National Junior Football: सलग तिसऱ्या विजयासह गोव्याच्या मुली उपांत्य फेरीत; लडाखचा 5-0 ने उडवला धुव्वा

तिन्ही सामन्यांमध्ये दणदणीत विजय; प्रतिस्पर्ध्यांवर डागले 12 गोल
राष्ट्रीय ज्युनियर महिला फुटबॉल स्पर्धेत उपांत्य फेरी गाठलेला गोव्याचा संघ.
राष्ट्रीय ज्युनियर महिला फुटबॉल स्पर्धेत उपांत्य फेरी गाठलेला गोव्याचा संघ.Dainik Gomantak
Published on
Updated on

National Junior Football: गोव्याच्या ज्युनियर मुलींनी धडाकेबाज खेळाची मालिका कायम राखताना मंगळवारी सलग तिसरा सामना जिंकून राष्ट्रीय ज्युनियर महिला फुटबॉल स्पर्धेच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला. गटसाखळीतील लढतीत त्यांनी लडाख संघाचा 5-0 फरकाने धुव्वा उडविला.

स्पर्धा राजस्थानमधील जोधपूर येथे सुरू आहे. गोव्याच्या विजयात पर्ल फर्नांडिस हिने दोन गोल केले. तिने अनुक्रमे 12व 34 व्या मिनिटास गोल करून गोव्याला आघाडी मिळवून दिली.

राष्ट्रीय ज्युनियर महिला फुटबॉल स्पर्धेत उपांत्य फेरी गाठलेला गोव्याचा संघ.
World Cup 2023: 'कुसलने पाकिस्तानच्या कुशलतेची...', मुलतानच्या सुलतानचे ट्विट व्हायरलं!

नंतर 38 व्या मिनिटास फातिमा ब्रागांझा हिने, 45+3 व्या मिनिटास रिया पत्रे हिने केलेल्या गोलमुळे गोव्याला विश्रांतीला 4-0अशी आघाडी घेतला आली. सामन्यातील पाचवा गोल अनुष्का धारवाडकर हिने 65 व्या मिनिटास केला.

स्पर्धेतील 3 सामन्यांत 12 गोल

गोव्याने स्पर्धेतील तिन्ही सामन्यांत क्लीन शीट राखताना प्रतिस्पर्ध्यांवर तब्बल 12 गोल डागले आहेत. त्यापैकी 8 गोल पर्ल फर्नांडिन हिने एकटीने नोंदविले आहेत. गटसाखळी गोव्याने अनुक्रमे उत्तराखंड (3-0), कर्नाटक (4-0), लडाख (5-0) या संघांवर मात केली.

राष्ट्रीय ज्युनियर महिला फुटबॉल स्पर्धेत उपांत्य फेरी गाठलेला गोव्याचा संघ.
World Cup 2023: बांगलादेशचा दारुण पराभव, गतविजेत्या इंग्लंडने विजयाचं खातं उघडलं

जीएफए अध्यक्षांकडून अभिनंदन

राष्ट्रीय ज्युनियर महिला फुटबॉल स्पर्धेची उपांत्य फेरी गाठलेल्या गोव्याच्या संघाचे गोवा फुटबॉल असोसिएशनचे (जीएफए) अध्यक्ष कायतान फर्नांडिस यांनी अभिनंदन केले आहे.

संघाच्या यशस्वी कामगिरी पर्ल फर्नांडिस हिने बजावलेल्या सातत्यपूर्ण कामगिरीचे त्यांनी अभिनंदन केलेच, तसेच भारतीय महिला फुटबॉलमधील भावी स्टार असल्याचेही नमूद केले.

जीएफएने महिला फुटबॉलला पाठबळ देताना 13 वर्षांखालील, 15 वर्षांखालील, 17 वर्षांखालील वयोगटात स्पर्धा सुरू केली याकडे कायतान यांनी लक्ष वेधले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com