Aaron Finch BBL
क्रीडा

Aaron Finch: T20 वर्ल्डकप विजेत्या फिंचचा क्रिकेटला अलविदा, संघाने दिला विजयी निरोप

Aaron Finch Retirement: ऍरॉन फिंचने प्रोफेशनल क्रिकेटमधून निवृत्ती घेतली असून शनिवारी शेवटचा सामना खेळला.

Pranali Kodre

Aaron Finch retires from T20 cricket:

ऑस्ट्रेलियाचा दिग्गज क्रिकेटपटू ऍरॉन फिंचने शनिवारी त्याच्या प्रोफेशनल कारकिर्दीतील अखेरचा सामना खेळला. त्याने शनिवारी बिग बॅश लीगमधील मेलबर्न रेनेगेड्सकडून मेलबर्न स्टार्स संघाकडून अखेरचा टी20 सामना खेळला.

फिंचने यापूर्वीच आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली असून तो टी20 क्रिकेट स्पर्धांमध्ये खेळत होता. पण आता त्याने टी20 क्रिकेटमधून देखील निवृत्ती घेतली. दरम्यान, त्याच्या अखेरच्या सामन्यात रेनेगेड्सने त्याला विजयी निरोप दिला. संघ जिंकला असला, तरी मात्र फिंच त्याच्या अखेरचा सामन्यात शुन्यावर बाद झाला.

फिंच ऑस्ट्रेलियाचा टी20 क्रिकेटमधील एक उत्तम खेळाडू राहिला आहे. त्याने त्याच्या संपूर्ण टी20 कारकिर्दीत 387 सामने खेळले असून 33.60 च्या सरासरीने 11458 धावा केल्या. यामध्ये 8 शतके आणि 77 अर्धशतकांचा समावेश आहे. तो ऑस्ट्रेलियाचा टी20 क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणारा डेव्हिड वॉर्नरनंतरचा (11732) दुसऱ्या क्रमांकाचा फलंदाज आहे.

तसेच टी20 क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या क्रिकेटपटूंमध्ये तो सातव्या क्रमांकावर आहे. फिंचने या 387 टी20 सामन्यांमधील 103 सामने आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळले असून 2 शतके आणि 19 अर्धशतकांसह 34.28 च्या सरासरीने 3120 धावा केल्या आहेत. तो आंतरराष्ट्रीय टी20 क्रिकेटमध्ये 3000 धावा करणारा ऑस्ट्रेलियाचा एकमेव फलंदाज आहे.

याशिवाय बीबीएलमध्येही तो सर्वाधिक धावा करणारा ख्रिस लिननंतरचा दुसऱ्या क्रमांकाचा फलंदाज आहे. लिनने 3725 धावा केल्या आहेत, तर फिंचने 3311 धावा केल्या आहेत. 2018-19 मध्ये फिंचच्या नेतृत्वाखाली मेलबर्न रेनेगेड्सने बीबीएलचे विजेतेपदही जिंकले.

वर्ल्डकप विजेता कर्णधार

फिंचने 2014 ते 2022 दरम्यान ऑस्ट्रेलिया संघाचे आंतरराष्ट्रीय टी20 क्रिकेटमध्ये नेतृत्वही केले. त्याने 76 आंतरराष्ट्रीय टी20 सामन्यात ऑस्ट्रेलियाचे नेतृत्व करताना 40 विजय मिळवले, तर 32 पराभव पाहिले. 1 सामना बरोबरीत सुटला, तर 3 सामन्यांचा निकाल लागलेला नाही.

फिंच आंतरराष्ट्रीय टी20 क्रिकेटमध्ये सर्वाधक सामन्यात नेतृत्व करणारा कर्णधार आहे. त्याच्या पोठोपाठ एमएस धोनी आणि ओएन मॉर्गन आहे. या दोघांनी प्रत्येकी 72 आंतरराष्ट्रीय टी20 सामन्यांमध्ये नेतृत्व केले आहे. फिंचच्याच नेतृत्वाखाली ऑस्ट्रेलियाने 2021 साली टी20 वर्ल्डकपचे विजेतेपदही पटकावले.

वनडे आणि कसोटीतील कामगिरी

फिंचने त्याच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत 5 कसोटी सामने खेळले आहेत. यामध्ये त्याने २७८ धावा केल्या. तसेच 146 वनडे सामन्यांत त्याने 17 शतके आणि 30 अर्धशतकांसह 5406 धावा केल्या आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

DA Hike: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी जॅकपॉट! जानेवारी 2027 पर्यंत महागाई भत्ता पोहोचणार तब्बल 67 टक्क्यांवर; जाणून घ्या किती होणार फायदा

Jasprit Bumrah Record: भारताचा ‘बूम-बूम’ जलवा! जसप्रीत बुमराहचा महापराक्रम, टी-20 क्रिकेटमध्ये रचला इतिहास; असा मान मिळवणारा ठरला पहिलाच भारतीय गोलंदाज

Shocking Video: एका दिवसापूर्वीच राहायला आला, इमारतीच्या 43व्या मजल्यावरुन घेतली उडी, तरुणानं उचललं टोकाचं पाऊल; धडकी भरवणार व्हिडिओ व्हायरल

Sikh Driver Attack: शीख चालकाची दाढी ओढली, डोक्यात वार करुन बस केली हायजॅक! ब्रिटनमधील संतापजनक घटनेनं खळबळ VIDEO

Women T20 Cricket: शिखाची अर्धशतकी झुंज निष्फळ; चंडीगडने गोव्याला 62 धावांनी धुतले

SCROLL FOR NEXT