Moroccan Footballers
Moroccan FootballersDainik Gomantak

FIFA World Cup: मोरोक्कन फुटबॉलर्सचा इस्लाम धर्म स्विकारण्याचा नॉन-मुस्लिम चाहत्यांना सल्ला

दरम्यान, संघातील खेळाडू त्यांच्या चाहत्यांना आणि सर्वसामान्य लोकांना इस्लाम धर्म स्वीकारण्यास सांगत होते.
Published on

FIFA World Cup 2022: बुधवारी रात्री उशिरा फिफा फुटबॉल वर्ल्डकप 2022 स्पर्धेत दुसरा उपांत्य सामना मोरोक्को विरुद्ध फ्रान्स संघात झाला. अल बायत स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात गतविजेत्या फ्रान्सने मोरोक्कोला 2-0 अशा गोल फरकाने पराभूत केले आणि सलग दुसऱ्यांदा वर्ल्डकपच्या अंतिम सामन्यात प्रवेश केला आहे. मात्र, मोरोक्कोचे विश्वविजयाचे स्वप्न या पराभवामुळे भंगले. यातच उपांत्य फेरीच्या सामन्यात पराभूत झाल्यानंतर मोरोक्कन फुटबॉलपटू सजदा अल शुकर चर्चेत आला आहे. शुकर याचा एक फोटो सोशल मीडियावर प्रचंड प्रमाणात व्हायरल होत आहे. व्हायरल फोटोमध्ये तो नमाज अदा करताना दिसत आहे.

दरम्यान, संघातील खेळाडू त्यांच्या चाहत्यांना आणि सर्वसामान्य लोकांना इस्लाम धर्म स्वीकारण्यास सांगत होते. व्हायरल क्लिपमध्ये, स्पेनविरुद्धच्या (Spain) सामन्यानंतर आपल्या हॉटेलमध्ये परतलेल्या संघातील सदस्यांनी सोशल मीडियावर लाईव्ह केले आणि प्रेक्षकांना इस्लामचा स्वीकार करण्याचे आवाहन केले.

Moroccan Footballers
FIFA World Cup 2022: मोरोक्को इतिहास रचणार की फ्रान्स पुन्हा फायनलचं तिकीट मिळवणार?

"फ्रान्सला हरवल्यानंतर मोरोक्कोचे खेळाडू मैदानावरच नमाज अदा करताना दिसले. त्यांनी प्रवासी चाहत्यांना त्यांच्या पाठिंब्याबद्दल त्यांचे आभार मानले. ईएसपीएन एफसीने मैदानावर नमाज अदा करताना खेळाडूंचे फोटो शेअर करण्यात आले आहेत.

Moroccan Footballers
FIFA World Cup 2022: मेस्सीला भिडणारा रेफ्री वर्ल्डकपमधून बाहेर, क्वार्टर-फायनलमध्ये झालेला राडा

विशेष म्हणजे, विश्वचषकाच्या उपांत्य फेरीत पोहोचणारा मोरोक्को हे पहिले आफ्रिकन राष्ट्र ठरले आहे. तत्पूर्वी, कटरवादी इस्लामिक धर्मोपदेशक झाकीर नाईक यांना कतारने विश्वचषक उद्घाटन कार्यक्रमासाठी आणि संपूर्ण कार्यक्रमात देशात इस्लामचा प्रचार करणारी व्याख्याने देण्यासाठी आमंत्रित केले होते. तथापि, दोहा येथे फिफा विश्वचषक स्पर्धेच्या उद्घाटन समारंभाचे निमंत्रण वादग्रस्त धार्मिक नेत्याला देण्यात आले नसल्याचे सांगत कतारने (Qatar) स्पष्ट केले. FIFA विश्वचषक 2022 वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे, कारण यजमान देश कतारने देशातील गैर-मुस्लिम अभ्यागतांना इस्लामची ओळख करुन देण्याची सर्व व्यवस्था केली होती.

फ्रान्सला मोठा विक्रम करण्याची संधी

फ्रान्सने आता अंतिम सामन्यात प्रवेश केला असल्याने आता त्यांना सलग दोनवेळा वर्ल्डकप विजितेपद मिळवण्याचा विक्रम करण्याची संधी आहे. यापूर्वी केवळ इटली आणि ब्राझील संघानेच असा कारनामा केला आहे. इटलीने 1934 आणि 1938 आणि ब्राझीलने 1958 आणि 1962 असे सलग दोन वर्ल्डकप जिंकले आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com