्वा उडविला होता, तुलनेत गुरुवारी भुवनेश्वरच्या संघाने चांगली लढत दिली.

Hyderabad FC
Indian Super League: बंगळूरुने चेन्नईयीनचा उडवला धुव्वा

पूर्वार्धातील एका गोलच्या पिछाडीनंतर हैदराबादने उत्तरार्धात बदल केले. त्याचे सकारात्मक बदल दिसून आले. 45व्या मिनिटास जेरी माविहमिंगथांगा याने ओडिशाला आघाडी मिळवून दिली होती. 51व्या मिनिटास ऑस्ट्रेलियन जोएल चिनेज याने शानदार हेडिंगने हैदराबादला बरोबरी साधून दिली. नंतर तीन मिनिटांत प्रतिहल्ल्यावरील दोन गोलमुळे हैदराबादने 3-1 अशी आघाडी प्राप्त केली. ब्राझीलियन जुवाव व्हिक्टर याने अफलातून ड्रिबलिंग कौशल्य प्रदर्शित करत 70व्या मिनिटास हैदराबादला आघाडी मिळवून दिल्यानंतर आकाश मिश्रा याने 73व्या मिनिटास गोल करून हैदराबादची आघाडी भक्कम केली. 20 वर्षीय बचावपटूचा हा पहिलाच आयएसएल गोल ठरला. 84व्या मिनिटास ब्राझीलियन जोनाथस ख्रिस्तियन याच्या प्रेक्षणीय गोलमुळे ओडिशाला पिछाडी 2-3 अशी कमी करता आली.

Hyderabad FC
Indian Super League: मुंबई सिटीची हुकली संधी

स्पर्धेत सर्वाधिक 12 गोल केलेल्या नायजेरियन बार्थोलोम्यू ओगबेचे याला गुरुवारी गोल नोंदविता आला नाही, पण हैदराबादच्या इतर खेळाडूंनी जबाबदारी चोख बजावली. विशेषतः युवा आकाश मिश्रा उल्लेखनीय ठरला. हैदराबादला त्याच्याच असिस्टवर बरोबरी साधता आली. नंतर त्याने एक गोलही केला. तोच सामन्याचा मानकरी ठरला. 77व्या मिनिटास ओगबेचे याची जागा हावियर सिव्हेरियो याने घेतली. हैदराबादने आता यंदा स्पर्धेत सर्वाधिक 28 गोल केले आहेत

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

Ishan Kishan Breaks 8 Year T20 Record
Small Savings Scheme Interest Rates Q3 2026
India Beats Pakistan 4-3 In Hockey
Ruhani Sharma Virat Kohli sister in law
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com