Goa Boxers squad for the National Youth Men's Boxing Tournament Dainik Gomantak
क्रीडा

Youth National Tournament : बॉक्सिंगमध्ये गोव्याची चांगल्या कामगिरीची अपेक्षा

गोव्याचा सात सदस्यीय पुरुष संघ सिक्कीमला रवाना

किशोर पेटकर

Boxing : सिक्कीममधील गंगटोक येथे होणाऱ्या सहाव्या राष्ट्रीय युवा पुरुष बॉक्सिंग स्पर्धेत गोव्याचा सात सदस्यीय संघ भाग घेईल. या स्पर्धेत गोमंतकीय बॉक्सर्सकडून चांगल्या कामगिरीची अपेक्षा आहे.

भारतीय बॉक्सिंग महासंघाची ही स्पर्धा 13 ते 18 जून या कालावधीत होणार असून देशातील प्रमुख युवा बॉक्सर या स्पर्धेत खेळतील.

गोवा हौशी बॉक्सिंग संघटनेने निवडलेल्या संघात लक्ष्मण तोरलकर (४६-४८ किलोगट), अशोक चव्हाण (४८-५१ किलोगट), श्रीनिवास लमाणी (५१-५४ किलोगट), जीत रॉय (५४-५७ किलोगट), संजय गावकर (६०-६३.५ किलोगट), वेदांत कोरगावकर (६३.५-६७ किलोगट) व सुयश परब (७५-८० किलोगट) यांचा समावेश आहे. गोव्याच्या बॉक्सरसाठी संघटनेतर्फे निवड चाचणी घेतली होती व निवडलेल्या खेळाडूंसाठी खडतर सराव शिबिर घेण्यात आले. गोव्याच्या संघासमवेत नीलेश खानोलकर व अबू तालिब खान प्रशिक्षक आहेत.

राज्य संघटना आशावादी

‘‘युवा बॉक्सरचा आमचा संघ बलवान आणि समतोल आहे. शिबिरात खेळाडूंत भरपूर समर्पित वृत्ती आणि शिस्त प्रदर्शित केली. कौशल्य, तंदुरुस्ती आणि तंत्रावर त्यांनी मेहनत घेतली असून ते आव्हानासाठी सज्ज आहेत. राज्यासाठी अभिमानास्पद अशी कामगिरी ते बजावतील याबाबत आम्ही आशावादी आहोत,’’ असे राज्य बॉक्सिंग संघटनेचे सचिव मुख्तार अमलानी यांनी सांगितले.

‘‘केवळ सहभागासाठी आम्हाला तेरा सदस्यीय पूर्ण क्षमतेचा संघ पाठवायचा नव्हता. राष्ट्रीय स्पर्धेचा दर्जा खूप उंचावलेला आहे, त्यामुळे आम्ही सात बॉक्सर्सचीच निवड केली,’’ असे राज्य संघटनेच्या खजिनदार दानुष्का दा गामा यांनी सांगितले. त्या महासंघाच्या पश्चिम विभाग संयुक्त सचिवही आहेत.

लेनी डिगामा स्पर्धेत तांत्रिक प्रतिनिधी

भारताचे बॉक्सिंगमधील ज्येष्ठ आंतरराष्ट्रीय तांत्रिक अधिकारी गोमंतकीय लेनी डिगामा सिक्कीमधील स्पर्धेत तांत्रिक प्रतिनिधी असतील. हल्लीच आंतरराष्ट्रीय बॉक्सिंग संघटनेने त्यांना उप तांत्रिक प्रतिनिधी हा दर्जा प्रदान केला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Water Taxi: गोव्यात लवकरच धावणार पाण्यावरची टॅक्सी! कोचीचे पथक करणार पाहणी; प्रवाशांना मिळणार नवा पर्याय

Goa News Live: ओपा पाणी प्रक्रिया प्लांटमध्ये विद्युत बिघाड, तिसवाडी, फोंड्यात मर्यादीत पाणी पुरवठा

Goa Politics: खरी कुजबुज; पैशांसाठी भारतीय स्त्रिया बनल्या विधवा?

Goa Rain: गोव्यात अतिवृष्टीने दाणादाण! शाळांना सुट्टी, अनेक ठिकाणी पडझड; पुन्हा ऑरेंज अलर्ट जारी

Women Workers Goa: महिला कामगारांबाबत महत्वाचा निर्णय! वेळ निश्चिती, सुरक्षितेबाबत अधिसूचना जारी

SCROLL FOR NEXT