A minute of silence observed by Indian Hockey Team: शुक्रवारी संध्याकाळी ओडिशामध्ये घडलेल्या रेल्वे अपघाताबद्दल केवळ भारतातूनच नाही, तर जगभरातून शोक व्यक्त होत आहे. या गंभीर अपघातात शकडो लोकांना जीव गमवाव लागला आहे. याच दुर्घटनेबद्दल भारतीय हॉकी संघानेही मौन पाळले होते.
ओडिशातील बालासोर येथे शुक्रवारी (2 जून) संध्याकाळी हावडाहून चेन्नईला जाणारी कोरोमंडल एक्सप्रेस, बंगळुरू-हावडा सुपरफास्ट एक्सप्रेस आणि मालगाडी यांचा एकमेकांना धडकून मोठा अपघात झाला. या अपघातात मोठी जीवितहानी झाली आहे.
सध्या समोर आलेल्या आकड्यांनुसार या अपघातात मृतांची संख्या 280 वर पोहोचली आहे. त्याचबरोबर, 900 हून अधिक जखमींवर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. हा गेल्या १५ ते २० वर्षांतील सर्वात मोठ्या रेल्वे अपघातांपैकी एक असल्याचे सांगितले जात आहे.
भारतीय पुरुष हॉकी संघ सध्या प्रो लीगमधील सामने खेळण्यासाठी युरोप दौऱ्यावर आहे. त्यांचा शनिवारी ग्रेट ब्रिटनविरुद्ध सामना झाला. या सामन्यापूर्वी भारतीय संघातील खेळाडूंनी एक मिनिट मौन पाळत ओडिशा रेल्वे दुर्घटनेतील पीडित लोकांच्या कुटुंबीय आणि जीवलगांसाठी प्रार्थना केली.
यावेळी भारताचा तिरंगाही अर्ध्यावर उतरवण्यात आला होता. तसेच खेळाडूंनी या दुर्घटनेबद्दल शोक व्यक्त करण्यासाठी सामन्यादरम्यान दंडाला काळी पट्टी बांधली होती.
शनिवारी भारत आणि ग्रेट ब्रिटन संघातील सामना चांगलाच चुरशीचा झाला होता. निर्धारित वेळेनंतर हा सामना 4-4 अशा फरकाने बरोबरीत सुटला होता. त्यामुळे सामन्याचा निकाल शुटआऊटने लावण्यात आला. शुटआऊटमध्ये भारताने 4-2 अशा फरकाने विजय मिळवला.
भारताचा हा सलग दुसरा विजय आहे. भारतीय संघाने यापूर्वी बेल्जियमला 5 अशा फरकाने पराभूक केले होते.
दरम्यान, ब्रिटनविरुद्धच्या सामन्यात गोलकिपर कृष्णन पाठकने शानदार कामगिरी करताना शुटआऊटदरम्यान दोन गोल रोखले. तसेच भारताकडून शुटआऊटदरम्यान मनप्रीत सिंग, हरमनप्रीत सिंग, ललित उपाध्याय आणि अभिषेक यांनी गोल केले.
निर्धारित वेळेत भारताकडून हरमनप्रीत सिंग (7'), मनदीप सिंग (19'), सुखजीत सिंग (28') आणि अभिषेक (50') यांनी गोल केले. तसेच ब्रिटनकडून सॅम वार्ड (8', 40', 47', 53') यानेच सर्व चार गोल नोंदवले.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.