37th National Games Goa Dainik Gomantak
क्रीडा

37th National Sports Competition: उदघाटनापूर्वी होतील स्पर्धेतील सामने; 22 ऑक्टोबरपासून नेटबॉल स्पर्धा

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते होणार स्पर्धेचे उदघाटन

किशोर पेटकर

37th National Sports Competition: गोव्यात होणाऱ्या 37व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेचे उदघाटन 25 ऑक्टोबरला नियोजित आहे, मात्र त्यापूर्वी काही खेळांचे आयोजन करण्याचे स्पर्धा तांत्रिक आचार समितीने (जीटीसीसी) ठरविले आहे. यासंदर्भात संबंधित खेळांच्या राष्ट्रीय महासंघांना जीटीसीसी अध्यक्ष अमिताभ शर्मा यांनी लेखी कळविले आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ३७व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेचे उदघाटन केले जाईल, अशी माहिती गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी जाहीर केलेले आहे.

उदघाटनाची तारीख २५ की २६ ऑक्टोबर हे पंतप्रधानांचे कार्यालय निश्चित करणार असल्याचीही माहिती त्यांनी यापूर्वी दिलेली आहे.

स्पर्धेचा समारोप नऊ नोव्हेंबरला होईल. गोव्यातील राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत एकूण ४३ खेळांचा समावेश असून स्पर्धेच्या इतिहासातील हा उच्चांक आहे.

जीटीसीसी अध्यक्ष अमिताभ शर्मा यांनी भारतीय नेटबॉल महासंघाला गतआठवड्यात पाठवलेल्या पत्रानुसार, नेटबॉल स्पर्धा २२ ते २७ ऑक्टोबर या कालावधीत खेळली जाईल.

सहा दिवसीय स्पर्धा कांपाल येथील इनडोअर स्टेडियममध्ये नियोजित आहे. अमिताभ यांच्या पत्रानुसार, नेटबॉल स्पर्धेसाठी पात्र संघ स्पर्धा सुरू होण्याच्या दोन दिवसअगोदर गोव्यात दाखल होतील आणि स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आल्यानंतर संघ पुढील दिवशी रवाना होतील.

दरम्यान, अन्य काही खेळांचे सामनेही राष्ट्रीय स्पर्धेच्या उदघाटनापूर्वी घेण्याचे नियोजन आहे. स्पर्धेचे सविस्तर वेळापत्रक लवकरच आयओए जीटीसीसी यांच्यातर्फे जाहीर केले जाईल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Magh Purnima 2026: कष्टाचं फळ मिळणार अन् कष्ट दूर होणार! माघ पौर्णिमेला 5 शुभ योगांचा महासंयोग; 'या' राशींच्या सुवर्णकाळाची सुरुवात

Video: 'अभिषेक झाला, सूर्या झाला'! भारताचा 'हा' फलंदाज आता चोपणार न्यूझीलंडला; प्रॅक्टिसचा व्हिडीओ झाला Viral

Russia Train Attack: 'काळ्या धुराचे लोट अन् रडणाऱ्या प्रवाशांचा आक्रोश'! रशियाच्या क्षेपणास्त्र हल्ल्यात युक्रेनची रेल्वे सेवा उद्ध्वस्त; 12 जणांचा मृत्यू Watch Video

Shadashtak Yog 2026: "जुनी कर्जे फिटणार, आनंदाचे दिवस येणार!" मंगळ-गुरुचा महासंयोग 'या' राशींसाठी ठरणार भाग्योदयाची नवी पहाट

Ajit Pawar Plane Crash: काळजाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ! अजित पवारांच्या विमान अपघाताचं CCTV फुटेज आलं समोर; क्षणार्धात होत्याचं नव्हतं झालं VIDEO

SCROLL FOR NEXT