Dhruv Jurel, Devdutt Padikkal, Sarfaraz Khan  X/BCCI
क्रीडा

IND vs ENG: इंग्लंडविरुद्धची कसोटी मालिका गाजवलेले 'हे' 5 युवा खेळाडू ठरू शकतात टीम इंडियाचं उज्वल भविष्य

5 Young Indian Cricketer Shine in Test Series: इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेत शानदार कामगिरी केलेल्या 5 युवा खेळाडूंचा घेतलेला आढावा.

Pranali Kodre

5 Young Indian Cricketer Shine in Test Series against England

भारतीय क्रिकेट संघाने नुकतीच जानेवारी ते मार्च 2024 दरम्यान इंग्लंडविरुद्ध झालेल्या पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेत 4-1 अशा फरकाने विजय मिळवला. भारताच्या या विजयात अनेक युवा खेळाडूंचे मोलाचे योगदान राहिले.

या मालिकेत विराट कोहली वैयक्तिक कारणामुळे, तर मोहम्मद शमी दुखापतीमुळे खेळले नाहीत. तसेच केएल राहुलही पहिल्या सामन्यानंतर दुखापतीमुळे बाहेर गेला. याशिवाय भारतीय संघातून चेतेश्वर पुजारा आणि अजिंक्य रहाणे यांनाही वगळण्यात आले आहे.

त्यामुळे अनेक वरिष्ठ खेळाडू संघात नसतानाही युवा खेळाडूंनी उचललेल्या जबाबदारीने भारतीय संघाला ही कसोटी मालिका सहज जिंकता आली. दरम्यान, या मालिकेत शानदार कामगिरी केलेल्या 5 युवा खेळाडूंचा आढावा घेऊ, जे भारतीय संघासाठी भविष्यात नवी ओळख तयार करू शकतात.

ध्रुव जुरेल

23 वर्षीय यष्टीरक्षक फलंदाज ध्रुव जुरेलने फलंदाजीत दाखवलेल्या परिपक्वतेने आणि त्याच्या यष्टीरक्षणातील कौशल्याने अनेकांची मनं जिंकली. त्याने या मालिकेतील राजकोटला झालेल्या तिसऱ्या कसोटीतून पदार्पण केले.

पदार्पणाच्या सामन्यातच त्याने महत्त्वपूर्ण 46 धावांची खेळी केली. तसेच रांचीत झालेल्या कसोटी सामन्यात तर त्याने पहिल्या डावात 90 धावांची अत्यंत सुरेख खेळी केली. अन्य भारतीय फलंदाजांच्या विकेट्स झटपट गेल्यानंतरही त्याने संयम दाखवत ही खेळी केली.

इतकेच नाही, तर चौथ्या डावात धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना शुभमन गिलबरोबर 72 धावांची विजयी भागीदारी केली. त्याने या डावात नाबाद 39 धावा केल्या. त्याच्या या कामगिरीमुळे त्याने सामनावीर पुरस्कारही जिंकला.

जुरेलचा खेळ पाहाता आणि त्याचे वय पाहाता, तो भविष्यातही अनेक वर्षे भारताकडून खेळताना दिसू शकतो. त्याने इंग्लंडविरुद्ध 4 डावात 190 धावा केल्या.

सर्फराज खान

देशांतर्गत क्रिकेट अनेकवर्षे गाजवल्यानंतर सर्फराजसाठी भारतीय संघाचा दरवाजा इंग्लंडविरुद्धच्या या कसोटी मालिकेदरम्यान उघडला. त्याने राजकोटला झालेल्या कसोटी सामन्यातून पदार्पण केले.

पदार्पणातच त्याने पहिल्या डावात 62 आणि दुसऱ्या डावात नाबाद 68 धावांची खेळी केली. इतकेच नाही, तर त्याने धरमशाला येथे झालेल्या पाचव्या सामन्यातही महत्त्वपूर्ण 56 धावा केल्या. त्याने या मालिकेत 5 डावात 200 धावा केल्या.

सर्फराजकडे खेळपट्टीवर स्थिरावल्यानंतर गोलंदाजांवर दबाव टाकण्याची क्षमता आहे. तो फिरकी गोलंदाजी, तर सहज खेळून काढतो.

त्याने एकूणच या मालिकेत त्याच्याकडे आंतरराष्ट्रीय स्थरावर खेळण्याचे कौशल्य असून तो या आव्हानासाठी सज्ज असल्याचे दाखवले. त्यामुळे त्याने जर कामगिरीत सातत्य ठेवले, तर तो देखील दीर्घकाळ भारतीय संघासाठी खेळताना दिसू शकतो.

