David Warner: एन्ट्री असावी तर अशी! भावाच्या लग्नातून वॉर्नर हेलिकॉप्टरने थेट मैदानात, पाहा Video

BBL: वॉर्नरची बीबीएलच्या सामन्यासाठी हेलिकॉप्टरमधून मैदानात रॉयल एन्ट्री! पाहा Video
David Warner
David WarnerX/ThunderBBL
Published on
Updated on

David Warner arrived SCG in a helicopter for Sydney Thunder vs Sydney Sixers BBL match watch Video

ऑस्ट्रेलियामध्ये सध्या बिग बॅश लीग स्पर्धा सुरू आहे. या स्पर्धेत शुक्रवारी (12 जानेवारी) सिडनी थंडर्स विरुद्ध सिडनी सिक्सर्स संघात सिडनीला सामना होणार आहे. या सामन्यात थंडर्सकडून खेळण्यासाठी डेव्हिड वॉर्नरची थेट हेलिकॉप्टरमधून एन्ट्री झाली.

वॉर्नर काही दिवसांपूर्वीच कसोटीतून निवृत्ती स्विकारल्यानंतर त्याच्या भावाच्या लग्नासाठी हंटर वॅलीमध्ये गेला होता. त्यामुळे तेथून त्याला सिडनीच्या मैदानात हेलिकॉप्टरमधून आणण्यात आले. तो सामन्यासाठी स्थानिकवेळेनुसार संध्याकाळी 5 वाजण्याच्या आधी पोहोचला.

तो हेलिकॉप्टरमधून मैदानात उतरल्याचा व्हिडिओ सध्या वाऱ्यासारखा व्हायरल होत आहे. दरम्यान, या सामन्यात स्टीव्ह स्मिथ विरुद्ध डेव्हिड वॉर्नर असा सामना पाहायला मिळू शकतो. स्मिथ सिक्सर्स संघाचा भाग आहे.

David Warner
BBL Video: गलती से मिस्टेक! थर्ड अंपायरने दाबले चुकीचे बटण अन् नाबाद फलंदाज झाला बाद, पाहा नंतर काय झालं

थंडर्सने गेल्या हंगामात वॉर्नरची मोठ्या रकमेचा करार केला आहे. हा करार दोन वर्षांसाठी आहे. वॉर्नर या हंगामात थंडर्ससाठी तीन सामने खेळणार आहे. दरम्यान, थंडर्सला बाद फेरीत पोहचण्याची संधी खूप कमी आहे. दरम्यान, बाद फेरीदरम्यान, वॉर्नर युएईला ILT20 स्पर्धेसाठी जाणार आहे.

तथापि, ही स्पर्धा चालू असली तरी, तो पुन्हा ऑस्ट्रेलियाकडून वेस्ट इंडिजविरुद्ध टी20 मालिका खेळण्यासाठी परतण्याची शक्यता आहे. ऑस्ट्रेलिया आणि वेस्ट इंडिज संघात 9 ते 13 फेब्रुवारीदरम्यान टी20 मालिका होणार आहे.

त्याआधी ऑस्ट्रेलिया वेस्ट इंडिजविरुद्ध वनडे आणि कसोटी मालिकाही खेळणार आहे. मात्र, वॉर्नरने जानेवारीच्या सुरुवातीलाच वनडे आणि कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. त्यामुळे तो वनडे आणि कसोटी मालिकेसाठी ऑस्ट्रेलिया संघाचा भाग नाही.

David Warner
David Warner Video: टाळ्यांचा कडकडाट अन् डोळ्यात पाणी, वॉर्नरचा कसोटीला निरोप! मैदानातून परतताना छोट्या फॅनलाही गिफ्ट

दरम्यान, कसोटी आणि वनडेतून निवृत्ती घेतली असली, तरी वॉर्नर जूनमध्ये होणारा टी20 वर्ल्डकप 2024 स्पर्धा खेळण्याची शक्यता आहे.

37 वर्षीय वॉर्नरने आंतरराष्ट्रीय टी20 क्रिकेटमध्ये 99 सामने खेळले असून 1 शतक आणि २४ अर्धशतकांसह 2894 धावा केल्या आहेत. तसेच त्याने त्याच्या कारकिर्दीत आत्तापर्यंत 356 टी20 सामने खेळले असून 37.60 च्या सरासरीने आणि 8 शतके व 99 अर्धशतकांसह 11695 धावा केल्या आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com