Goa Government On Monsoon : शुक्रवारी रात्रीपासून मॉन्सूनपूर्व सरींचा राज्यातील विविध भागांत शिडकाव सुरू झाला आहे. तसेच आज शनिवारीही पावसाने हजेरी लावली आहे. त्यामुळे उकाड्याने हैराण झालेल्या जनतेला काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे.
दरम्यान येत्या 48 तासांत मॉन्सून गोव्यात धडकणार असल्याची शक्यता हवामान खात्याद्वारे वर्तविण्यात आली आहे. तसेच गोव्याला बिपरजॉय चक्रीवादळाचा फटका बसण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. प्रशासनातर्फे आपत्कालीन परिस्थितीत मदतीसाठी संपर्क क्रमांक जाहीर करण्यात आले आहेत.
अरबी समुद्रातील बिपरजॉय चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर समुद्र खवळलेला असून गोव्याच्या किनारपट्टीवर उंचच उंच लाटांचा धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे गोव्यातील मच्छीमारांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
आतापर्यंत सर्वाधिक पेडणे, त्याखालोखाल म्हापसा, पणजी, साखळी, काणकोण, दाबोळी, मुरगाव, सांगे आदी भागांत मॉन्सूनपूर्व पाऊस पडल्याचे निरीक्षण गोवा वेधशाळेने नोंदवले आहे.
नागरिकांना सतर्कतेचा इशारा
गोवा राज्य आपत्कालीन व्यवस्थापन प्राधिकरणाने सतर्कतेचा ईशारा दिला असला, तरी नागरिकांनी घाबरू नये. मात्र, समुद्र किनाऱ्यावर स्नानासाठी जाऊ नये, तसेच बोटी व लहान जहाजे न चालविण्याचा सल्ला देण्यात आला आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.