womens football Dainik Gomantak
क्रीडा

National Tournament : गोव्याच्या विजयात 'करिष्मा'चा धडाका

महिला फुटबॉलमध्ये मिझोरामवर 2-1 फरकाने मात

दैनिक गोमन्तक

पणजी: करिष्मा शिरवईकरच्या दोन शानदार गोलच्या बळावर गोव्याने शनिवारी महिला फुटबॉलमध्ये धडाका राखला. गुजरातमध्ये सुरू असलेल्या 36 व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत मिझोरामवर 2-1 फरकाने विजय नोंदवला आहे. यात अ गटाने विजयी सलामी दिली.

(36th National Sports Tournament Goa women's football team wins against Mizoram)

सामना गुजरातमधील शाहीबाग येथे झाला. विश्रांतीला दोन्ही संघ 1-1 असे गोलबरोबरीत होते. सामन्यात गोव्याचे नेतृत्व करणाऱ्या करिष्माने 31व्या मिनिटास संघाला आघाडी मिळवून दिली. 42 व्या मिनिटास लाल्दुहथलानी पाचौयू हिच्या गोलमुळे मिझोरामला बरोबरी साधता आली. सामन्याच्या 75 व्या मिनिटास करिष्माने आणखी एक गोल नोंदविला, तो गोव्यासाठी निर्णायक ठरला. गोव्याचा स्पर्धेतील पुढील सामना मणिपूरविरुद्ध सोमवारी (ता. 3) खेळला जाईल.

गोव्याची सामन्याची सुरवात आक्रमक शैलीत झाली, पण गोल करण्यासाठी त्यांना अचूक नेमबाजी साधला आली. अर्ध्यातासाच्या खेळानंतर मात्र आघाडीची संधी साधली. सुश्मिता जाधव हिच्या शानदार असिस्टवर करिष्माने प्रतिस्पर्धी संघाच्या गोलरक्षकास चकवा दिला. मिझोरामने विश्रांतीपूर्वी बरोबरी साधल्यानंतर उत्तरार्धात गोव्याने वेगवान खेळ केला. सामना संपण्यास 15 मिनिटे बाकी असताना नमिता गोवेकरच्या असिस्टवर करिष्माने मिझोरामच्या बचावफळीस प्रेक्षणीय ड्रिबलिंगद्वारे चकवा देत गोव्याला आघाडी मिळवून दिली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Mungul Margao: हल्‍ला करण्‍यासाठी राजस्‍थानहून गोव्‍यात बोलावले! मुंगूल प्रकरणी 23 जणांना अटक; बिश्नोई गँग कनेक्‍शन उघड

Rivona: दोन सख्ख्या भावांचा मृत्यू, ‘त्या’ शेतमालक महिलेला अटक; बेकायदा फेन्सिंगमुळे घडली दुर्घटना

Power Tariff Scam: भक्‍कम पुरावे नसल्‍याने 'गुदिन्‍हो' सुटले! आरोप शंकेच्या पलीकडे जाऊन सिद्ध न झाल्याने निर्दोष मुक्तता

ED Raid: गोव्यात 'ईडी'ची मोठी कारवाई! 2.86 कोटींची मालमत्ता जप्त; आलिशान व्हिला, अनेक भूखंडांचा समावेश

Duleep Trophy 2025: चार चेंडूंत चार विकेट्स! दुलीप ट्रॉफीत पहिल्यांदाच 'या' खेळाडूने रचला इतिहास; जम्मू काश्मीरचा पठ्ठा चमकला

SCROLL FOR NEXT