Odisha Train Accident: जगही हळहळले ! ओडिशा दुर्घटनेबाबत बायडन यांच्यासह अनेक देशांच्या प्रमुखांनी व्यक्त केला शोक

ओडिशा रेल्वे दुर्घटनेबाबत सोशल मिडियाच्या माध्यमातून जगभरातूनही हळहळ व्यक्त केली जात आहे.
Odisha Train Accident
Odisha Train AccidentDainik Gomantak
Published on
Updated on

Odisha Train Accident: ओडिशामध्ये शुक्रवारी (2 जून) ला झालेल्या भीषण तिहेरी रेल्वे अपघातामुळे अवघा देश शोकसागरात बुडाला आहे. तसेच जगभरातूनही हळहळ व्यक्त केली जात आहे. या अपघातामध्ये मरण पावलेल्यांची संख्या 290 वर पोचली असून 900 पेक्षाही अधिकजण जखमी झाले आहेत.

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांनी ओडिशातील बालासोर येथे झालेल्या रेल्वे दुर्घटनेबाबत ट्विट करत शोक व्यक्त केला आहे.

तसेच, सिंगापूरचे पंतप्रधान ली सिएन लूंग यांनी ओडिशा ट्रेन दुर्घटनेबाबत शोक व्यक्त करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहिले आहे. एएनआयने हे पत्र ट्विट करत शेअर केले आहे.

ओडिशातील रेल्वे अपघातात मृत्युमुखी पडलेल्यांच्या कुटुंबियांना आणि भारतातील लोकांप्रती इटलीतील दूतावासाने देखील ट्विट करत शोक व्यक्त केला आहे.

Odisha Train Accident
Egypt Border: इजिप्तच्या सीमेवर झालेल्या चकमकीत तीन इस्रायली सैनिक ठार

रशियाचे अध्यक्ष पुतिन यांनी देखील ट्विट करत ओडिशातील रेल्वे दुर्घटनेबाबात शोक व्यक्त केला आहे.

ओडिशातील बालासोर जिल्ह्यात बहनागा बाजार येथे झालेल्या या भीषण तिहेरी रेल्वे अपघातामध्ये बंगळूर- हावडा सुपरफास्ट एक्स्प्रेस, शालिमार- चेन्नई सेंट्रल कोरोमंडल एक्स्प्रेस आणि एका मालवाहू गाडीचे मोठे नुकसान झाले.

या अपघाताची तीव्रता लक्षात घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एका उच्चस्तरीय बैठकीमध्ये आढावा घेतला, त्यानंतर त्यानी घटनास्थळी पोहचुन पाहणी केली. या दुर्घटनेला जबाबदार असणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येईल असे त्यांनी सांगितले. पंतप्रधानांसोबत यावेळी केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव आणि शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान देखील उपस्थित होते.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com