Manish Jadhav
आयपीएल 2025 मध्ये किंग कोहलीच्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने प्लेऑफमध्ये धडक मारली आहे.
पहिल्या आयपीएल जेतेपदाच्या प्रतीक्षेत असलेला आरसीबी सध्या पॉइंट टेबलमध्ये तिसऱ्या स्थानी असून पुढचा लीग सामना 27 मे रोजी लखनौ सुपर जायंट्स विरुद्ध खेळणार आहे.
आरसीबीला हा सामना जिंकून पॉइंट टेबलमध्ये अव्वल स्थान मिळवायचे आहे, परंतु या सामन्यापूर्वीच त्यांनी आयपीएलमधील सर्व संघांना मागे सोडले.
यंदाच्या आयपीएल हंगामात चमकदार कामगिरी करणाऱ्या आरसीबीच्या फॉलोअर्समध्ये कमालीची वाढ झाली. इंस्टाग्रामवर आरसीबीच्या फॉलोअर्सची संख्या 20 दशलक्ष म्हणजेच 2 कोटींवर पोहोचली.
हंगामाला सुरुवात झाल्यापासून विराट जबरदस्त फॉर्ममध्ये दिसत आहे. यामुळेच कदाचित संघाच्या फॉलोअर्सच्या संख्येत वाढ झाली.
फॉलोअर्सच्या बाबतीत आरसीबीनंतर चेन्नई सुपर किंग्ज संघ दुसऱ्या स्थानी आहे. ज्याचे 18.6 दशलक्ष चाहते आहेत. तर तिसऱ्या स्थानी मुंबई इंडियन्स आहे, ज्याचे इंस्टाग्रामवर 1 कोटी 80 लाख फॉलोअर्स आहेत.
पहिल्या विजेतेपदाच्या प्रतीक्षेत असलेल्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने या हंगामात आतापर्यंत शानदार कामगिरी केली. आरसीबीने आतापर्यंत 13 सामने खेळले असून त्यापैकी 8 सामने जिंकले तर 4 सामने गमावले आहेत. तर एक सामना पावसामुळे रद्द झाला.