राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेसाठी निवडण्यात आलेल्या गोव्याच्या पुरुष व महिला खेळाडूंसमवेत प्रशिक्षक व मान्यवर. Dainik Gomantak
क्रीडा

37th National Games: वेटलिफ्टिंग मधील पदकाबाबत गोवा आशावादी; 20 सदस्यीय संघाची निवड

25 ऑक्टोबरपासून कांपाल येथे रंगणार स्पर्धा

किशोर पेटकर

Goa Weightlifting Team for 37th National Games: राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेच्या इतिहासात गोव्याला वेटलिफ्टिंग खेळात कधीच पदक मिळालेले नाही, यावेळी पदकतक्त्यात पदार्पण करण्याची अपेक्षा या खेळाची राज्य संघटना बाळगून आहे.

45 दिवसांच्या निवासी शिबिरात मेहनत घेतल्यानंतर स्पर्धेसाठी वीस सदस्यीय संघ निवडण्यात आला असून यामध्ये प्रत्येकी दहा पुरुष व महिला आहेत.

कांपाल येथील 37 व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेच्या क्रीडानगरीत 25 ते 29 ऑक्टोबर या कालावधीत वेटलिफ्टिंग स्पर्धा होईल. गोवा वेटलिफ्टिंग संघटनेचे माजी पदाधिकारी, भारतीय वेटलिफ्टिंग महासंघाचे संयुक्त सचिव जयेश नाईक यांनी सांगितले, की ‘‘आम्हाला चांगल्या कामगिरीची अपेक्षा आहे.

अधिकाधिक पदकांसाठी प्रयत्न असतीलच, पण किमान दोनपेक्षा जास्त पदके निश्चितच जिंकू. 45 दिवसीय निवासी शिबिरात खेळाडूंच्या आहारावर जास्त भर देण्यात आला. शिवाय तांत्रिक बाबींवर प्रशिक्षकांनी जास्त लक्ष केंद्रित केले. खेळाडू स्पर्धेसाठी सज्ज आहेत.’’

चेंदू शेखर, एल. डी. कृष्णराम, एनआयएस प्रशिक्षक अँड्र्यू गोम्स, गोवा क्रीडा प्राधिकरणाचे प्रशिक्षक तनुज किनळकर यांच्या मार्गदर्शनाखाली निवासी शिबिर झाले. प्रसाद कवळेकर संघाचे व्यवस्थापक आहेत.

ॲड. प्रियांका नाईक गोवा वेटलिफ्टिंग असोसिएशनच्या अध्यक्ष आहेत. त्यांनी निवासी शिबिरातील खेळाडूंच्या कामगिरीवर समाधान व्यक्त केले.

खेलो इंडिया यूथ गेम्समध्ये पदक

यावर्षी मध्य प्रदेशमध्ये झालेल्या खेलो इंडिया यूथ गेम्समध्ये गोव्याला एकच ब्राँझपदक मिळाले होते. हे पदक वेटलिफ्टिंगमधील होते, त्यामुळे आता घरच्या मैदानावरील राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत गोव्याचे खेळाडू पदक जिंकण्याबाबत विश्वास व्यक्त होत आहे.

गोव्याचा वेटलिफ्टिंग संघ

पुरुष ः ॲल्टन आल्मेदा, रवींद्र डायस, अक्षय गायकवाड, अविध मोरजकर, लालू टाकू, एस. सतीश, गोरक्षनाथ वायफळकर, शुभम वर्मा, महेश कवळेकर, बाळकृष्ण सरदेसाई.

महिला ः गौरवी देसाई, हमिशा कुट्टीकर, वैष्णवी उगाडेकर, सुजाता राय, हिमाली कांबळे, श्रेया नाईक, साक्षी हळदणकर, निकिता बेतकीकर, तनुजा कुंकळकर, श्रावणी उबाळे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Live Updates: प्रथमेश गावडे प्रकरणी तनिष्का चव्हाण आणि प्रीती चव्हाण यांना सशर्त जामीन मंजूर!

Rajbagh Beach: राजबाग किनाऱ्याने घेतला 'मोकळा श्वास'! पर्यटन खात्याकडून सात बेकायदेशीर बांधकामे उद्ध्वस्त

Goa Vegetable: कांद्याने आणले डोळ्यात पाणी! नासाडीमुळे दर वाढले; अन्य भाज्यांचे दर स्थिर

Margao News: स्वच्छतेसंदर्भात मडगाव पालिकेचा महत्त्वाचा निर्णय; या कारणासाठी नागरिक, पर्यटकांकडून वसूल केला जाईल दंड

Cash For Job Scam: प्रिया यादवचा आणखी एक कारनामा उघड; डिचोलीतील चार बहिणींना घातला 80 लाखांना गंडा

SCROLL FOR NEXT