India Archery Compound Women's Team 
क्रीडा

Asian Games: भारतासाठी 12 वा दिवस सोनेरी! तिरंदाजी अन् स्क्वॅशमध्येही मिळवलं विक्रमी गोल्ड मेडल

India At Asian Games: आशियाई क्रीडा स्पर्धेत गुरुवारी भारताला तीन सुवर्ण पदके मिळाली आहेत.

Pranali Kodre

19th Asian Games Hangzhou, 12th Day, 5th October, India Result :

चीनमध्ये सुरू असेलल्या 19 व्या आशियाई क्रीडा स्पर्धा आता अंतिम टप्प्याकडे येत आहे. या स्पर्धेत भारतीय खेळाडूंची पदकांची लयलूट सुरूच आहे. स्पर्धेच्या १२ व्या दिवसाची म्हणजेच गुरुवारीची सुरुवात भारतासाठी सुवर्णमय झाली आहे.

गुरुवारी सकाळीच तिरंदाजीत महिला कंपाउंड प्रकारात भारताच्या महिला संघाने सुवर्ण पदक जिंकण्याचा कारनामा केला आहे. या संघात ज्योती सुरेखा वेन्नम, आदिती स्वामी आणि प्रणित कौर यांचा समावेश आहे.

भारताच्या या संघाने गुरुवारी उपांत्यपूर्व सामन्यात हाँग-काँगला पराभूत केले, तर उपांत्य सामन्यात इंडोनेशियाविरुद्ध विजय मिळवत अंतिम सामन्यात प्रवेश केला होता.

अंतिम सामन्यात भारतीय संघाने चायनिज तिपैईच्या संघाला 230-229 फरकाने पराभूत केले आणि सुवर्ण पदकावर नाव कोरले.च

त्याचबरोबर तिरंदाजीतच पुरुषांच्या कंपाउंड सांघिक प्रकारात भारताच्या संघानेच सुवर्ण पदक जिंकले आहे. भारतीय संघात अभिषेक वर्मा, ओजस प्रवीण देवतळे आणि प्रथमेश जावकर यांचा समावेश आहे. या भारतीय संघाने गुरुवारी उपांत्यपूर्व सामन्यात भूतानला, उपांत्य सामन्यात चायनिज तिपैईला पराभूत केले होते. त्यानंतर अंतिम सामन्यात कोरियाला 235-230 फरकाने पराभूत केले.

दरम्यान महिला संघातील ज्योती सुरेखा वेन्नम आणि पुरुष संघातील ओजस प्रवीण देवतळे यांचे हे सलग दुसरे सुवर्ण पदक ठरले आहे. यापूर्वी त्यांच्या जोडीने तिरंदाजीत कंपाउंड मिश्र दुहेरी प्रकारात सुवर्ण पदक जिंकले आहे.

स्कॅशमध्येही सुवर्ण

तसेच स्क्वॅशमध्ये दीपिका पल्लिकल आणि हरिंदर पाल संधू यांच्या जोडीने मिश्र दुहेरीत सुवर्ण पदकाला गवसणी घातली. त्यांनी अंतिम सामन्यात मलेशियाच्या अझमन ऐफा बिनती आणि बिन मोहम्मद कमाल मोहम्मद स्याफिक या जोडीला पराभूत केले.

हे स्क्वॅशमध्ये मिश्र दुहेरीतील भारताचे आशियाई क्रीडा स्पर्धेच्या इतिहासातील पहिलेच सुवर्ण पदक आहे.

तसेच गुरुवारी स्कॅशमध्ये पुरुष एकेरी प्रकारात भारताच्या सौरव घोषालला रौप्यपदक मिळाले. त्याला अंतिम सामन्यात मलेशियाच्या एनजी ईन योवविरुद्ध पराभवाचा धक्का बसल्याने रौप्य पदकावर समाधान मानावे लागले.

अंतिमला कांस्य पदक

भारताची 19 वर्षीय कुस्तीपटू अंतिम पांघलने गुरुवारी कांस्य पदकाच्या लढतीत मंगोलियाच्या बोलोर्तुया बॅट-ओचीरला पराभूत केले. याबरोबरच कारकिर्दीतील पहिले आशियाई क्रीडा स्पर्धेतील पदक जिंकले.

बॅडमिंटनमध्येही पदक पक्के

गुरुवारी बॅडमिंटनमध्ये पीव्ही सिंधूला उपांत्यपूर्व सामन्यात पराभवाचा धक्का बसला. तिला चीनच्या हे बिंग जिआओ विरुद्ध पराभवाच सामना करावा लागला. तथापि, बॅडमिंटनमध्ये पुरुष एकेरीत एचएस प्रणॉयने उपांत्य फेरीत प्रवेश केला असल्याने पदक पक्के केले आहे.

तसेच बॅडमिंटनमध्ये पुरुष दुहेरीत सात्विक साईराज रांकिरेड्डी आणि चिराग शेट्टी या भारतीय जोडीने उपांत्य सामन्यात प्रवेश केला असल्याने त्यांचेही पदक पक्के झाले आहे.

त्याचबरोबर कबड्डीमध्ये गुरुवारी साखळी फेरीत भारतीय पुरुष संघाने चायनिज तिपैईला 50-27 फरकाने पराभूत केले आहे. तसेच जपानलाही भारताच्या पुरुष संघाने 56-30 फरकाने पराभूत केले आणि उपांत्य सामन्यात प्रवेश केला आहे. उपांत्य सामन्यात पाकिस्तानशी भारताची लढत होणार आहे.

हॉकीत कांस्यपदकाची संधी

भारताच्या महिला हॉकी संघाला उपांत्य सामन्यात चीनविरुद्ध 0-4 असा पराभवाचा सामना करावा लागला. त्यामुळे भारतीय महिला संघ आता कांस्य पदकासाठी सामना खेळेल.

भारताची पदके

गुरुवारच्या खेळांनंतर भारत सध्या पदक तालिकेत 86 पदकांसह चौथ्या क्रमांकावर आहे. भारताच्या खात्यात 21 सुवर्ण, 32 रौप्य आणि 33 कांस्य पदकांचा समावेश आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND vs ENG 4th Test: गिल-राहुलचा मोठा पराक्रम! इंग्लंडच्या भूमीवर रचला नवा इतिहास, मोडला 23 वर्ष जुना रेकॉर्ड

Viral: मास्तर बनला प्रभु देवा...मुकाबला गाण्यावर केला जबरदस्त डान्स; पोरं झाली थक्क, WATCH VIDEO

Shravan Somvar 2025: मन:शांती आणि समस्यामुक्तीसाठी श्रावण सोमवार; जाणून घ्या रुद्राभिषेकाचे महत्त्व आणि सोपी पद्धत

Goa Village Tourism: "आम्हाला प्रकल्प हवाच!" सुर्ला ग्रामस्थांकडून इको-टुरिझमचे स्वागत; शासनाच्या प्रकल्पाला ग्रामसभेचा पाठिंबा

PM Narendra Modi: 'पंतप्रधान नरेंद्र मोदी भगवान विष्णूंचे 11वे अवतार!' भाजप नेत्याच्या वक्तव्याने खळबळ; सांगितले 'हे' कारण

SCROLL FOR NEXT