T20 World Cup Rohit Sharma Twitter/@ANI
क्रीडा

T20 World Cup Rohit Sharma: सरावा दरम्यान रोहित शर्माच्या उजव्या हाताला दुखापत

T20 World Cup Rohit Sharma: रोहित शर्माने लगेच फिजिओची मदत घेतली आणि थोड्या वेळाने पुन्हा सरावासाठी परतला.

दैनिक गोमन्तक

अॅडलेडमध्ये सेमीफायनलसाठी जोरात तयारी करत असलेल्या टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माच्या उजव्या हाताला दुखापत झाल्याने निराशा झाली. नेट प्रॅक्टिसदरम्यान रोहितचा थ्रोडाउन स्पेशालिस्ट रघूचा चेंडू चुकला आणि तो जखमी झाला. यानंतर त्याला तातडीने फिजिओची मदत घ्यावी लागली. पण अल्पावधीतच हा दिग्गज खेळाडू पुन्हा सराव सत्रासाठी मैदानात आला.

टीम इंडियाला (Team India) अॅडलेडमध्येच इंग्लंडविरुद्ध सेमीफायनल सामना खेळायचा आहे. येथील ऐच्छिक सराव सत्रादरम्यान रोहित (Rohit Sharma) नेटवर फलंदाजीचा सराव करत होता. यादरम्यान थ्रो-डाउन स्पेशालिस्टचा लेन्थ बॉल त्याच्या हाताला लागला. यानंतर रोहित वेदनेने ओरडताना दिसला. त्याला ताबडतोब नेट सेशन मध्येच सोडावे लागले. यानंतर फिजिओने त्याला मैदानावर उपचार दिले. यादरम्यान इतर कर्मचाऱ्यांनीही रोहितच्या या दुखापतीची काळजी घेतली.

रोहित आणि कर्मचार्‍यांच्या प्रतिक्रिया पाहता दुखापत गंभीर असू शकते असे वाटले पण चांगली गोष्ट म्हणजे थोड्या विश्रांतीनंतर हिटमॅन पुन्हा नेटवर सराव करताना दिसला.

  • 10 नोव्हेंबरला सेमीफायनल
    टीम इंडिया 10 नोव्हेंबरला दुपारी 1.30 वाजता इंग्लंडविरुद्ध मैदानात उतरणार आहे. हा सामना अॅडलेड ओव्हलवरच होणार आहे. या जुलैमध्ये टीम इंडियाने (Team India) याच भूमीवर टी-20 मालिकेत इंग्लंडला पराभूत केले होते, अशा परिस्थितीत या सामन्यात त्यांचे पारडे जड दिसते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Rahul Gandhi Goa Speech: 'गोवा बनले भ्रष्टाचाराचे केंद्र', राहुल गांधींचा भाजप सरकारवर जोरदार हल्लाबोल; खाणकाम, जमीन आणि बेरोजगारीचा प्रश्न ऐरणीवर

Mhadei River Dispute: म्हादईप्रश्नी राहुल गांधींचे मौन! गोव्याच्या हिताला डावलून कर्नाटकाची पाठराखण केल्याचा गोमंतकीयांचा आरोप; राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चा

Horoscope 19 October 2026: सुवर्णयोग आणि धनलाभाचा दिवस! शारदीय नवरात्रीच्या सोमवारी 'या' राशींचे उजळणार नशीब; जाणून घ्या कसा असेल आजचा दिवस?

India Canada Technology Deal: भारत-कॅनडा टेक डील! विद्यार्थ्यांना मिळणार एआय आणि डेटा सायन्सचे धडे, बंगळुरुमध्ये दीपस्पेशियलचे दोन मोठे करार

Goa Regional Development: गोव्याचे भौतिकशास्त्र आणि राज्यशास्त्र! कॅसिनो, खाणउद्योग अन् विकासाच्या राजकारणाचा वेध

SCROLL FOR NEXT