Abhishek Sharma Dainik Gomantak
क्रीडा

IND vs WI: अभिषेक शर्माला इतिहास रचण्याची सुवर्णसंधी! SKYचा मोठा रेकॉर्ड निशाण्यावर; दुसऱ्या टी-20 सामन्यात गोल्डन चान्स

Abhishek Sharma T20 Record: टीम इंडियाचा विस्फोटक फलंदाज अभिषेक शर्मा सध्या उत्कृष्ट फॉर्ममध्ये असून चालू वर्षात त्याने धावांच्या बाबतीत स्वतःची वेगळी ओळख निर्माण करत अनेक विक्रम आपल्या नावावर केले.

Manish Jadhav

Abhishek Sharma T20 Record: टीम इंडियाचा विस्फोटक फलंदाज अभिषेक शर्मा सध्या उत्कृष्ट फॉर्ममध्ये असून चालू वर्षात त्याने धावांच्या बाबतीत स्वतःची वेगळी ओळख निर्माण करत अनेक विक्रम आपल्या नावावर केले. भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील दुसरा टी-20 सामना रांचीच्या जेएससीए आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर खेळवला जाणार आहे. या सामन्यातही फलंदाज मैदानावर धावांचा पाऊस पाडतील अशी चाहत्यांना मोठी अपेक्षा असून, विशेषतः अभिषेकवर सर्वांचे लक्ष खिळले आहे.

अभिषेक शर्मा या सामन्यात एक मोठा जागतिक विक्रम रचण्याच्या अगदी जवळ पोहोचला. आपल्या टी-20 आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत दोन हजार धावांचा टप्पा पूर्ण करण्यासाठी त्याला केवळ 53 धावांची आवश्यकता आहे. सध्या हा जागतिक विक्रम भारताचा (India) विस्फोटक फलंदाज सूर्यकुमार यादवच्या नावावर आहे, ज्याने सर्वात कमी चेंडूंचा सामना करुन टी-20 मध्ये दोन हजार धावा पूर्ण केल्या. सूर्यकुमारने या आकड्यापर्यंत पोहोचण्यासाठी 1164 चेंडूंचा सामना केला.

अभिषेक शर्माने आतापर्यंत 63 टी-20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले असून, यामध्ये 1947 धावा केल्या आहेत. या प्रवासात त्याने 3 शतके आणि 13 अर्धशतके झळकावली असून, त्याचा स्ट्राइक रेट 195.29 आणि सरासरी 32.45 इतकी राहिली आहे. विशेष म्हणजे, त्याने दोन हजार धावांचा टप्पा गाठण्यासाठी आतापर्यंत 997 चेंडू खेळले आहेत. म्हणजेच, उर्वरित 166 चेंडूंमध्ये जर त्याने 53 धावा केल्या, तर तो सूर्यकुमार यादवचा विक्रम मोडीत काढून सर्वात जलद दोन हजार धावा करणारा फलंदाज ठरेल.

आयपीएलमध्येही 92 सामन्यांत 2378 धावा करणाऱ्या अभिषेकसाठी 53 धावा करणे कोणतीही मोठी गोष्ट नाही, कारण तो अवघ्या 25 चेंडूंमध्येही हा आकडा गाठण्याची क्षमता राखतो. वेस्ट इंडिजविरुद्धच्या पहिल्या टी-20 सामन्यात त्याला मोठी खेळी करता आली नसली, तरी रांचीची खेळपट्टी फलंदाजीसाठी अत्यंत अनुकूल मानली जात असल्याने या दुसऱ्या सामन्यात तो नक्कीच मोठा चमत्कार घडवू शकतो.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Gas Leak Fire Incident: गॅस गळतीने घरात आगीचा भडका; गोव्यात मायलेकी होरपळल्या, गोमेकॉत उपचार सुरू

Goa Agriculture: गोव्यात पावसाच्या तुटवड्याचा भातशेतीला फटका; 25 हेक्टर क्षेत्राचे नुकसान, शेतकऱ्यांना अर्जाचे आवाहन

VIDEO: मडगाव रेल्वेस्थानक परिसरात एफडीएची धडक कारवाई; 408 किलो मांस जप्त

FDA Raid: गोव्यात विनापरवाना कॅटरर्स, पार्टी हॉलवर एफडीएचा बडगा; तीन आठवड्यांत परवाना घ्या, अन्यथा 10 लाखांपर्यंत दंड!

Lucknow Double Murder: संसारात काळाची सावली! लखनौमध्ये आई आणि मुलीची गळा दाबून निर्घृण हत्या; नेमकं काय घडलं 'त्या' रात्री?

SCROLL FOR NEXT