आकाश दिप

बंगालचा वेगवान गोलंदाज आकाश दीपला रांचीत झालेल्या चौथ्या कसोटीतून पदार्पणाची संधी मिळाली. या सामन्यात जसप्रीत बुमराहला विश्रांती दिल्याने आकाश दीपला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळवण्यात आले. त्यानेही ही संधी दोन्ही हातांनी झेलली.

त्याने रांची कसोटीत सुरुवातीला त्याला पहिली विकेट मिळाली, पण तो नो-बॉल होता. मात्र, नंतर त्याची ही चूक संघाला फार महागात पडणार नाही, याची काळजीही त्यानेच घेतली. त्याने कसोटीच्या पहिल्याच दिवशी त्याने इंग्लंडच्या पहिल्या तिन्ही फलंदाजांना बाद करत त्याचे कौशल्य दाखवले.

त्याला दुसऱ्या डावात गोलंदाजी मिळाली नाही. पण त्याने या सामन्यात तो फलंदाजीवेळीही काही काळ खेळपट्टीवर तग धरू शकतो हे दाखवले. त्याने पहिल्या डावात जुरेलबरोबर 40 धावांची भागीदारी केली होती. त्याने जर त्याच्या कामगिरीत सातत्य ठेवले, तर तोही भारतीय संघात त्याचे स्थान भविष्यात पक्के करू शकतो.

देवदत्त पडिक्कल

23 वर्षीय फलंदाज देवदत्त पडिक्कलला इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेतील सर्वात शेवटचा सामना खेळण्याची संधी मिळाली. त्याने या सामन्यातून कसोटी पदार्पण केले. पदार्पण करताना मिळालेली संधीही त्याने दोन्ही हातांनी पकडली.

भारताने एका डावाने जिंकलेल्या या सामन्यात पडिक्कलने पहिल्या डावात रोहित शर्मा आणि शुभमन गिल यांच्या शतकानंतर 65 धावांची शानदार खेळी करत त्याच्यातील प्रतिभेची चुणूक दाखवली. दरम्यान, त्याचे वय पाहाता, त्याने कामगिरीत सातत्य ठेवले, तर तोही भविष्यात भारतीय संघात त्याचे स्थान पक्के करू शकतो.

यशस्वी जयस्वाल

या मालिकेत सर्वाधिक चर्चा झाली ती यशस्वी जयस्वालची. जयस्वालने या मालिकेपूर्वीच भारतीय कसोटी संघात स्थान मिळवले असले, तरी त्याला एक वेगळी ओळख मिळवून देण्यासाठी ही मालिका महत्त्वाची ठरली.

या मालिकेतून जयस्वालने त्याचे तंत्र, त्याची परिपक्वता आणि फलंदाजीतील ताकद यामुळे अनेकांची मनं जिंकली. त्याला प्रत्येक डावातच बाद करणं, हे इंग्लंड संघासमोरील सर्वात पहिले आणि मोठे आव्हान होते.

त्याने या मालिकेतील पाचही सामन्यात खेळताना 9 डावात 2 द्विशतके आणि 3 अर्धशतके केली. त्याने 9 डावात 79.91 च्या सरासरीने 712 धावा केल्या. तसेच जयस्वालने या मालिकेत तब्बल 68 चौकार आणि 26 षटकारही मारले. त्याच्या या कामगिरीने त्याला या मालिकेचा मालिकावीर पुरस्काकही मिळवून दिला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IPL Mini Auction 2026: केकेआरचा 'मास्टरस्ट्रोक'! मथीशा पाथिरानाला 18 कोटींत केलं खरेदी; सीएसकेच्या 'बेबी मलिंगा'वर शाहरुखने लावली मोठी बोली

Luthra Brothers Arrested: 'बर्च बाय रोमिओ लेन' च्या मालकांचा खेळ खल्लास! दिल्ली विमानतळावर लुथरा बंधूंना गोवा पोलिसांकडून अटक

IPL Mini Auction 2026: पैशांचा पाऊस! कॅमेरुन ग्रीनसह 'हे' 4 खेळाडू आयपीएल लिलावात मालामाल; मोडले सर्व रेकॉर्ड्स

Border 2 Teaser: 'लाहोरपर्यंत आवाज गेला पाहिजे...' पाकिस्तानला धडकी भरवणारा बॉर्डर 2 चा टीझर रिलीज; देओलचा रुद्र अवतार पाहून व्हाल अवाक VIDEO

Goa Assembly Winter Session 2026: गोवा सरकारचे हिवाळी अधिवेशन 12 जानेवारीपासून; रामा काणकोणकर हल्ला, हडफडे आग प्रकरण गाजणार

SCROLL FOR NEXT