Abhishek Sharma Record Dainik Gomantak
क्रीडा

IND vs NZ Final: अभिषेक शर्माचा धमाका! फायनलमध्ये 18 चेंडूत फिफ्टी ठोकून मोडला रोहित शर्माचा रेकॉर्ड; किवी गोलंदाजांची उडवली दाणादाण

Abhishek Sharma 18 Ball Fifty: अभिषेकने या सामन्यात सुरुवातीची दोन षटके खेळपट्टी समजून घेण्यासाठी थोडा संयम दाखवला.

Manish Jadhav

Abhishek Sharma Record: अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर रंगलेल्या टी-20 विश्वचषक 2026 च्या फायनल सामन्यात भारतीय युवा सलामीवीर अभिषेक शर्माने धावांची अशी काही त्सुनामी आणली की, न्यूझीलंडचं सर्वच गणितं कोलमडून पडलं. संपूर्ण स्पर्धेत ज्या अभिषेकच्या फॉर्मवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात होते, त्याने फायनल सामन्यात 52 धावांची खेळी खेळून केवळ टीकाकारांची बोलती बंद केली नाही, तर विश्वचषकाच्या इतिहासात अनेक रेकॉर्ड मोडीत काढले. नाणेफेक जिंकून पहिल्यांदा गोलंदाजी करण्याचा न्यूझीलंडचा निर्णय अभिषेकने आपल्या तुफानी फलंदाजीने पहिल्या पॉवरप्लेमध्येच चुकीचा ठरवला.

अभिषेकने या सामन्यात सुरुवातीची दोन षटके खेळपट्टी समजून घेण्यासाठी थोडा संयम दाखवला, पण तिसऱ्या षटकापासून त्याने गिअर बदलला आणि किवी गोलंदाजांची धुलाई सुरु केली. अभिषेकने अवघ्या 18 चेंडूत आपले अर्धशतक पूर्ण केले. यासह तो टी-20 विश्वचषकाच्या इतिहासात 'नॉकआउट' सामन्यात सर्वात वेगवान अर्धशतक ठोकणारा जगातील पहिला फलंदाज ठरला. याबाबतीत त्याने इंग्लंडच्या जेकब बेथेलचा विक्रम मोडीत काढला, ज्याने याच विश्वचषकाच्या उपांत्य फेरीत भारताविरुद्ध 19 चेंडूत पन्नास धावा केल्या होत्या. अभिषेकच्या या खेळीमुळे त्याने युवराज सिंग (20 चेंडू विरुद्ध ऑस्ट्रेलिया, 2007) आणि माईक हसी यांसारख्या दिग्गजांना मागे टाकले.

केवळ जागतिक विक्रमच नाही, तर अभिषेकने टीम इंडियाचा माजी कर्णधार आणि 'हिटमॅन' रोहित शर्माच्या एका मोठ्या रेकॉर्डची बरोबरी केली. टी-20 विश्वचषकाच्या पॉवरप्लेमध्ये (पहिली 6 षटके) सर्वाधिक धावा करणाऱ्या भारतीय फलंदाजांच्या यादीत अभिषेक आता रोहितच्या बरोबरीत आला. रोहितने 2024 च्या विश्वचषकात ऑस्ट्रेलियाविरुद्ध पॉवरप्लेमध्ये 51 धावा केल्या होत्या, आज अभिषेकनेही न्यूझीलंडविरुद्ध पॉवरप्लेमध्ये 51 धावा कुटल्या. यासोबतच, भारतासाठी टी-20 विश्वचषकात सर्वात वेगवान अर्धशतक करणाऱ्या खेळाडूंमध्ये अभिषेक आता संयुक्तपणे दुसऱ्या क्रमांकावर पोहोचला. त्याने केएल राहुलच्या 18 चेंडूंतील अर्धशतकाची बरोबरी केली असून या यादीत आजही युवराज सिंग 12 चेंडूंतील अर्धशतकासह अव्वल स्थानी कायम आहे.

अभिषेक शर्माची ही 52 धावांची खेळी भारताला विजेतेपदाच्या दिशेने घेऊन जाणारी ठरु शकते. मोठ्या सामन्यात कशा प्रकारे निर्भीड फलंदाजी करावी, याचा वस्तुपाठच त्याने आज अहमदाबादच्या मैदानावर घालून दिला. सुरुवातीला संथ खेळणाऱ्या अभिषेकने तिसऱ्या षटकापासून जो पवित्रा घेतला, त्यासमोर सँटनरचे सर्व गोलंदाज हतबल दिसले.

टी-20 विश्वचषकाच्या इतिहासात भारतासाठी सर्वात कमी चेंडूंमध्ये अर्धशतक करणारे खेळाडू

युवराज सिंग - 12 चेंडू विरुद्ध इंग्लंड (2007)

अभिषेक शर्मा - 18 चेंडू विरुद्ध न्यूझीलंड 2026)

केएल राहुल - 18 चेंडू विरुद्ध स्कॉटलंड (2021)

रोहित शर्मा - 19 चेंडू विरुद्ध ऑस्ट्रेलिया (2024)

युवराज सिंग - 20 चेंडू विरुद्ध ऑस्ट्रेलिया (2007)

ईशान किशन - 20 चेंडू विरुद्ध नामिबिया (2026)

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Grah Gochar 2026: 1 सप्टेंबरला बनणार 6 शक्तिशाली राजयोग! 'या' राशींची तिजोरी पैशांनी भरणार; होणार अफाट धन वर्षाव

Weather Update: ऑगस्टमध्ये समाधानकारक पाऊस, सर्वाधिक वाळपईत; जुलैमधील पावसाचा तुटवडा मात्र कायम

Marcel Road Issue: माशेलात 'वर्दळीचा' रस्ता धोकादायक, खड्ड्यांमुळे वाहतुकीला अडथळा; पावसात दुचाकीस्वारांसमोर मोठे संकट

Panaji: थकीत घरपट्टीचा फटका भाडेकरूंना; उत्पन्नाचा दाखला मिळविताना भाडेकरूंच्या मुलांची मोठी कसरत

Police Attack Viral Video: पीएसआयचा गळा आवळला, लोखंडी साखळीने हल्ला... लखनऊमध्ये अतिक्रमण हटवताना राडा; दोन महिलांसह 6 जणांना बेड्या

SCROLL FOR NEXT