Abhishek Sharma Dainik Gomantak
क्रीडा

IND vs AFG: 18 चौकार, 22 षटकार अन् 229 धावा! अभिषेक शर्मा ठरला T20 मालिकेचा 'किंग'; टीम इंडियाच्या युवा ब्रिगेडचा करिष्मा

IND vs AFG, Abhishek Sharma: संपूर्ण मालिकेत अभिषेकने आपल्या बॅटने अक्षरशः धुमाकूळ घातला. तीन सामन्यांच्या या मालिकेत त्याने 76.33 च्या सरासरीने आणि 269.41 च्या स्ट्राइक रेटने सर्वाधिक 229 धावा काढल्या.

Manish Jadhav

IND vs AFG, Abhishek Sharma: नवी दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या तिसऱ्या आणि फायनल टी-20 सामन्यात टीम इंडियाने अफगाणिस्तानचा 127 धावांच्या मोठ्या फरकाने पराभव केला. या शानदार विजयासह टीम इंडियाने तीन सामन्यांची टी-20 मालिका 3-0 अशा रितीने खिशात घातली. भारताच्या या मालिका विजयाचा खरा शिल्पकार ठरला तो स्टार फलंदाज अभिषेक शर्मा, ज्याने आपल्या विस्फोटक फलंदाजीने अफगाणिस्तानच्या गोलंदाजांची पुरती दाणादाण उडवून दिली.

या तिसऱ्या सामन्यात अभिषेकचे रौद्र रुप पाहायला मिळाले. त्याने अवघ्या 34 चेंडूंत 9 चौकार आणि 11 षटकारांच्या मदतीने 108 धावांची धमाकेदार खेळी खेळली. विशेष म्हणजे, अभिषेकने अवघ्या 30 चेंडूंत आपले शतक ठोकून कसोटी खेळणाऱ्या देशांमधील फलंदाजांमध्ये सर्वात वेगवान शतक ठोकण्याचा नवा जागतिक रेकॉर्ड केला. त्याच्या या तुफानी खेळीच्या जोरावर भारताने पहिल्यांदा फलंदाजी करताना 20 षटकांत 221 धावांचा डोंगर उभा केला. प्रत्युत्तरादाखल 222 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना अफगाणिस्तानचा संपूर्ण संघ अवघ्या 94 धावांवर गारद झाला. 317 हून अधिकच्या स्ट्राइक रेटने धावा करणाऱ्या अभिषेक शर्माला 'सामनावीर'चा किताब देण्यात आला.

संपूर्ण मालिकेत अभिषेकने आपल्या बॅटने अक्षरशः धुमाकूळ घातला. तीन सामन्यांच्या या मालिकेत त्याने 76.33 च्या सरासरीने आणि 269.41 च्या स्ट्राइक रेटने सर्वाधिक 229 धावा काढल्या, ज्यामध्ये एक शतक आणि एका अर्धशतकाचा समावेश होता. त्याने या मालिकेत तब्बल 18 चौकार आणि 22 षटकार ठोकले. या अतुलनीय कामगिरीसाठी त्याला 'प्लेयर ऑफ द सिरीज' पुरस्कारानेही सन्मानित करण्यात आले. मालिकेतील पहिल्या सामन्यातही त्याने 32 चेंडूंत 82 धावांची धडाकेबाज खेळी खेळली.

अभिषेकव्यतिरिक्त या मालिकेत संजू सॅमसनने 3 सामन्यांत 117 धावा करुन चमकदार कामगिरी केली. तर गोलंदाजीत युवा अष्टपैलू नितीश कुमार रेड्डीने सर्वाधिक 6 बळी टिपले आणि वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंगने 5 बळी घेत त्याला उत्तम साथ दिली. टीम इंडियाच्या (Team India) या दणदणीत विजयामुळे आणि अभिषेक शर्माच्या ऐतिहासिक जागतिक रेकॉर्डमुळे क्रिकेट जगतात भारतीय युवा खेळाडूंच्या ताकदीचा डंका पुन्हा एकदा वाजला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

खरी कुजबुज: भाजपचा शिस्तीचा बडगा कोसळला!

Agniveer Job News: अग्निवीरांसाठी मोदी सरकारचा मोठा दिलासा! 4 वर्षांचा कार्यकाळ संपताच हातात असणार दुसरी सरकारी नोकरी; काय आहे नेमका प्लॅन?

Porvorim Elevated Road: पर्वरी उन्नत मार्गावरील वाहतूक कोंडीचा गुंता सुटणार? रविवारी तज्ज्ञांची पाहणी; सोमवारी संयुक्त बैठकीत मोठा निर्णय

Horoscope 18 September 2026: शुक्रवारचा ग्रहांचा महासंयोग! 5 राशींना होणार अफाट आर्थिक फायदा; रखडलेली कामे चुटकीसरशी मार्गी लागणार

PM Modi Birthday: टाइम्स स्क्वेअरवर पंतप्रधान मोदींचा गौरव! भारतीय समुदायाने दिल्या वाढदिवसाच्या खास शुभेच्छा; 140 कोटी भारतीयांसाठी अभिमानाचा क्षण

SCROLL FOR NEXT