Sunil Chhetri Dainik Gomantak
क्रीडा

AFC Asian Cup 2023: उझबेकिस्तानविरुद्धही टीम इंडियाचा दारुण पराभव; छेत्री सेनेचा कार्यक्रम फ्लॉप

AFC Asian Cup 2023: भारतीय संघाला या स्पर्धेत आतापर्यंत एकही गोल करता आलेला नाही, तर त्याविरुद्ध पाच गोल झाले आहेत.

Manish Jadhav

AFC Asian Cup 2023: सुनील छेत्रीच्या नेतृत्वाखालील भारतीय फुटबॉल संघाला कतार येथे झालेल्या AFC आशियाई चषक 2023 च्या गट ब मधील दुसऱ्या सामन्यात उझबेकिस्तानविरुद्ध 0-3 अशा फरकाने पराभव पत्करावा लागला. भारतीय संघाचा हा सलग दुसरा पराभव आहे. यापूर्वी भारताला ऑस्ट्रेलियाविरुद्ध 0-2 अशा फरकाने पराभव पत्करावा लागला होता. भारतीय संघाला या स्पर्धेत आतापर्यंत एकही गोल करता आलेला नाही, तर त्याविरुद्ध पाच गोल झाले आहेत.

पहिल्या हाफमध्येच भारत तीन गोलने मागे पडला

दरम्यान, ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्याच्या पूर्वार्धात चमकदार कामगिरी करणाऱ्या भारतीय संघाची उझबेकिस्तानविरुद्ध पहिल्या हाफमध्येच स्थिती बिघडली. सामन्याच्या चौथ्या मिनिटाला उझबेकिस्तानच्या अबोसबेक फैझुल्लाएवने गोल करुन उझबेकिस्तानला 1-0 अशी आघाडी मिळवून दिली. यानंतर इगोर सर्गेव्हने 18व्या मिनिटाला दुसरा गोल करत संघाची आघाडी दुप्पट केली. विशेष म्हणजे, उझबेकिस्तानने पहिला हाफ संपण्यापूर्वी इंज्युरी टाइममध्ये तिसरा गोल केला. यावेळी नसरुल्लेवने हा गोल केला.

सेकंड हाफमध्ये एकही गोल झाला नाही

सामन्याच्या पहिल्या हाफमध्ये 0-3 ने पिछाडीवर पडल्यानंतर दुसऱ्या हाफमध्ये भारतीय संघाने गोल करण्याचा आटोकाट प्रयत्न केला मात्र विजयाचा आत्मविश्वास असलेल्या उझबेकिस्तानच्या खेळाडूंनी गोल करु दिला नाही. अखेरीस उझबेकिस्तानने हा सामना 3-0 अशा फरकाने जिंकला.

आता शेवटच्या सामन्यात सीरियाशी सामना होणार आहे

भारतीय संघाचा तिसरा आणि शेवटचा सामना सीरियासोबत होणार आहे. या सामन्यात भारतीय संघ प्रतिस्पर्धी संघाला काहीशी टक्कर देताना दिसू शकतो. हा सामना 23 जानेवारी 2024 रोजी सायंकाळी 5 वाजल्यापासून खेळवला जाईल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT