Violence in France Dainik Gomantak
क्रीडा

France vs Morocco सामन्यानंतर चाहत्यांमध्ये गदारोळ, 14 वर्षीय मुलाने गमावला जीव; Video

फ्रान्स विरुद्ध मोरोक्को सामन्यानंतर रस्त्यावर उतलेल्या चाहत्यांच्या गोंधळात 14 वर्षीय मुलाचा मृत्यू झाला.

Pranali Kodre

FIFA World Cup 2022: फिफा वर्ल्डकप 2022 आता अखेरच्या टप्प्यात असताना चाहत्यांचा उत्साह देखील शिगेला पोहोचला आहे. मात्र, या उत्साहाच्या भरात हिसेंचाही प्रकार पाहायला मिळत आहे. बुधवारी रात्री मोरोक्को विरुद्ध फ्रान्स यांच्यात झालेल्या उपांत्य सामन्यानंतर चाहत्यांच्या सेलिब्रेशन दरम्यान एका 14 वर्षाच्या मुलाला जीव गमवावा लागल्याचे समजत आहे.

मोरोक्को आणि फ्रान्स यांच्यातील उपांत्य सामन्यात फ्रान्सने 2-0 असा विजय मिळवून अंतिम सामन्यात प्रवेश केला. या यशानंतर फ्रान्सची राजधानी पॅरीससह विविध शहरात चाहत्यांकडून जोरदार सेलिब्रेशन करण्यात आले. चाहते अगदी रस्त्यावरही उतरले होते.

मात्र यादरम्यान माँटपेलियर शहरात एका कारने 14 वर्षांच्या मुलाला उडवले. काही रिपोर्ट्सनुसार आणि व्हायरल होत असलेल्या व्हिडिओनुसार काही चाहते कारमधील फ्रान्सचा झेंडा हिसकावून घेत होते. त्यानंतर त्या कार चालकाने यू टर्न मारत जोरात गाडी चालवली. याच दरम्यान 14 वर्षाच्या मुलाला त्याच्या प्राणाला मुकावे लागले.

ओळख न पटलेल्या मुलाला तातडीने हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आले होते. मात्र, त्याचा जीव वाचवण्यात अपयश आले. त्याच्या निधनाबद्दल खासदार नॅखली ओझीओल यांनी घटनेप्रती दु:ख व्यक्त केले अशून त्यांनी त्या मुलाच्या कुटुंबाप्रतीही त्यांच्या संवेदना असतील, असे म्हटले आहे.

दरम्यान, उपांत्य सामन्यानंतर फ्रान्सच्या अनेक शहरात पोलिस बंदोबस्तही करावा लागला. तसेच देशभरातून अडीचशेहून अधिक लोकांना अटकही करण्यात आली. दरम्यान अनेकवर्ष फ्रान्सने मोरोक्कोवर राज्य केले होते, त्यामुळे काहीशी ऐतिहासिक पार्श्वभूमीही या सामन्याला होती.

मोरोक्को हा पहिला आफ्रिकन संघ आहे, जो फिफा वर्ल्डकपच्या उपांत्य सामन्यात खेळला होता. मात्र, त्यांना उपांत्य सामन्यात गतविजेत्या फ्रान्सला पराभूत करता आले नाही. फ्रान्स रविवारी अंतिम सामना अर्जेंटिनाविरुद्ध खेळणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Asia Cup 2025: आशिया कपसाठी पाकिस्तानने जाहीर केला संघ, बाबर-रिझवानला डच्चू; 'या' खेळाडूंना मिळाली संधी

Kshatriya Origins: बटाडोम्बा-लेना, फा-हियन गुहेतील 30000 ईसापूर्वीचे होमिनिन सांगाड्याचे अवशेष, वेदरांचा उल्लेख

Video Viral: मडगावच्या दहीहंडीत आला 'पुष्पा'! "झुकेगा नही" म्हणत त्याने काय केलं, बघा...

Opinion: 3500 ईसापूर्व काळात सुमेरियन लोकांनी ‘क्यूनिफॉर्म’ लिपी विकसित केली, छापखान्याच्या शोधामुळे वाचनकलेत क्रांती झाली

Goa Live News: मोर्ले सत्तरी येथील वासू मोरजकर यांचे मुसळधार पावसामुळे मोठे नुकसान

SCROLL FOR NEXT