RCB Match Today Dainik Gomantak
क्रीडा

AB de Villiers:"जुन्या गोष्टी बोलू नका!" नकारात्मक कमेंट्रीमुळे डिव्हिलियर्स चिडला; समालोचकांना दिला 'कडक' इशारा

AB de Villiers on IPL commentary: रॉयल चॅलेंजर्सच्या गोलंदाजांवर केलेल्या नकारात्मक टिप्पणी बद्दल एबी डिव्हिलियर्सने कमेंटेटर्सना चांगलंच फटकारलं

Akshata Chhatre

de Villiers angry on commentators: इंडियन प्रीमियर लीगच्या १८ व्या हंगामातील रॉयल चॅलेंजर्स बंगळूर आणि लखनौ सुपर जायंट्स यांच्यातील अखेरच्या लीग सामन्यात रॉयल चॅलेंजर्सच्या गोलंदाजांवर केलेल्या नकारात्मक टिप्पणी बद्दल दक्षिण आफ्रिकेचा माजी कर्णधार आणि रॉयल चॅलेंजर्सचे पूर्व खेळाडू एबी डिव्हिलियर्सने कमेंटेटर्सना चांगलंच फटकारलं आहे.

रॉयल चॅलेंजर्स बंगळूर आणि लखनौ सामन्यादरम्यानची कॉमेंटरी ऐकून त्याला खूप राग आल्याचं तो म्हणालाय. एकाना स्टेडियमवर झालेल्या या हाय-स्कोअरिंग सामन्यात रॉयल चॅलेंजर्सने २२८ धावांचे लक्ष्य गाठून टॉप-२ मध्ये स्थान मिळवलं, यामुळे त्यांना पंजाब किंग्ज विरुद्ध क्वालिफायर-१ मध्ये खेळण्याची संधी मिळाली असून, अंतिम फेरीत पोहोचण्यासाठी आता त्यांच्यासमोर दोन संधी निर्माण झाल्यात.

या सामन्यात रॉयल चॅलेंजर्सच्या गोलंदाजांवर अनावश्यक टीका केल्याबद्दल डिव्हिलियर्सने कमेंटेटर्सना चांगलंच सुनावलंय. खेळपट्टीची स्थिती समजून घेण्याचा प्रयत्न न करताच ही टीका केली जात होती, असे त्याचं म्हणणं आहे.

"मी काल रात्री कमेंट्री ऐकली आणि खरं सांगायचं तर मला खूप राग आला," असं डिव्हिलियर्सने आपल्या यूट्यूब चॅनेलवर सांगितलं. "जेव्हा आम्ही गोलंदाजी करत होतो, तेव्हा ते खूप नकारात्मक बोलत होते. ते सतत म्हणत होते, '' चॅलेंजर्सची गोलंदाजी दबावात आहे. ते जिंकतील असं वाटत नाही. पुन्हा एकदा, एक फॉर्ममधील संघ आपली गती गमावत आहे.''

विराट कोहलीच्या सर्वात जवळच्या मित्रांपैकी एक असलेल्या डिव्हिलियर्सने २०११ ते २०२१ दरम्यान ११ हंगामांसाठी रॉयल चॅलेंजर्सचं प्रतिनिधित्व केलंय आणि १५८.३३ च्या स्ट्राइक रेटने ५४२२ धावा केल्यात. त्याच्या म्हणण्यानुसार कमेन्टटर्स आणि घडून गेलेल्या गोष्टींमधून बाहेर पडलेच नाहीत. "मान्य आहे रॉयल चॅलेंजर्स कधी जिंकले नाही पण जुन्या गोष्टी बोलत बसण्यात अर्थ नाही ते निरुपयोगी" असल्याचं डिव्हिलियर्स म्हणालाय.

आता फक्त एका सुपर स्टारवर अवलंबून नाही!

डिव्हिलियर्स म्हणला की, सध्याची टीम कोणत्याही एका सुपरस्टारवर अवलंबून नाही. "या हंगामात मला सर्वात जास्त आनंद कशाचा आहे, तर तो म्हणजे अनेक खेळाडू जबाबदारी उचलत आहेत, फक्त एक किंवा दोन नाहीत याचा." असं म्हणत त्यानं कृणाल पंड्या आणि हेझलवूड बरोबरच इतरांचं कौतुक केलं. आज रॉयल चॅलेंजर्स समोर अंतिम सामन्यात दाखल होण्याची संधी निर्माण झालीये, आता टीम याचं सोनं करते का हे पाहावं लागेल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

USA Tariff: रशियाशी जवळीक पडली महागात? अमेरिकेने भारतावर लावला 25 टक्के टॅरिफ, शेअर बाजारात भूकंपाची शक्यता!

Raksha Bandhan: रक्षाबंधनाला कधीपर्यंत राखी बांधता येईल? भद्रकाळ टाळा, नेमका शुभमुहूर्त जाणून घ्या

Goa Assembly Live: मंत्री बाबूश मोन्सेरात आणि गोवा कचरा व्यवस्थापन महामंडळच्या निर्णयाचे डॉ. देविया राणे यांनी केले कौतुक

Japan Tsunami Photos: जपानमध्ये त्सुनामीचा हाहाकार! 20 लाख लोकांना घर सोडण्याचे निर्देश; धडकी भरवतात फोटो

गोव्यात बेकायदा बांधकामांना बसणार चाप; मंत्री माविन गुदिन्हो यांची कायदा करण्याची घोषणा

SCROLL FOR NEXT