डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी इनडोअर स्टेडियमची पाहणी केल्यानंतर गोवा बॅडमिंटन असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांसमवेत क्रीडामंत्री गोविंद गावडे. Dainik Gomantak
क्रीडा

37th National Games Goa: बॅडमिंटन सामन्यांसाठी श्यामाप्रसाद मुखर्जी स्टेडियम

किशोर पेटकर

37th National Games Goa: 37 व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेतील बॅडमिंटन स्पर्धा पेडे-म्हापसा येथील क्रीडा संकुलात घेतली जाईल, असे क्रीडामंत्री गोविंद गावडे यांनी गेल्या शुक्रवारी सांगितले होते, मात्र स्पर्धा ताळगाव पठारावरील डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी इनडोअर स्टेडियममध्ये होण्याचे आता निश्चित झाले आहे.

स्टेडियम नूतनीकरण युद्धपातळीवर सुरू असून बॅडमिंटन स्पर्धा संचालकांनी केंद्राची पाहणी करून समाधान व्यक्त केले.

डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी स्टेडियमच्या नूतनीकरण कामाची पाहणी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत बुधवारी करतील, त्यापूर्वी मंगळवारी क्रीडामंत्री गोविंद गावडे यांनी पाहणी केली.

स्पर्धा संचालक राकेश शेखर यांनी यापूर्वीच केंद्राची पाहणी करून तयारी योग्य दिशेने असल्याचे नमूद केले आहे, तसे येथे स्पर्धा घेण्यास हिरवा कंदिल दाखविला.

त्यामुळे आता 19 ते 24 ऑक्टोबर या कालावधीत लुसोफोनिया क्रीडा स्पर्धेसाठी बांधलेल्या या भव्य वास्तूत बॅडमिंटन स्पर्धा होईल आणि अधिकृत उदघाटनापूर्वी 37 व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेतील स्पर्धात्मक चुरसही सुरू होईल. या ठिकाणी नंतर तलवारबाजी आणि व्हॉलिबॉल स्पर्धाही होईल.

क्रीडामंत्र्यांसमवेत पाहणी करताना क्रीडा संचालक अरविंद खुटकर, गोवा क्रीडा प्राधिकरणाच्या कार्यकारी संचालक गीता नागवेकर, संदीप जॅकिस, गोव्याचे स्पर्धा चेफ द मिशन, गोवा बॅडमिंटन संघटनेचे सचिव संदीप हेबळे, बॅडमिंटन संघटनेचे पदाधिकारी प्रवीण शेणॉय यांची उपस्थिती होती.

तीन-चार दिवसांत स्टेडियम सज्ज

डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी इनडोअर स्टेडियम ३७व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेसाठी येत्या तीन-चार दिवसांत पूर्णपणे सज्ज होईल. स्टेडियममधील फ्लोअरिंगचे काम पूर्ण झाले आहे. सध्या वातानुकूलित व्यवस्था, रंगकामासह इतर नूतनीकरण कामे सुरू असून पूर्णत्वाच्या मार्गावर आहेत, अशी माहिती संदीप हेबळे यांनी दिली.

स्पर्धा संचालक राकेश शेखर यांनी या केंद्राची पाहणी करून समाधान व्यक्त केले, तसेच प्रकाशयोजनेसह काही बाबींवर सूचनाही केल्या, अशी माहिती हेबळे यांनी दिली. इनडोअर स्टेडियमधील सिंथेटिक कोर्ट बसविण्याचे काम 15 ऑक्टोबरला सुरू होईल.

त्यामुळे बॅडमिंटन स्पर्धेसाठी आवश्यक आंतरराष्ट्रीय दर्जाचा पृष्ठभाग तयार होईल. स्पर्धेनिमित्त देशभरातील पात्र संघ व खेळाडू 17 ऑक्टोबरपासून गोव्यात दाखल होतील, अशी माहिती हेबळे यांनी दिली.

प्रमुख खेळाडूंचा सहभाग

37 व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेतील बॅडमिंटनमध्ये भारताचे आंतरराष्ट्रीय पातळीवरील किरण जॉर्ज, मिथुन मंजुनाथ, सौरभ वर्मा, वरुण कपूर, आकर्षी कश्यप, मालविका बनसोड, अश्मिता चलिहा, अनुपमा उपाध्याय या प्रमुख खेळाडूंचा सहभाग निश्चित झाला आहे, असे संदीप हेबळे यांनी सांगितले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Subhash Velingkar: सुभाष वेलिंगकरांची अटक अटळ? कोर्टाचा दिलासा नाही, जामीन अर्जावर सोमवारी सुनावणी

Saint Francis Xavier: सुभाष वेलिंगकरांच्या अटकेसाठी उद्रेक; पर्यटक, विद्यार्थ्यांचे हाल, गोव्यात दिवसभर कुठे काय घडलं?

BKC ते आरे JVLR पंतप्रधान मोदींचा मेट्रोने प्रवास; शाळकरी विद्यार्थी, महिलांशी साधला संवाद पाहा Video

Goa HSE Board Exam: गोवा बारावी बोर्ड परीक्षेच्या वेळापत्रकात बदल, JEE परीक्षेमुळे मोठा निर्णय

गिरीत बंदिस्त खोलीत आढळला मृतदेह , संशयास्पद मृत्यूचा कुटुंबियांचा अंदाज; गोव्यातील ठळक बातम्या

SCROLL FOR NEXT